स्पेशल

संपात सामील झालेल्या 18 लाख कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा! शिंदे-फडणवीस सरकार घेणार ‘हा’ मोठा निर्णय, पहा….

Published by
Ajay Patil

State Employee Strike News : राज्य कर्मचारी गेल्या अनेक दिवसांपासून जुनी पेन्शन योजना लागू करा अशी आग्रही मागणी करत आहेत. यासाठी राज्य कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून शासनाकडे वारंवार निवेदने देण्यात आली आहेत. कर्मचाऱ्यांनी यासाठी आंदोलने देखील केली आहेत.

गेल्या महिन्यात देखील जुनी पेन्शन योजना लागू करावी आपल्या प्रमुख मागणीसाठी राज्य कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून संप पुकारण्यात आला होता. 14 मार्च ते 20 मार्च दरम्यान राज्य कर्मचाऱ्यांनी संप पुकारला होता.

खरं पाहता हा एक बेमुदत संप होता. मात्र शासनाने कर्मचाऱ्यांना या मुद्द्यावर सकारात्मक निर्णय घेऊ असे आश्वासन दिल्यानंतर तसेच जुनी पेन्शन योजना आणि नवीन पेन्शन योजना यांचा तुलनात्मक अभ्यास करून राज्य कर्मचाऱ्यांना पेन्शन बहाल केली जाईल असे आश्वासन दिल्यानंतर हा संप राज्य कर्मचाऱ्यांनी मागे घेतला. पण संपाचा कालावधी असाधारण रजा म्हणून लागू करण्यात आला.

म्हणजेच संपात सामील झालेल्या कर्मचाऱ्यांची सेवा खंडित न करता असाधारण रजा कर्मचाऱ्यांना मंजूर करण्यात आली. मात्र असाधारण रजेमध्ये कर्मचाऱ्यांना वेतन / इतर भत्ते अदा करण्यात येत नाहीत. यामुळे संपात सामील झालेल्या कर्मचाऱ्यांना सहा दिवसाचे वेतन मिळणार नव्हते. अशा परिस्थितीत कर्मचाऱ्यांमध्ये मोठी नाराजगी होती. दरम्यान संप काळातील वेतन देण्यात यावे अशी मागणी कर्मचाऱ्यांची होती. या मागणीकरीता राज्याचे मुख्यमंत्री व कर्मचारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसोबत सोमवारी बैठक संपन्न झाली आहे.

या बैठकीत संप काळातील कर्मचाऱ्यांचे वेतन न कापता नियमित रजा कापली जाईल असा आश्वासन मुख्यमंत्री महोदय यांनी दिले आहे. यामुळे संपाचा सामील झालेल्या कर्मचाऱ्यांना आता वेतन मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. एका मीडिया रिपोर्ट मध्ये दिलेल्या माहितीनुसार शिंदे फडणवीस सरकार याबाबत लवकरच एक सुधारित शासन निर्णय निर्गमित करणार आहे. निश्चितच राज्य कर्मचाऱ्यांची संप काळातील वेतन देण्याची मागणी आता मान्य होणार असून शिंदे सरकारने हा निर्णय घेतला तर यामुळे राज्य कर्मचाऱ्यांना दिलासा मिळणार आहे यातं तीळमात्र देखील शंका नाही.

Ajay Patil

Published by
Ajay Patil