स्पेशल

Suzlon Energy च्या शेअरमध्ये तेजी ! ‘या’ कारणांमुळे 14 टक्क्यांनी वाढणार स्टॉक, ब्रोकरेजने दिली BUY रेटिंग

Published by
Tejas B Shelar

Suzlon Energy Share Price : सुझलोन एनर्जी शेअर बाबत मोठी अपडेट समोर येत आहे. हा स्टॉक गुंतवणूकदारांमध्ये फारच लोकप्रिय आहे. अक्षय ऊर्जा क्षेत्राची सुझलॉन एनर्जी कंपनीने आपल्या शेअर होल्डर्स ला गेल्या काही वर्षांमध्ये चांगला परतावा दिला आहे. दरम्यान गेल्या दोन दिवसांपासून शेअर बाजारात तेजी आली असून या तेजीच्या काळात Suzlon Energy शेअर्स सुद्धा तेजीत येणार असे संकेत मिळत आहेत.

हा स्टॉक भविष्यात सुमारे 14 टक्क्यांनी वाढू शकतो. हा अंदाज ब्रोकरेज फर्म नुवामा इन्स्टिट्यूशनल इक्विटीजने वर्तवला आहे. मंडळी या कंपनीने नुकतेच डिसेंबर तिमाही निकाल जाहीर केले आहेत.

कंपनीचे डिसेंबर 2024 तिमाही निकाल जाहीर झाल्यानंतर लगेचच ब्रोकरेजने स्टॉकचे रेटिंग ‘होल्ड’ वरून ‘खरेदी’ वर अपग्रेड केले असून यासाठी नवीन टार्गेट प्राईज सुद्धा देण्यात आली आहे. नुवामाने सुझलॉनची 447MW च्या Q3 मधील एक्झिक्युशन जोरदार असल्याचे म्हटले आहे.

हेच कारण आहे की या ब्रोकरेज फॉर्म नाही या स्टॉक साठी 60 रुपये प्रति शेअर अशी नवीन टार्गेट प्राईज दिली आहे, जी 29 जानेवारी रोजी बीएसईवर 52.76 रुपयांच्या बंद किंमतीपेक्षा सुमारे 14 टक्के अधिक आहे.

कंपनीच्या ऑक्टोबर-डिसेंबर 2024 च्या तिमाही निकालांबद्दल बोलायचे तर, सुझलॉन एनर्जीचा एकत्रित निव्वळ नफा वार्षिक आधारावर 91 टक्क्यांनी वाढून 388 कोटी रुपये झाला आहे. एका वर्षापूर्वी कंपनीने 203 कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमावला होता.

कंपनीचा निव्वळ महसूल वाढून रु. 2,969 कोटी झाला आहे जो एका वर्षापूर्वी म्हणजे डिसेंबर 2023 तिमाहीत रु. 1,553 कोटी होता. कंपनीने ऑक्टोबर-डिसेंबर 2024 मध्ये 447 मेगावॅटची विक्रमी तिमाही डिलिव्हरी देखील साध्य केली.

यामुळे ब्रोकरेज फर्म लॉन्ग टर्ममध्ये या स्टॉकसाठी सकारात्मक आहे. दरम्यान व्हॅल्युएशन कन्फर्ट आणि शेअर प्राईस मध्ये झालेली घसरण पाहता आता ब्रोकरेज फर्मकडून या स्टॉक साठी देण्यात आलेली होल्ड रेटिंग अपग्रेड करण्यात आली असून आता ब्रोकरेज फर्मने यासाठी बाय रेटिंग दिली आहे.

सुझलोन एनर्जी सरकारी टेंडर्स मध्ये FDRE / RTC / हायब्रीड चे वाढते मिक्सचे प्रमुख बेनिफिशियरी असल्याचे ब्रोकरेजचे म्हणणे आहे. या कंपनीबाबत बोलायचं झालं तर सध्या सुझलॉन एनर्जीचे मार्केट कॅप 72000 कोटी रुपये आहे.

तसेच, बीएसईनुसार, एका वर्षात हा स्टॉक 22 टक्क्यांनी वाढला आहे. त्याच वेळी, जानेवारी महिन्यात हा स्टॉक आतापर्यंत 19 टक्क्यांनी खाली आला आहे. 2 वर्षांत किंमत 480 टक्क्यांहून अधिक वाढली आहे.

या समभागाने 12 सप्टेंबर 2024 रोजी 52 आठवड्यांचा उच्चांक 86.04 रुपये बनवला होता. ब्लूमबर्गच्या माहितीनुसार, सुझलॉन एनर्जीचा मागोवा घेणाऱ्या 6 विश्लेषकांपैकी 5 जणांनी स्टॉकला ‘बाय’ रेटिंग दिले आहे, तर एकाने ‘होल्ड’ करण्याचा सल्ला सुद्धा दिला आहे.

Tejas B Shelar

Based in Ahmednagar, Maharashtra, I Am a Founder Editor for Ahmednagarlive24, Covering Politics, Technology, Automobile, Finance, Investment and Share Market Related News. For News Tips, You Can Reach Me at edit.tejasbshelar@gmail.com

Published by
Tejas B Shelar