गुंतवणूकदार बनणार श्रीमंत ! फक्त मुंबईत काम पाहणाऱ्या ‘या’ कंपनीचा स्टॉक लवकरच 333 रुपयांवरून 661 वर जाणार !

सध्या शेअर बाजारात सूचीबद्ध असणाऱ्या कंपन्यांकडून आपले तिमाही निकाल जाहीर केले जात आहेत. याच निकालाच्या आधारावर स्टॉक मार्केट विश्लेषक काही कंपन्या आगामी काळात गुंतवणूकदारांना चांगला परतावा देतील असे म्हणत आहेत.

Published on -

Stock To Buy : भारतीय शेअर बाजारात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने चढ-उतार पाहायला मिळत आहेत. मात्र या चढउताराच्या काळातही काही कंपन्या आपल्या गुंतवणूकदारांना आगामी काळात चांगला परतावा देताना दिसतील असा विश्वास विश्लेषकांकडून व्यक्त होतोय. सध्या शेअर बाजारात सूचीबद्ध असणाऱ्या कंपन्यांकडून आपले तिमाही निकाल जाहीर केले जात आहेत.

याच निकालाच्या आधारावर स्टॉक मार्केट विश्लेषक काही कंपन्या आगामी काळात गुंतवणूकदारांना चांगला परतावा देतील असे म्हणत आहेत. रिअल इस्टेट क्षेत्रातील स्मॉलकॅप कंपनी सूरज एस्टेट डेव्हलपर्सबाबतही विश्लेषकांकडून सकारात्मक आऊटलुक दिला जात आहे.

कंपनीने अलीकडेच तिसऱ्या तिमाहीचे (Q3) निकाल जाहीर केले असून, कंपनीच्या आगामी योजनांमुळे ब्रोकरेज फर्म नुवामा इंस्टीट्यूशनल इक्विटीजने या स्टॉकसाठी नवीन आक्रमक अन मोठ टार्गेट प्राईस दिले आहे. ब्रोकरेजनुसार, FY26 साठी कंपनीची लॉन्च पाइपलाइन मजबूत असून, लक्झरी घरांसाठी वाढती मागणी ही त्याच्या वाढीला चालना देईल.

661 रुपयांच टार्गेट प्राइस

सध्या सूरज एस्टेटचा शेअर 333 रुपयांवर ट्रेड होत आहे, जो त्याच्या उच्चांकापासून (842 रुपये, ऑगस्ट 2024) तब्बल 61% खाली आला आहे. मात्र, नुवामा ब्रोकरेजने या स्टॉकसाठी “BUY” रेटिंग कायम ठेवत 661 रुपयांचे लक्ष्य दिले आहे, जे सध्याच्या भावापेक्षा जवळपास 99% अधिक आहे. याआधी हे लक्ष्य 992 रुपये होते, जे 35% ने कमी करण्यात आले आहे.

बळकट प्रोजेक्ट पाइपलाइन आणि आगामी योजना

सूरज एस्टेट मुख्यतः साउथ सेंट्रल मुंबईत कार्यरत आहे आणि आतापर्यंत 10 लाख स्क्वेअर फूट बांधकाम पूर्ण झाले आहे. सध्या 13 प्रोजेक्ट्स सुरू असून 18 नवीन प्रोजेक्ट्सची घोषणा झाली आहे. FY26 च्या पहिल्या तिमाहीत कंपनी 1600 कोटी रुपयांच्या ग्रॉस डेव्हलपमेंट व्हॅल्यूसह 3 नवीन प्रोजेक्ट्स लॉन्च करणार आहे.

यामध्ये 2 निवासी आणि 1 व्यावसायिक प्रकल्प असतील. FY25–32 दरम्यान, कंपनी 7117 कोटी रुपयांचा ग्रॉस कॅशफ्लो आणि 3771 कोटी रुपयांचा नेट कॅशफ्लो निर्माण करेल, असा अंदाज आहे.

Q3 निकाल कसे आहेत?

तिसऱ्या तिमाहीत कंपनीच्या महसुलात 62% वाढ होऊन तो 172 कोटी रुपयांवर पोहोचला आहे. मात्र, EBITDA 34% घसरून 48 कोटींवर आला आहे, तर EBITDA मार्जिन 65.7% वरून 27.8% पर्यंत खाली आले आहे. प्रॉफिटमध्ये मात्र 20% वाढ झाली असून, तो 20 कोटी रुपयांवर पोहोचला आहे.

तथापि, कंपनीच्या विक्रीत घसरण झाली आहे. Q3 मध्ये विक्री 143 कोटींवरून 107 कोटींवर आली असून, विक्रीचे क्षेत्रफळ 35,537 स्क्वेअर फूट वरून 16,656 स्क्वेअर फूट इतके घटले आहे. प्री-सेल्समध्ये 29% घसरण झाली असून ती 102 कोटींवर आली आहे. यामागचे एक कारण म्हणजे तिसऱ्या तिमाहीत कोणताही नवीन प्रकल्प लॉन्च न होणे.

गुंतवणूकदारांसाठी संधी ?

सध्या सूरज एस्टेटचा शेअर त्याच्या IPO प्राइस (360 रुपये) पेक्षाही खाली व्यापार करत आहे. मात्र, कंपनीच्या भक्कम प्रोजेक्ट पाइपलाइन आणि लक्झरी सेगमेंटमधील वाढीच्या संधीमुळे ब्रोकरेज संस्थांनी आशादायी दृष्टिकोन ठेवला आहे.

येत्या तिमाहींमध्ये कंपनीकडून प्रोजेक्ट लॉन्च आणि कॅशफ्लो सुधारण्याची अपेक्षा आहे. अशा परिस्थितीत, गुंतवणूकदारांसाठी हा स्टॉक दीर्घकालीन दृष्टीने एक आकर्षक संधी ठरू शकतो.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!