स्पेशल

Success Story Of Suhana Masale : पारनेरच्या चोरडियांनी खडतर परिस्थितीत सुरू केला सुहाना मसाला ! आज आहे कोट्यावधीची उलाढाल

Published by
Ahmednagarlive24 Office

Success Story Of Suhana Masale :- मसाले हे पदार्थ भारतीय खाद्य संस्कृतीतील किंवा भारतीय आहारातील एक महत्त्वाचा पदार्थ असून मसाल्यांशिवाय आहार किंवा खाद्यपदार्थांची चव किंवा रंगत पूर्णच होऊ शकत नाही.

मसाल्यांचा विचार केला तर भारतीय बाजारपेठेमध्ये अनेक मसाले ब्रँड आहेत. अनेक छोट्या मोठ्या कंपन्या देखील या क्षेत्रात असून भारतामध्ये मसाल्यांची बाजारपेठे फार मोठी आहे. परंतु यामध्ये जर आपण प्रवीण मसाले वाले किंवा सुहाने मसाले हे नाव ऐकल्यानंतर एक आपलेपणा किंवा गेल्या कित्येक वर्षापासून भारतीयांच्या मनामध्ये एक नाव कोरून राहिलेले आहे.

महाराष्ट्रातून सुरुवात झालेल्या या मसाल्या ब्रँडची आज जागतिक स्तरावर मोठी ओळख आहे. याच निमित्ताने आपण या लेखात प्रवीण किंवा सुहाना मसाले यांची सुरुवात कशी झाली याबद्दलची यशोगाथा बघणार आहोत.

खडतर परिस्थितीत झाली सुरुवात

प्रवीण मसाले, सुहाना मसाले आणि अंबारी या सर्व मसाला उत्पादनांचे निर्माते हे एकच असून या कुटुंबाचे नाव आहे चोरडिया कुटुंब हे होय. हुकुमचंद चोरडिया आणि त्यांच्या पत्नी कमलाबाई चोरडिया हे चोरडिया दांपत्य मूळचे नगर जिल्ह्यातील पारनेरचे. परंतु त्यांचे पुण्यातील वडगाव धायरी या परिसरामध्ये किराणा मालाचे दुकान होते. या दाम्पत्याने अनेक आर्थिक आव्हानांचा सामना करत मोठ्या नेटाने व्यवसायामध्ये वाटचाल सुरू ठेवलेली होती.

प्रवीण मसाले वाल्यांचा जो काही व्यवसाय आहे त्याची सुरुवात 1962 मध्ये झालेली होती. परंतु या व्यवसायाची जी काही सुरुवात आहे किंवा जे काही बीज आहे ते सोलापुरामध्ये रोवले गेले होते. जेव्हा चोरडिया दांपत्य हे आर्थिक अडचणींचा सामना करत होते त्यावेळीसच हुकमीचंद यांना कमलाबाईंनी मसाल्याचा व्यवसाय सुरू करावा अशी आयडिया दिली व लागलीस त्यांनी या व्यवसायाला सुरुवात करून आनंद मसाला या नावाने मसाला बाजारपेठेत पहिले पाऊल ठेवले.

परंतु अगोदर मसाला तयार करताना कमलाबाई या दररोज वीस ते पंचवीस किलोचा मसाला घरीच कुटून देत आणि हुकमी चंद हे सायकलवर फिरून सोलापूरमध्ये त्या मसाल्याची विक्री करत. अफाट कष्टाने त्यांचा कांदा मिरची मसाला खूप प्रसिद्ध होऊ लागला आणि त्याची मागणी प्रचंड वाढू लागली. परंतु काही कारणास्तव हे दांपत्य सोलापूर सोडून पुन्हा पुण्यामध्ये आले व परत तेच मागचे दिवस सुरू झालेत. परंतु याही वेळी हार न म्हणता कमलाबाई पुन्हा तयार झाल्या व मसाला बनवायला सुरुवात केली.

यावेळेस मात्र कमलाबाई कांदा लसूण मसाला आणि गरम मसाला देखील तयार करू लागल्या. त्यांनी पुण्यातून सुरुवात केलेल्या या व्यवसायाला त्यांच्या दुसऱ्या मुलाच्या नावावरून प्रवीण हे नाव दिले व सुरुवात झाली प्रवीण मसाल्याची. त्यांचे अगोदर हत्ती हे मसाल्याचे चिन्ह होते.

त्यामुळे हत्ती छाप मसाले म्हणून देखील बाजारपेठेमध्ये त्यांची चांगली ओळख झाली. साधारणपणे 1970 च्या कालावधीत त्यांचा व्यवसाय चांगला जोम धरू लागला. कालांतराने हुकमीचंद चोरडिया यांचा मोठा मुलगा राजकुमार याचे शिक्षण सुरू होते व तो देखील त्यांना मदत म्हणून व्यवसाय मध्ये लक्ष देत होता.याच कालावधीत त्यांनी मसाल्यांसोबत लोणची देखील तयार करावे अशा पद्धतीचा निर्णय घेतला. कारण त्यावेळी कुठल्याही कंपनीचे लोणचे बाजारपेठेत नव्हती.

म्हणून त्यांनी 1977 ते 78 या कालावधीत लोणचे बनवायला सुरुवात केली व त्यासोबतच 1980 ते 82 या कालावधीत मसाल्यांचे जास्तीचे प्रकार बाजारपेठेमध्ये आणले. परंतु चोरडिया यांनी तयार केलेल्या लोणच्याची जी काही रेसिपी होती ती खूप ग्राहकांच्या पचनी पडली.

चोरडिया हे त्यांच्या दुकानांमध्ये येणाऱ्या ग्राहकांना मसाले व लोणच्यांबद्दल फीडबॅक कायम विचारत आणि त्यानुसार त्या उत्पादनामध्ये बदल करत. बाजारामध्ये त्यावेळी त्यांना ज्या उत्पादनांची स्पर्धा होती त्यांच्याशी स्पर्धा न करता आपण ग्राहकांना वेगळे काय देऊ शकतो याच्यावर त्यांनी लक्ष केंद्रित केले. त्यामुळे चव तर स्वादिष्ट असावीच परंतु मसाल्यांचे पॅकिंग आकर्षक असणे गरजेचे आहे व या दृष्टिकोनातून त्यांनी काम केले.

तसेच लोणचे व मसाले यांची चव उत्तम असावी याकरता त्यांनी कच्चामाल देखील उत्तम दर्जाचा वापरला. हे सत्व प्रवीण मसाल्याने नेहमी पाळल्यामुळे आज देखील ग्राहकांच्या मनामध्ये या मसाल्यांचे मोठ्या प्रमाणावर नाव आहे.

रेडी टू कुक मसाल्यांमध्ये सुहाना मसाला आहे प्रसिद्ध

प्रवीण या ब्रँड खालीच त्यांनी लोनची तसेच सुहाना या नावाखाली वेगवेगळे मसाले आणि रेडी टू कूक उत्पादने आणि अंबारी या नावाने उत्पादने सुरू केली. यामध्ये त्यांनी जुन्या पद्धतीचे गोडा मसाला व कांदा लसूण मसाला सारखे मसाले अशी विभागणी केली.

साधारणपणे 1987 ते 88 मध्ये त्यांनी इन्स्टंट मसाले मार्केटमध्ये आणले आणि नंतर रेडी टू कुक बाजारात आले. प्रवीण चे मसाले 1985 पासून पुण्या बाहेर विक्रीसाठी जाऊ लागले. अगदी सुरुवातीला चोरडिया कुटुंब मसाल्यांच्या विक्रीसाठी स्वतः बाहेर जायचे परंतु 1995 नंतर मात्र अनेक किरकोळ दुकानांमध्ये मसाल्यांची विक्री होऊ लागली.

आज महाराष्ट्रात कानाकोपऱ्यात त्यांचे मसाले मिळतात परंतु देशातील नऊ राज्यात देखील आता हे मसाले मिळतात. एवढेच नाही तर भारता व्यतिरिक्त इतर पंचवीस देशात देखील त्यांनी आता हे मसाले उपलब्ध करून दिलेले आहेत. हुकुमीचंद चोरडिया आणि राजकुमार चोरडिया यांच्या मार्गदर्शनाखाली आता विशाल आणि आनंद चोरडिया हे मार्केटिंग आणि उत्पादन विकासाचे काम पाहतात.

जागतिक आणि देशपातळीवर ज्या काही मसाल्यांच्या चवीसाठीच्या स्पर्धा आयोजित केल्या जातात त्यामध्ये चोरडिया सहभागी होतात. या स्पर्धांमुळे आजही आपण कुठे आहोत किंवा कुठे कमी आहोत हे समजते व त्या दृष्टीने त्यांना बदल करता येतो.

किराणा दुकानातून चोखंदळ पुणेकरांच्या ज्या काही फीडबॅक आले त्यामधून आपण शिकलो असे देखील राजकुमार चोरडिया नमूद करतात. अगदी घरातून सुरु केलेला हा मसाला उद्योग आता जागतिक पातळीवर पोहोचला असून या मसाल्यांची कोट्यावधींची उलाढाल आहे.

Ahmednagarlive24 Office