Suzlon Share Price : भारतीय शेअर बाजारात नवीन वर्षाच्या सुरुवातीपासून चढ-उतार पाहायला मिळत आहे. शेअर बाजारातील या चढउतारामुळे गुंतवणूकदार अस्वस्थ आहेत. सुझलॉन शेअरच्या बाबतीत बोलायचं झालं तर गेल्या काही दिवसांपासून हा शेअर देखील सातत्याने घसरत असून यामुळे गुंतवणूकदारांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
या स्टॉक मध्ये सलग पाचव्या दिवस घसरण झाली आणि यामुळे गुंतवणूकदारांमध्ये आता हा स्टॉक सेल करावा कां असा प्रश्न उपस्थित होतोय. तसेच अनेकांकडून सध्याची स्थिती हा स्टॉक खरेदी करण्यासाठी फायद्याचे आहे का असाही प्रश्न विचारला जातोय. दरम्यान आज आपण याचबाबत तज्ञांचं म्हणणं काय आहे याविषयी थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

कशी आहे सुझलॉन शेअरची सध्याची परिस्थिती
हा स्टॉक गेल्या पाच दिवसांमध्ये 13.46 टक्क्यांनी घसरला आहे. आज सुद्धा हा स्टॉक 4.17% नी घसरलाय. सध्या हा स्टॉक 50.35 रुपयांवर ट्रेड करतोय. जून 2024 नंतर या स्टॉक मध्ये पहिल्यांदाच एवढी मोठी घसरण पाहायला मिळाली. 2024 मध्ये हा स्टॉक 86 रुपयांपर्यंत पोहोचला होता अन आता त्या पातळीवरून हा शेअर तब्बल 46 टक्क्यांनी घसरला.
यामुळे गुंतवणूकदार अस्वस्थ होणे स्वाभाविक आहे. मात्र या कंपनीला टोरेंटो पॉवर कंपनीकडून 486 मेगावॅटचा कॉन्ट्रॅक्ट प्राप्त झालाय. हा कॉन्ट्रॅक्ट पार्टनरशिप तत्वावर कंपनीला मिळाला असून हा कंपनीला प्राप्त झालेला पाचवा कॉन्ट्रॅक्ट आहे. मात्र भागीदारी तत्त्वावरील या कॉन्ट्रॅक्टची फारशी अधिक माहिती समोर आलेली नाही.
या घसरणीच्या काळातही रिटेल गुंतवणूकदारांचा विश्वास कंपनीवर कायम आहे. सप्टेंबर तिमाहीत किरकोळ गुंतवणूकदारांचा हिस्सा 23.55% एवढा होता मात्र आता तो हिस्सा 24.49 टक्क्यांवर पोहोचलाय.
तसेच, डिसेंबर तिमाहीत सुझलॉन एनर्जी कंपनीतील म्युच्युअल फंडांची हिस्सेदारी ४.४४ टक्क्यांवर स्थिर राहिली आहे, जी सप्टेंबर तिमाहीत ४.१४% होती. पण, विदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांच्या हिस्सेदारीत २३.७२ टक्क्यांवरून थोडी घसरण झालीये अन ती २२.८८ टक्क्यांवर पोहोचलीये.
दरम्यान या अशा परिस्थितीत सुझलॉन एनर्जी कंपनी शेअरसाठी 6 स्टॉक मार्केट विश्लेषकांपैकी चार विश्लेषकांनी बाय रेटिंग म्हणजेच हा स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. मात्र दोन विश्लेषकांनी या शेअरसाठी ‘SELL’ रेटिंग दिलेली आहे. एकंदरीत काही तज्ञ हा स्टॉक बाय करण्याचा सल्ला देत आहेत तर काही सेल करण्याचा सल्ला देत आहेत.