स्पेशल

Success Story : लाखाची नोकरी सोडली आणि सुरू केला व्यवसाय ! आता कमावतोय करोडो !

Published by
Ajay Patil

Success Story:- व्यवसाय म्हटले म्हणजे एक जोखीमयुक्त काम समजले जाते. व्यवसाय वाढवण्यासाठी किंवा व्यवसायामध्ये यश मिळवण्यासाठी ज्याप्रमाणे कष्ट,जिद्द तसेच नियोजन व प्रयत्नातील सातत्य इत्यादी गुण आवश्यक असतात. अगदी त्याचप्रमाणे जोखीम पत्करण्याची तयारी असणे देखील तितके गरजेचे असते.

व्यवसायामध्ये कधी यश तर कधी अपयश पचवावे लागते व जेव्हा अपयश येते तेव्हा मात्र न खचता परत नव्या उमेदीने उठून अपयश का येते याचा शोध घेऊन पुन्हा सुरुवात करणे खूप गरजेचे असते. तसेच एखाद्या चांगल्या पगाराची नोकरी सोडून व्यवसायात पडणे म्हणजे याकरिता जे धाडस लागते ते प्रत्येकातच असेल असं नव्हे.

परंतु व्यवसायाच्या बाबतीत किंवा व्यवसायाची आवड असलेले लोक हे धाडस करतात आणि यशस्वी देखील होतात. त्यातल्या त्यात विदेशामध्ये जर लाखो रुपये पगाराची नोकरी असेल व सगळं आयुष्य हे अगदी सुस्थापित असेल तर अशावेळी या सगळ्या गोष्टी सोडून व्यवसायात पडणे म्हणजे पायावर धोंडा मारण्यासारखेच आहे.

परंतु काही व्यक्ती धोंडा मारून घ्यायला तयार असतात. अगदी याच पद्धतीचे धाडस पुणे जिल्ह्यातील पिंपरीचे भाऊसाहेब नवले यांनी केले व कोरोनाच्या कालावधीमध्ये ज्यांना स्वतःची नोकरी वाचवायची पडली होती त्या कालावधीत त्यांनी लाखोच्या पगाराची नोकरी सोडली व वेगळे करण्याचे धाडस दाखवत व्यवसायात उतरले आणि त्या व्यवसायातून आज कोट्यावधींची उलाढाल ते करत आहेत.

 अडीच लाख रुपये प्रति महिना पगाराची नोकरी सोडून थाटला व्यवसाय

याबाबत सविस्तर वृत्त असे की, पुणे जिल्ह्यातील रहिवासी असलेले भाऊसाहेब नवले यांनी महिन्याला अडीच लाख रुपयांची चांगल्या पगाराची नोकरीला रामराम ठोकला आणि व्यवसाय करण्याचे प्लॅनिंग आखली. हे प्लॅनिंग त्यांनी कोरोना कालावधीत आखली व ज्यावेळेस लोकांच्या हातचे काम हिरावून नेले जात होते तेव्हा त्यांनी त्यांच्या हातात असल्याचे काम सोडले व व्यवसाय सुरू केला.

ते मूळचे मावळ तालुक्यातील असून विदेशामध्ये त्यांना लाखोच्या पगारावर नोकरी होती. परंतु एवढ्या भरघोस पगाराची नोकरी सोडून त्यांनी भारतात परत येण्याचा विचार केला व ते परत आले देखील. हे जेव्हा घडले तेव्हा त्यांचे वय पन्नास वर्षे होते व या वयात त्यांनी भारतात परत येऊन मावळ तालुक्यामध्ये नर्सरी व्यवसाय सुरू करण्याचा प्लॅनिंग केला व ग्रीन अँड ब्लूम्स नर्सरी सुरू केली.

जर त्यांचे शैक्षणिक पार्श्वभूमी पाहिली तर ती बीएससी एग्रीकल्चर या विषयात पदवीधर असून या क्षेत्रातला त्यांना अनुभव चांगला असल्याने त्यांनी इनडोअर पॉट प्लांट नर्सरीचा व्यवसाय सुरू केला. जर त्यांचे आपण विदेशातील कारकीर्द पाहिली तर ती देखील वाखाणण्यासारखी आहे.

भाऊसाहेब नवले हे 1995 ते 2020 असे तब्बल 25 वर्ष नोकरी करत होते व त्यातील दहा वर्षे त्यांनी इथीओपीया या देशामध्ये पॉलिहाऊस मधील गुलाब उत्पादन कसे घेतले जाते याचा अभ्यास व अनुभव घेतलेला होता व तिथूनच पुन्हा ते भारतात आले व येथे एक नर्सरीमध्ये नोकरी करायला सुरुवात केली व त्या ठिकाणी त्यांना चांगला पगार होता.

परत असे असताना देखील त्यांनी कोरोना काळातच ही नोकरी सोडली व अर्ध्या एकरामध्ये नर्सरी व्यवसाय सुरू करून हळूहळू कष्टाने हा व्यवसाय वाढवला व आता अर्ध्या एकरावरून त्यांचा हा व्यवसाय एक एकर परिसरामध्ये पसरला आहे. भाऊसाहेब नवले हे त्यांच्या ग्रीन अँड ब्लूम्स नर्सरीमध्ये तब्बल 100 प्रकारच्या रोपांची लागवड करतात

व देशातील 300 छोट्या मोठ्या नर्सरी त्यांच्याकडून या रोपांची खरेदी करून विक्री करतात. या व्यवसायाच्या माध्यमातून त्यांना कोट्यावधी रुपयांचे उत्पन्न मिळायला लागले आहे व तसेच त्यांनी अनेक तरुणांना या माध्यमातून रोजगार देखिल मिळवून दिला आहे.

Ajay Patil