Success Story : शेती व्यवसायात काळाच्या ओघात मोठा बदल होत आहे. आता शेतकरी बांधव पारंपारिक पिकांच्या शेती ऐवजी हंगामी अन नगदी तसेच फळबाग पिकांच्या शेतीकडे वळले आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातील एका परीक्षेला युवा शेतकऱ्यांनी देखील पारंपारिक पिकांसोबतच कलिंगड या हंगामी पिकाच्या शेतीतून चांगले विक्रमी उत्पादन मिळवून दाखवले आहे. विशेष म्हणजे या तरुणाने सेंद्रिय पद्धतीने कलिंगड उत्पादित केले आहे.
यामुळे हा सेंद्रिय शेतीचा प्रयोग पंचक्रोशीत चांगलाच चर्चेचा विषय ठरत आहे. संगमेश्वरनजीकच्या लोवले येथील शुभम दोरखडे या युवा शेतकऱ्याने आपल्या दहा गुंठे शेत जमिनीत कलिंगड लागवड करत सेंद्रिय पद्धतीने यातून पाच क्विंटल एवढे विक्रमी उत्पादन मिळवले आहे. अजूनही यातून दोनदा त्यांना उत्पादन मिळणार आहे. शुभम वास्तविक कृषी पदवीधर आहेत.
मात्र पदवीचे शिक्षण झाल्यानंतर नोकरी एवजी त्यांनी शेती व्यवसायात आपलं नशीब आजमावलं. त्यांचा हा निर्णय मात्र त्यांच्यासाठी आता फायदेशीर ठरला आहे. शुभम यांनी सांगितल्याप्रमाणे त्यांनी आपल्या दहा गुंठे शेत जमिनीत तीन टप्प्यात मेलोडी या जातीच्या कलिंगडची लागवड केली. तीन टप्प्यात त्याची लागवड केली असून पहिल्या टप्प्यात पाच क्विंटल उत्पादन मिळाल असून आणखी दोनदा त्यांना यातून उत्पादन मिळणार आहे.
विशेष म्हणजे कलिंगड चे पीक सेंद्रिय पद्धतीने त्यांनी उत्पादित केले असून शेणखत, वर्मी कंपोस्ट यांसारख्या सेंद्रिय खतांचा वापर त्यांनी केला आहे. यामुळे सेंद्रिय शेती करूनही दर्जेदार उत्पादन मिळवले जाऊ शकते हेच शुभम यांनी दाखवून दिले आहे. कलिंगड सोबतच शुभम यांनी इतरही भाजीपाला वर्गीय पिकांची शेती सुरू केली आहे.
काकडी, वांगी यांसारख्या तरकारी पिकांची ते शेती करत असून उत्पादित होणारा शेतमाल स्वतःच स्टॉल लावून विक्री करत आहे. यामुळे दिवसाकाठी दोन हजारापर्यंतची कमाई त्यांना होत आहे. शुभमचे रस्त्यालगत घर असल्याने तिथेच स्टॉल उभारून तिथेच कलिंगड आणि भाजी विक्री सुरू केली आहे.
त्याने उत्पादित केलेले भाजीपाला आणि कलिंगड पीक सेंद्रिय पद्धतीने
उत्पादित केलेले असल्याने या शेतमालाला मोठी मागणी असून दिवसाकाठी दोन हजाराची कमाई होत असल्याने आर्थिक चणचण दूर झाल्याचे शुभम सांगतो. निश्चितच शुभम यांचा हा प्रयोग इतरांसाठी मार्गदर्शक राहणार असून सेंद्रिय शेती देखील फायदेशीर ठरू शकते हे शुभमने दाखवून दिले आहे.