स्पेशल

पुणेकरांचा नाद नाही करायचा ! प्रयोगशील शेतकऱ्याने वयाच्या 79व्या वर्षी फुलवली फळबाग ; आता होतेय लाखोंची कमाई, पहा ही भन्नाट यशोगाथा

Published by
Ajay Patil

Success Story : अलीकडे नवयुवक शेतकरी शेतीमध्ये दम नाही, शेती परवडत नाही यांसारखी ओरड करत असतात. निश्चितचं निसर्गाचा लहरीपणा, बाजारात मिळत असलेला कवडीमोल दर यापेक्षाही महत्वाचं म्हणजे शासनाचं शेतकऱ्यांप्रती असलेलं उदासीन धोरण यामुळे शेती करणे मोठ्या जिकिरीचे बनले आहे. अनेकदा शेतकऱ्यांना शेतीमधून अपेक्षित असे उत्पन्न मिळत नाही.

परिणामी शेतकरी बांधव कर्जबाजारी बनतात. मात्र असे असले तरी काही प्रयोगशील शेतकरी आपल्या नवनवीन प्रयोगाच्या माध्यमातून या प्रतिकूल परिस्थितीत देखील शेतीमधून लाखो रुपयांची कमाई करत आहेत. दरम्यान आज आपण पुणे जिल्ह्यातील अशा एका 79 वर्षाच्या तरुण शेतकऱ्याची यशोगाथा जाणून घेणार आहोत ज्याने आपल्या नवनवीन प्रयोगाच्या माध्यमातून नवयुवक तरुणांना देखील विचारात पाडलं आहे.

भोर तालुक्यातील उत्रोली येथील गोविंद विनायक चंद्रस या 79 वर्षाच्या तरुण शेतकऱ्याने पारंपारिक पिकपद्धतीला फाटा देत फळबाग लागवडीतून विक्रमी उत्पन्न कमवून दाखवल आहे. त्यांनी परिसरात घेतल्या जाणाऱ्या भात पिकाला फाटा दिला असून त्याऐवजी नारळ, चिक्कू, आंबा, पपई, पेरू, शेवगा, लिंब, जांभूळ यांसारख्या फळझाडांचीं बाग फुलवली आहे. विशेष म्हणजे या फळपिकांसोबतच वयाच्या 79 व्या वर्षी गोविंद रावांनी शेती मध्ये भन्नाट असे प्रयोग केले आहेत.

या फळबाग पिकांमध्ये त्यांनी इतर पिके आंतरपिके म्हणून घेतली आहेत. यात ज्वारी, घेवडा, वाटाणा, हरभरा, यांचा समावेश आहे. शिवाय 15 एकर क्षेत्राच्या विकासासाठी त्यांनी जलसिंचनाची देखील सोय केली आहे. एवढेच नाही तर काळ्या आईच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ नये यासाठी जमिनीच्या सुपीकतेकडे त्यांनी लक्ष केंद्रित केले आहे. म्हणजेच जे काम नवयुवक तरुणांना अनेकदा करता येत नाही ते काम गोविंदराव यांनी करत शेतकऱ्यांपुढे एक मोठा आदर्श उभा केला आहे.

खरं पाहता गोविंदराव महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळमध्ये इलेक्ट्रिशन या पदावर कार्यरत होते. अगदी लहानपणापासून शेतीची आवड असल्याने निवृत्तीनंतर आपली ही आवड जोपासण्यासाठी त्यांनी शेती सुरू केली. विशेष म्हणजे शेतीमध्ये नवनवीन प्रयोग घेतलेत. अधिक पाणी अन मेहनत लागत असल्याने त्यांनी भात पिकाला फाटा देत फळबाग लागवड केली आहे. त्यांनी विकसित केलेल्या या फार्मला त्यांनी गोविंद बाग असं नाव दिल आहे.

त्यांनी 60 नारळ, 50 चिक्कू, 50 पेरू, 70 पपई, 50 केळी, 50 आंब्याची झाडे लावली आहेत. गेल्या दोन वर्षांपासून नारळ, पेरू, चिक्कू, पपई यापासून आता त्यांना उत्पन्न मिळू लागल आहे. निश्चितचं वयाच्या 79 वर्षी सुध्दा नियमित शेतीत जाऊन फळबागेतील देखभाल करत लाखो रुपयांचे उत्पादन घेत गोविंदरावांनी इतर तरुणांसाठी एक आदर्श असं काम केल आहे. 

नादखुळा ! युट्युबचे व्हिडिओ पाहून सुचली विदेशी भाजीपाला लागवडीची कल्पना ; आता कमवतोय लाखों

 

Ajay Patil

Published by
Ajay Patil