स्पेशल

Success Story: कोल्हापूर जिल्ह्यातील पाच भावंडांच्या शेतीला विदेशी पर्यटक देतात भेट! शेतीत असं काही केलं की लाखोत कमवतात पैसे

Published by
Ajay Patil

Success Story:- एकीकडे शेती आणि शेतकरी निसर्गाच्या अवकृपेने त्रस्त असताना मात्र काही शेतकरी वेगवेगळ्या कल्पना लढवून आणि प्रयोगशील वृत्ती जपत शेतीत खूप वेगवेगळे प्रयोग करत आहेत व या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर पैसा देखील कमावत आहेत.

विशेष म्हणजे शेतीमध्ये तंत्रज्ञानाचा शिरकाव झाल्यामुळे शेतकऱ्यांनी शेतीमधील घेण्यात येणारे पारंपारिक पिके आणि शेतीचे पारंपारिक पद्धत सोडून त्या ऐवजी आधुनिक शेतीची कास धरल्याचे आपण पाहतो. परंतु याही पलीकडे जात काही शेतकरी मात्र त्यांच्या कल्पना वेगवेगळ्या पद्धतीने शेतीत उतरवतात आणि इतर शेतकऱ्यांपेक्षा ते वेगळे ठरतात.

अगदी याच पद्धतीने जर आपण कोल्हापूर जिल्ह्याच्या पन्हाळगडाला लागून असलेल्या माले या गावच्या चौगुले बंधूंची यशोगाथा पाहिली तर ती खूप प्रेरणादायक अशी आहे. वीस वर्षांपूर्वी एक झाड एक कुटुंब या ब्रीदवाक्यानुसार पर्यावरणाची आवड असलेले रघुनाथ चौगुले यांनी  फळझाडांची लागवड केली व ही लागवड ज्या ठिकाणी पाण्याचे स्त्रोत उपलब्ध नव्हते

अशा फोंड्या माळावर केली व तिथूनच त्यांनी हळूहळू आठवण मातीची हे पर्यटन केंद्र विकसित केले. आज या पर्यटन केंद्राला देशातीलच नव्हे तर विदेशातील पर्यटक देखील भेट देतात.

 पाच भावंडांनी कोल्हापुरात उभारले कृषी पर्यटन केंद्र

जेव्हा संपूर्ण जग कोरोनाच्या सावटाखाली होते आणि सर्व जग एका जागेवर थांबलेले होते. अशा बिकट परिस्थितीमध्ये मात्र या पाचही भावांनी तारांकित असे कृषी पर्यटन केंद्र उभारण्याचा संकल्प केला. या ठिकाणी दररोज हजारांच्या संख्येने विदेशातून देखील पर्यटक मोठ्या प्रमाणावर भेट देतात व ग्रामीण जीवन व आपल्याकडील आहार संस्कृती त्याचा मनमुराद आनंद घेतात.

जेव्हा कोरोनाचा कालावधी होता तेव्हा चौगुले कुटुंबांनी निसर्गाच्या सानिध्यात राहता यावे म्हणून त्यांच्या या फळांच्या बागेमध्ये पर्यावरण पूरक असे झोपडी वजा घर बनवले व त्याठिकाणी राहायला गेले. तेव्हा त्यांना या पर्यटन केंद्राची संकल्पना सुचली. यावेळेस त्यांनी त्यांचे काही नातेवाईकांचे सहकार्य घेतले व आठवण मातीची हे कृषी पर्यटन केंद्राची सुरुवात केली.

अगोदरच त्यांच्या शेतामध्ये असलेली चिकू, आंबा तसेच पेरू या फळांचे झाडे आणि कडूनिंब, दालचिनी, कोरफड आणि अडुळसा या औषधी वनस्पतींचा समावेश असलेले आणि खेड्यांची संस्कृती कशी असते याच्याशी सुसंगत असे कृषी पर्यटन केंद्र आकाराला आणले.

चौगुले बंधूंच्या या उपक्रमाला त्यांच्या भाऊबंदकीने देखील कुठल्याही पद्धतीने रस्त्यांच्या बाबतीत आडकाठी आणली नाही. त्यांच्या भाऊबंदकीने देखील त्यांच्या या प्रयत्नाला साथ दिली व आज या कृषी पर्यटन केंद्राची प्रसिद्धी संपूर्ण जिल्हाभर पोचली आहे.

 ऐतिहासिक अशा माले या गावात आहे हे पर्यटन केंद्र

माले या गावाचा जर आपण ऐतिहासिक ठेवा पाहिला तर तो खूप मोठा आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर संभाजी महाराज यांचे शेवटची भेट झालेल्या पन्हाळगड जवळ हे गाव असून गावाच्या पश्चिम दिशेला पन्हाळगड जणू या गावाचे रक्षण करतो असे आपल्याला वाटते.

तसेच हे गाव पन्हाळा तालुक्यात असून वारण्या खोऱ्यातील एक समृद्ध गाव म्हणून ओळखले जाते. याच गावांमध्ये रघुनाथ चौगुले यांचे बारा एकर बागायती शेती असून त्यातले सहा एकर शेतीवर त्यांनी वृक्ष लागवड केली व एखाद्या वेळेस कावडीने पाणी आणून ही झाडे जगवली व याच ठिकाणी हे पर्यटन केंद्र आज उभे राहिले आहे.

त्यांचे हे पर्यटन केंद्राची महती आज सोशल मीडियाच्या माध्यमातून संपूर्ण जगात पोचली आहे व ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड,श्रीलंका इत्यादी ठिकाणी अनेक विदेशी पर्यटक या ठिकाणी असलेल्या  ग्रामीण संस्कृतीचा आनंद घेण्यासाठी या कृषी पर्यटन केंद्राला आवर्जून भेट देतात. साधारणपणे गेल्या पाच वर्षाच्या कालावधीत साडेतीनशे विदेशी पर्यटक या ठिकाणी भेट देऊन गेले आहेत.

Ajay Patil