स्पेशल

Success Story: ‘हा’ शेतकरी घेतो 200 एकर क्षेत्रावर भाजीपाला पिके आणि कमवतो कोट्यावधी रुपये! वाचाल या शेतकऱ्याची यशोगाथा तर डोकं होईल सुन्न

Published by
Ajay Patil

Success Story:- व्यावसायिक दृष्टिकोनातून शेती आणि परंपरागत शेती त्यामधील प्रमुख फरक जर बघितला तर अगोदर फक्त उदरनिर्वाह पूरती शेती केली जायची व यामध्ये प्रामुख्याने ज्वारी तसेच बाजरी व इतर कडधान्य वर्गीय पिकांचा मोठ्या प्रमाणावर समावेश असायचा.

परंतु आता तंत्रज्ञानाचा वापर होऊ लागल्याने शेतकरी भाजीपाला आणि फळबाग लागवडीकडे मोठ्या प्रमाणावर वळले असून अगदी कमीत कमी क्षेत्रामध्ये देखील शेतकऱ्यांनी भरघोस उत्पादन मिळवून लाखोत उत्पन्न मिळवण्याची किमया साधली आहे व खऱ्या अर्थाने शेतीमधील व्यावसायिक दृष्टिकोन किंवा व्यावसायिकपणा जपण्याचा प्रयत्न केला आहे.

अनेक उच्चशिक्षित तरुण आता शेतीकडे वळल्यामुळे शेतीचा पार चेहरा मोहराच बदलून गेला आहे. अगदी या पद्धतीने जर आपण मध्यप्रदेश राज्यातील हरदा जिल्ह्यातील मधुसूदन धाकड या प्रयोगशील शेतकऱ्याची यशोगाथा बघितली तर या शेतकऱ्याने कष्ट आणि समर्पणाच्या जोरावर शेतीतील फलोत्पादनाच्या क्षेत्रामध्ये एक नवीन उदाहरण निर्माण केले आहे.

अवघ्या दहावीपर्यंत शिक्षण घेतलेल्या मधुसूदन धाकड यांनी फलोत्पादनाचा शेतीमध्ये अवलंब केला व आर्थिक स्थितीत कमालीचे सुधारणा करून तंत्रज्ञानाचा वापर आणि उत्पन्न देखील काही पटींनी वाढवले आहे.

आज ते दोनशे एकर जमिनीवर मिरची, सिमला मिरची तसेच टोमॅटो, लसूण व आले तसेच त्यासोबत इतर अनेक पिकांचे उत्पादन घेतात व त्या माध्यमातून कोट्यावधी रुपयांचे उत्पन्न मिळवत आहेत. त्यामुळे मधुसूदन धाकड यांची यशोगाथा ही इतर शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी आहे.

 मधुसूदन धाकड यांची यशस्वी शेती

मध्यप्रदेश राज्यातील हरदा जिल्ह्यातील रहिवासी असलेले मधुसूदन धाकड यांनी कष्टाच्या जोरावर शेती क्षेत्रामध्ये स्वतःचे यशस्वी शेतकरी म्हणून नाव तर कमावलेच परंतु शेती व्यवसायाला एक क्रांतिकारी वळण मिळवण्याच्या दृष्टिकोनातून देखील त्यांचे काम महत्त्वपूर्ण आहे.

फलोत्पादन क्षेत्रामध्ये अनन्य साधारण काम त्यांनी केले असून आज ते 200 एकर जमिनीवर सिमला मिरची पासून तर टोमॅटो, लसुन व आल्यासारखे इतर पिकांचे उत्पादन घेतात व त्या माध्यमातून कोट्यावधी रुपयांचे उत्पन्न मिळतात. शेतीमध्ये आधुनिकता आणि नाविन्य स्वीकारून त्यांनी पूर्ण बदल केला असून अनन्यसाधारण असे यश मिळवलेले आहे.

घरात कौटुंबिक वातावरण हे शेतीशी निगडित असल्याने त्यांना लहानपणापासून त्यांना शेतीतील बारकावे समजले व ते खोलवर रुजले.आज दोनशे एकर जमिनीपैकी 130 एकरवर फळबागांची लागवड केलेली आहे तर इतर क्षेत्रावर भाजीपाला पिके घेऊन कोट्यावधी रुपये कमवत आहेत.

 मिरचीचे लक्षणीय उत्पादन

मधुसूदन धाकड हे 40 एकर जमिनीवर मिरचीची लागवड करून उत्पादन घेतात. याकरिता एकरी 70 हजार रुपयांचा खर्च त्यांना येतो व 150 ते 200 क्विंटल पर्यंत मिरचीचे उत्पादन ते मिळवतात व एकरी तीन लाख रुपये त्यांचे आर्थिक उत्पन्न पोहोचते.

त्याशिवाय सिमला मिरचीची लागवड 25 एकर क्षेत्रावर ते करतात. सिमला मिरचीच्या लागवडीकरिता एकरी एक लाख रुपये खर्च त्यांना येतो व नफा देखील तितकाच चांगला मिळतो.

दोनशे ते अडीचशे क्विंटल पर्यंत सिमला मिरचीचे उत्पादन ते मिळवतात व प्रति एकर 6 लाख रुपयापर्यंत उत्पन्न त्यांना मिळते.

 टोमॅटोचे उत्पादन

मधुसूदन धाकड हे पन्नास एकर जमिनीवर टोमॅटोची लागवड करतात व त्याकरिता एकरी एक लाख रुपये खर्च त्यांना येतो व त्या माध्यमातून दर्जेदार उत्पादन मिळतात.

एका एकरमधून साधारणपणे 1000 ते 1200 कॅरेट टोमॅटोचे उत्पादन त्यांना मिळते व प्रति एकर तीन लाखापर्यंत आर्थिक उत्पन्न मिळते.

 लसणाची लागवड

इतकेच नाही तर ते लसणाची शेती देखील करतात. साधारणपणे 15 एकर जमिनीवर लसण पिक घेतात व प्रति एकर त्याकरिता दोन लाख रुपये खर्च त्यांना येतो. लसणापासून त्यांना चांगला नफा मिळतो व लसणाचे एकरी सात लाख रुपये त्यांना मिळतात.

 आल्याचे उत्पादन

आले लागवडीत देखील त्यांनी विशेष प्राविण्य मिळवले असून आल्याची लागवड देखील ते मोठ्या प्रमाणावर करतात व याकरिता एकरी दोन लाख रुपये खर्च त्यांना येतो. आल्याचे एकरी शंभर ते 110 क्विंटल उत्पादन ते मिळवतात. अशाप्रकारे ते या पिकांशिवाय इतर भाजीपाला पिकांची देखील मोठ्या प्रमाणावर लागवड करतात.

 भाजीपाला पिकाची रोपवाटिका स्वतः तयार करतात

मधुसूदन धाकड यांचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे ते स्वतःच्या शेतीसाठी आवश्यक असलेला रोपांची रोपवाटिका स्वतःच तयार करतात

व त्यांच्या रोपवाटिकेत 20 लाखांपेक्षा अधिक रोपे तयार केले जातात व ही सगळी रोपे त्याच्या शेतामध्ये विविध पिकांच्या लागवडीसाठी वापरली जातात. कष्ट आणि उपलब्ध साधनांचा योग्य वापर करून ते रोपवाटिकेचे काम व्यवस्थितपणे पार पडतात.

 संपूर्ण देशभरात विकला जातो भाजीपाला

मधुसूदन धाकड हे दर्जेदार उत्पादन घेतात व कष्टाने पिकवलेला हा भाजीपाला देशातील विविध राज्यांमध्ये ते विक्री करतात व दर्जेदार उत्पादन असल्यामुळे अनेक राज्यांमध्ये त्यांनी स्वतःचा ठसा उमटवला आहे.

मधुसूदन धाकड हे केवळ स्थानिक बाजारपेठेपुरते मर्यादित नसून त्यांचा भाजीपाला देशाच्या कानाकोपऱ्यात पाठवला जातो. इतकेच नाही तर अनेक व्यापारी त्यांच्या शेतात येऊन भाजीपाला पिकांची खरेदी करतात.

त्यामुळे त्यांना चांगला भाव देखील मिळतो व वाहतूक खर्च वाचून नफा जास्त मिळतो. तसेच ते भाजीपाला विक्रीकरिता अनेक प्रकारच्या मार्केटिंग आणि विक्रीच्या नवनवीन पद्धती वापरतात व त्यामुळे बाजारपेठेत देखील जास्त भाव मिळतो.

Ajay Patil