स्पेशल

घरी बसून अशा पद्धतीने जमा करा डिजिटल हयात प्रमाणपत्र! ‘ही’ आहे शेवटची तारीख; नाहीतर पेन्शन होऊ शकते बंद

Published by
Ajay Patil

Digital Life Certificate:- देशामध्ये मोठ्या संख्येमध्ये पेन्शनधारक म्हणजे सेवानिवृत्ती धारक असून त्यांना सरकारच्या माध्यमातून पेन्शन म्हणजेच निवृत्तीवेतन दिले जात असते. परंतु यामध्ये काही नियम पाळणे देखील गरजेचे असते व त्यातीलच एक महत्त्वाचा नियम म्हणजे सेवानिवृत्तीधारकांना हयात असल्याचे प्रमाणपत्र दाखल करावे लागते.

हे प्रमाणपत्र जर दिलेल्या मुदतीमध्ये जमा केले नाही तर मात्र सेवानिवृत्ती वेतनधारकांची पेन्शन देखील थांबू शकते. त्यामुळे तुमच्या घरी पेन्शनधारक असतील तर त्यांचे हयात असल्याचे प्रमाणपत्र दाखल करणे गरजेचे असून त्यासाठी एक आठवड्याचे मुदत आता फक्त शिल्लक राहिली आहे.

हयात प्रमाणपत्र दाखल करण्याची शेवटची मुदत आहे 30 नोव्हेंबर 2024
सेवानिवृत्तीधारकांना हयात असल्याचे प्रमाणपत्र दाखल करण्यासाठी फक्त एक आठवड्याची मुदत आता बाकी राहिली असून 30 नोव्हेंबर पर्यंत ते जमा करणे खूप गरजेचे आहे. जर सेवानिवृत्तीधारकांनी 30 नोव्हेंबर पर्यंत हयात प्रमाणपत्र जमा केले नाही तर त्यांची पेन्शन म्हणजेच निवृत्तीवेतन देखील थांबू शकते.

परंतु यामध्ये बऱ्याचदा अनेकांना वृद्धापकालीन आजारांमुळे अनेक निवृत्तीवेतनधारकांना बँकेत जाता येत नाही. असे पेन्शनधारक बँकेच्या डोअर स्टेप सेवेचा लाभ घेऊ शकतात किंवा पोस्ट विभागाच्या सेवेचा देखील लाभ मिळू शकतात.

परंतु यामध्ये घरात जर 80 वर्षापेक्षा जास्त वयाची निवृत्ती धारक असतील तर अशांना घरातूनच डिजिटल लाईफ सर्टिफिकेट जमा करण्याची मुभा दिली असून ते हे सर्टिफिकेट यांची पेन्शन ज्या बँकेतून डीसबर्स म्हणजेच वितरित होते त्या ठिकाणी जमा करू शकतात किंवा आयपीपीबीमध्ये देखील जमा करू शकतात.

घरी बसून कशा पद्धतीने जमा करता येईल डिजिटल हयात प्रमाणपत्र?

1- याकरिता सगळ्यात अगोदर तुम्हाला तुमच्या मोबाईल किंवा कंप्यूटरमध्ये जीवन प्रमाणपत्र एप्लीकेशन डाउनलोड करावे लागेल.

2- हे एप्लीकेशन डाउनलोड केल्यानंतर त्या ठिकाणी आधार,पेन्शन पेमेंट ऑर्डर तसेच बँकेचा तपशील तसेच मोबाईल क्रमांक इत्यादी सारखी विचारलेली महत्त्वाची माहिती द्यावी.

3- त्यानंतर आधार पडताळणी करिता बायोमेट्रिक डिटेल्स जसे की फिंगरप्रिंट किंवा आयरिस स्कॅन करून घ्यावे.

4- अशा पद्धतीने पडताळणी यशस्वी झाल्यानंतर तुमच्या मोबाईलवर एसएमएस द्वारे प्रमाणपत्र येईल. हे प्रमाणपत्र लाइफ रिपॉझिटरीमध्ये ठेवतात व ते कधीही आणि कुठेही सहजपणे पाहता येऊ शकते.

5- जीवन प्रमाण संकेतस्थळावर प्रमाणपत्राचा आयडी टाकून ते डाऊनलोड देखील करता येते.

6- या रीपॉझिटरी मधून सेवानिवृत्ती वेतन डिसबर्सिंग संस्था देखील हे प्रमाणपत्र डाऊनलोड करू शकते व त्याशिवाय ई डिलिव्हरी सुविधाच्या माध्यमातून हयात प्रमाणपत्र थेट संस्थेपर्यंत देखील पाठवले जाऊ शकते.

पोस्टमन किंवा बँकेचे कर्मचारी घरी येऊन भरतात प्रमाणपत्र
हयात प्रमाणपत्र जमा करण्यासाठी अनेक बँकांच्या माध्यमातून व पोस्टल विभागाच्या माध्यमातून डोअर स्टेप बँकिंग सेवा देतात. याकरिता काही शुल्क द्यावे लागू शकते व काही बँकांच्या माध्यमातून ही सुविधा मोफत दिली जाते. तुम्ही जर संबंधित पोस्ट कार्यालयामध्ये अर्ज केला तर पोस्टमन घरी येऊन प्रमाणपत्र बनवायला तुम्हाला मदत करतात.

याशिवाय तुम्ही पोस्ट ऑफिसची वेबसाईट https/ccc.cept.gov.in/servicerequest/request.asbx यावर नाव, पत्ता तसेच ई-मेल, पिन कोड व मोबाईल क्रमांक दाखल करावा आणि ओटीपी वर क्लिक करावे. या प्रक्रियेनंतर देखील पोस्टमन घरी येऊन तुम्हाला प्रमाणपत्र बनवायला मदत करू शकतात.

Ajay Patil