स्पेशल

कौतुकास्पद! शारीरिक अपंगत्व असतानाही शेतीमध्ये केला नवखा प्रयोग; एका एकरात ‘या’ जातीच्या टरबूज पिकातून मिळवले 3 लाखांचे उत्पन्न, पहा….

Published by
Ajay Patil

Success Story : अलीकडे शेती व्यवसायात रस नाही, शेतीतून अपेक्षित उत्पन्न मिळत नाही, कमी शेती आहे म्हणून शेती ऐवजी नोकरीच बरी असा ओरड नवयुकांकडून होत आहे. खरं पाहता, नैसर्गिक आपत्तीमुळे नवयुवकांचे हे बोलणं कदाचित योग्य पण असेल मात्र काही प्रयोगशील शेतकऱ्यांनी नैसर्गिक संकटांचा सामना करत शेतीमधून लाखो रुपयांची कमाई केली आहे. आज आपण अशाच एका अवलिया शेतकऱ्याची यशोगाथा जाणून घेणार आहोत. ज्यांनी मात्र एका एकरात तीन लाखांची कमाई केली आहे.

विशेष म्हणजे हा शेतकरी एका हाताने अपंग आहे. मात्र शारीरिक अपंगत्वाला आपल्या इच्छाशक्तीच्या जोरावर पराभूत करीत या शेतकऱ्याने एका एकरात मात्र 70 दिवसाच्या कालावधीमध्ये तीन लाखांची कमाई करून सर्वांनाच आश्चर्याचा सुखद धक्का दिला आहे. आम्ही बोलत आहोत अमरावती जिल्ह्यातील चांदूरबाजार तालुक्याच्या मौजे खरवाडी येथील रहिवासी अमोल रामदास भाजीपाले यांच्याविषयी.

हे पण वाचा :- महाराष्ट्रातील ‘त्या’ 15 जिल्ह्यात अतिमुसळधार पाऊस पडणार ! भारतीय हवामान विभागाचा इशारा

अमोल यांना एक हात नाही मात्र त्यांच्या मनात यशस्वी होण्याची अमाप जिद्द आहे. हेच कारण आहे की, त्यांनी शारीरिक अपंगत्वाला आपली कमजोरी न समजता, आपल्या इच्छाशक्तीच्या जोरावर शेती व्यवसायात चांगली कामगिरी करून दाखवली आहे. अमोल यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी आपल्या एक एकर शेत जमिनीत कलिंगड पिकाची सात हजार रोपे लावली होती. त्यांनी बाहुबली या कलिंगड जातीची लागवड केली. लागवडीनंतर योग्य पीक व्यवस्थापन केले.

यामुळे पीक चांगले जोमदार आले आणि विक्रमी असे दर्जेदार टरबूजचे उत्पादन त्यांना मिळाले. लागवड केल्यानंतर मात्र 70 दिवसात त्यांना यापासून उत्पादन मिळाले असून एक नंबरच 35 क्विंटल टरबूज आतापर्यंत प्राप्त झाले आहे. दोन नंबरचा तोडा अजून बाकी आहे. येत्या काही दिवसात दोन नंबरचा तोडा देखील पूर्ण होईल आणि यातून अधिकची कमाई त्यांना होणार आहे.

हे पण वाचा :- ठाणे ते बोरिवली प्रवास आता फक्त 20 मिनिटात; भूमिगत मार्गाच्या वाढीव खर्चास प्राधिकरणाची मान्यता, केव्हा सुरु होणार काम?…

ते सांगतात की, एक एकर टरबूज शेतीसाठी त्यांना जवळपास 95 हजाराचा खर्च आला आहे. यामध्ये मल्चिंग ठिबक सिंचन यांसारख्या खर्चाचा आणि रोपांच्या खर्चाचा समावेश आहे. एक नंबर टरबूज विक्रीतून त्यांना दोन लाख 75 हजार रुपये इतक उत्पन्न मिळालं असून आगामी काही दिवसात दोन नंबरच्या टरबूज विक्रीतून आणखी उत्पन्न मिळणार आहे. यामुळे खर्च वजा जातात त्यांना जवळपास दोन लाखांची निव्वळ कमाई होण्याची आशा आहे.

एकीकडे नवयुवक शेतकरी शेती व्यवसायात राम उरलेला नाही असं म्हणतं शेती ऐवजी नोकरीला प्राधान्य देत आहेत तर एका हाताने अपंगत्व आलेल्या या युवा प्रयोगशील शेतकऱ्याने मात्र नोकरी ऐवजी शेतीमध्येच राम आहे असं सिद्ध करून दाखवलं आहे. निश्चितच या युवा शेतकऱ्याचा प्रयोग इतरांसाठी मार्गदर्शक आणि प्रेरणादायी सिद्ध होणार आहे.

हे पण वाचा :- चर्चा तर होणारच! शेतकऱ्याने कांद्याच्या शेतात उभारली अनोखी गुढी; बळीच राज्य येऊ दे! म्हणतं शासनाकडे घातलं साकडं

Ajay Patil