स्पेशल

Sunroof Car: स्वस्तात सनरूफ असलेली कार खरेदी करायची असेल हे आहेत बेस्ट ऑप्शन! कराल खरेदी तर रहाल फायद्यात

Published by
Ajay Patil

Sunroof Car:- भारतीय कार बाजारपेठेमध्ये सध्या कॉम्पॅक्ट प्रकारच्या एसयूव्ही खरेदी करण्याकडे ग्राहकांचा कल मोठ्या प्रमाणावर दिसून येतो व या प्रकारच्या कॉम्पॅक्ट एसयूव्ही खूप ट्रेंडमध्ये आहेत. तसेच कमीत कमी किमतींमध्ये चांगली वैशिष्ट्ये असलेल्या कार घेण्याकडे सध्या ग्राहक वळल्याचे चित्र असून यामध्ये सनरूफ फिचर असलेले कार ग्राहकांच्या सर्वात मोठ्या पसंतीच्या बनलेले आहेत

त्यामुळे ग्राहक कमीत कमी बजेट मधील चांगली वैशिष्ट्ये असलेल्या सनरूफ कारच्या शोधात असतात. त्यामुळे आपण या लेखामध्ये दहा लाख रुपयांच्या बजेटमध्ये समरूफ असलेली कोणती एसयुव्ही फायद्याची राहिल याबद्दलची माहिती थोडक्यात बघू.

 दहा लाख रुपयांच्या बजेटमधील उत्तम पर्याय असलेल्या सनरूफ कार

1- ह्युंदाई एक्सेटर ह्युंदाई एक्सेटरने कॉम्पॅक्ट एसयुव्ही सेगमेंटमध्ये आपले स्थान मजबूत केले असून या कारची सुरवातीची एक्स शोरूम किंमत सहा लाख  बारा हजार रुपये असून या कारच्या सनरूफ वेरिएंट करिता आठ लाख 23 हजार रुपये सुरुवातीची किंमत मोजावी लागेल.

2- ह्युंदाई वेन्यू ही कार देखील ग्राहकांमध्ये खूप आवडती असून या कारचा एस प्लस ट्रीममध्ये तुम्हाला इलेक्ट्रिक सनरूफ मिळू शकते. ह्युंदाईने अलीकडेच या कॉम्पॅक्ट एसयुव्हीचा सर्वात स्वस्त सनरूफ प्रकार लॉन्च केला असून त्याची एक्स शोरूम किंमत नऊ लाख 36 हजार रुपये आहे.

3- किया सोनेट किया कंपनीने सोनेटच्या HTE O आणि HTK O या प्रकारांचा सनरूफ वैशिष्ट्ये दिले आहे. याकरिता ग्राहकांना आठ लाख 19 हजार रुपये एक्स शोरूम किंमत द्यावी लागेल. ही एक व्हॅल्यू फॉर मनी एसयूव्ही असून या कारच्या टॉप मॉडेलची किंमत 15 लाख 75 हजार रुपयापर्यंत आहे.

4- टाटा पंच टाटा मोटर्सची पंच ही कॉम्पॅक्ट एसयूव्ही असून ग्राहकांमध्ये ती विशेष पसंतीची कार आहे. बाजारामध्ये या कारची विक्री देखील चांगल्या प्रकारे होते.

या कारची सुरुवातीची एक्स शोरूम किंमत सहा लाख 12 हजार रुपये आहे आणि इलेक्ट्रिक सनरूफसह असलेल्या व्हेरिएंटची किंमत आठ लाख 34 हजार रुपयांपासून सुरू होते.

5- महिंद्रा XUV 3XO- महिंद्राची नवीन XUV 3XO या सेगमेंट मधील पहिली सर्वात स्वस्त कार असून यामध्ये पॅनारामिक सनरूफ प्रदान करण्यात आलेले आहे. याची सुरुवातीची एक्स शोरूम किंमत सात लाख 49 हजार रुपये आहे व पॅनोरेमिक सनरूफसह असलेल्या व्हेरिएंटची किंमत आठ लाख 99 हजार रुपये आहे.

Ajay Patil

Published by
Ajay Patil