स्पेशल

सुजय विखेंचा यंत्र पडताळणीद्वारे मोठा डाव ! निलेश लंकेंची खासदारकी कोर्टात ? पहा स्पेशल रिपोर्ट

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर लोकसभा मतदारसंघातील भाजपचे पराभूत उमेदवार डॉ. सुजय विखे यांनी मतदान यंत्रे व व्हीव्हीपॅटच्या पडताळणीसाठी जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांच्याकडे अर्ज केला आहे. ४० मतदान यंत्रांची पडताळणी होणार आहे. लोकसभेची मतमोजणी ४ जून रोजी झाली.

तत्पूर्वी १ जूनला निवडणूक आयोगाने सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार नवीन आदेश जारी केला. त्यानुसार क्रमांक २ व क्रमांक ३ ची मते मिळालेल्या पराभूत उमेदवारांना एकूण ५ टक्के मतदान यंत्र व व्हीव्हीपॅट पडताळण्याची सवलत दिली आहे. मात्र त्यासाठी मतमोजणी झाल्यानंतर ७ दिवसात अर्ज सादर करणे बंधनकारक आहे. त्यानुसार डॉ. विखे यांनी या सवलतीचा लाभघेत पडताळणीसाठी अर्ज केला आहे. त्यामुळे आता नगर शहर ५, शेवगाव-पाथर्डीतील ५, राहुरीतील ५, कर्जत-जामखेडमधील ५, पारनेरमधील १० व श्रीगोंद्यातील १० अशा एकूण ४० मतदान यंत्रे व व्हिव्हिपॅट पडताळणी होईल.

आता या प्रकरणात पुढे काय होऊ शकते?
बंगळूर येथील ईव्हीएम व व्हीव्हीपॅट निर्मिती करणाऱ्या बेल कंपनीच्या अभियंत्याकडून निश्चित केलेल्या दिवशी ४० मतदान केंद्रांवरील बॅलेट कंट्रोल युनिट (बीयू), व्हीव्हीपॅट व ईव्हीएम मशिन या यंत्रांची तपासणी केली जाईल. यामध्ये काही तांत्रिक बिघाड होता का? एवढेच तपासले जाईल. ही फेरतपासणीसाठी मतमोजणीसाठी सारखीच प्रक्रिया असते. त्यासाठी स्वतंत्र हॉल, सीसीटीव्ही कॅमेरे लावलेले असते. सर्व तपासणीची माहिती ही निवडणूक आयोगाला प्रमाणपत्रानुसार द्यावी आहे.

या तपासाअंती काय निष्कर्ष येतो त्यावर पुढील गणिते अवलंबुन असतील. यामध्ये तांत्रिक बिघाड झालाच असेल तर मग याची माहिती निवडणूक आयोगाकडे जाईल. त्यानंतर निवडणूक आयोग काही निर्णय देईल किंवा हे प्रकरण कोर्टातेही जाऊ शकेल असेही काही राजकीय विश्लेषक म्हणतात. नुकतेच एक स्टेटमेंट निलेश लन्के यांनी केले. माझ्या सभांच्या व्हिडीओ चित्रीकरणाची मागणी देखील त्यांच्याकडून करण्यात आली आहे असे समजते असे लंके म्हणाले. म्हणजेच जर प्रकरण कोर्टापर्यंत गेले तर मग या सभांमधील काही अडचणीत आणणारे मुद्दे देखील तेथे सादर केले जाऊ शकतात व पुन्हा १९९१ ची पुरावृत्ती दिसू शकते असेही राजकीय तज्ज्ञ म्हणतात.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24