स्पेशल

लाखाचे करा कोटी! गुंतवणुकीत वापराल ही ट्रिक तर लाखाचे होतील कोटी, वाचा ए टू झेड माहिती

Published by
Ajay Patil

आयुष्यभर काबाडकष्ट करून व्यक्ती पैसे वाचवतो व बचत करतो. केलेल्या बचतीची गुंतवणूक चांगल्या ठिकाणी होणे खूप गरजेचे असते. गुंतवणुकीच्या दृष्टिकोनातून विचार केला तर दोन गोष्टी डोळ्यासमोर ठेवून प्रामुख्याने गुंतवणूकदार गुंतवणूक करतात. यातील पहिली आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे केलेली गुंतवणूक सुरक्षित राहणे आणि दुसरे म्हणजे केलेल्या गुंतवणुकीतून मिळणारा परतावा व त्याचे स्वरूप याचा प्रामुख्याने विचार केला जातो.

गुंतवणुकीचे अनेक पर्याय सध्या उपलब्ध आहेत. यामध्ये बरेच जण सुरक्षिततेच्या आणि परताव्याच्या दृष्टिकोनातून गुंतवणूक करत असतात. यामध्ये जर आपण गुंतवणूक पर्यायांचा विचार केला तर छोट्या प्रमाणातील गुंतवणुकीतून जर मोठ्या प्रमाणात आर्थिक परतावा हवा असेल तर त्याकरिता एसआयपी अर्थात सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन हा उत्तम पर्याय आहे.

परंतु या मधून जर तुम्हाला जास्तीचा परतावा हवा असेल तर  जास्तीत जास्त कालावधीसाठी गुंतवणूक करण्याची तुमची तयारी असणे गरजेचे आहे. जर गुंतवणूक तज्ञांच्या मताचा विचार केला तर त्यांच्या मते तुम्हाला जर एसआयपी कंपाऊंडिंगचा फायदा घ्यायचा असेल तर साधारणपणे 15 ते 20 वर्षे गुंतवणूक करण्याची शिफारस तज्ञ करतात. या अनुषंगानेच आपण या लेखांमध्ये एसआयपी मधील गुंतवणुकी विषयी माहिती घेऊ.

 एसआयपी मधील दीर्घकालीन गुंतवणूक ठरेल फायद्याची

एसआयपी कंपाऊंडच्या जर तुम्हाला फायदा घ्यायचा असेल तर गुंतवणूक तज्ञ म्हणतात की 15 ते 20 वर्षे गुंतवणूक यामध्ये केली जाणे गरजेचे आहे. एसआयपीमध्ये दीर्घकालीन गुंतवणूक करण्यासाठीचा सल्ला दिला जातो. तुम्ही यामध्ये जर जास्त कालावधी करिता गुंतवणूक केली तर तुम्हाला यामध्ये चक्रवाढ व्याजाचा फायदा मिळण्याची शक्यता असते. समजा एखाद्या गुंतवणूकदाराने जर यामध्ये 15 ते 20 वर्षांकरिता गुंतवणूक केली असेल तर शेवटी रक्कम वाढण्याचा दर यामध्ये जास्त असतो.

त्यामुळे गुंतवणूकदाराला या माध्यमातून खूप चांगला परतावा मिळण्याची शक्यता असते. जर एसआयपीमध्ये वीस वर्षे गुंतवणूक केली तर तज्ञांच्या मते यावर सरासरी 15 टक्के परतावा अपेक्षित असतो. परंतु संबंधित गुंतवणूकदाराने एसआयपी कोणत्या प्रकारची निवड झाली आहे यावर ते अवलंबून असते. यामुळे चांगला परतावा मिळण्याकरिता योग्य वेळेला योग्य अशी एसआयपी निवडणे गरजेचे असून ज्या माध्यमातून तुम्हाला पंधरा टक्के परतावा सहज मिळू शकतो.

 लाख रुपयाला कोटीमध्ये अशा पद्धतीने बदला

यामध्ये तुम्ही लाख रुपयाचे रूपांतर कोटी रुपयांमध्ये देखील करू शकतात. उदाहरणच घ्यायचे झाले तर प्रत्येक महिन्याला जर तुम्ही साडेचार हजार रुपये एसआयपी मध्ये गुंतवणूक केली  आणि पंधरा टक्क्यांचा परतावा यामध्ये अपेक्षित असेल तर तुमची ही गुंतवणूक वीस वर्षांसाठी करणे गरजेचे आहे. यामध्ये एसआयपी कॅल्क्युलेटर च्या मदतीने तुम्हाला मिळणारे एकूण परतावाबद्दल विचार केला तर वीस वर्षाच्या शेवटी तुमचे 68 लाख 31 हजार 797 रुपये शिल्लक होतात व या ट्रिकच्या मदतीने तुम्ही ते एक कोटी रुपयांपर्यंत वाढवू शकता.

यामध्ये एसआयपी मध्ये गुंतवणूक करून तुम्हाला एक वर्ष पूर्ण झाल्यानंतर तुम्ही प्रत्येक महिन्याला एसआयपी मध्ये पाचशे रुपयांची वाढ केली तर तुम्ही अगदी आरामात करोडपती होऊ शकतात. या ट्रिकचा वापर केला तर प्रत्येक महिन्याला साडेचार हजार रुपयांचे प्रारंभिक गुंतवणूक तुम्हाला वीस वर्षाच्या कालावधीनंतर परिपक्वतेच्या वेळी एक कोटी सात लाख 26 हजार 921 रुपये परतावा देऊ शकते.

Ajay Patil