T20 World Cup India Team : भारतीय क्रिकेट प्रेमींसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी कामाची बातमी समोर येत आहे. खरे तर सध्या आयपीएलचा थरार सुरू आहे. आयपीएलचा 17वा हंगाम मोठ्या जल्लोषात सुरु असून आयपीएलच्या रणधुमाळीतच क्रिकेट प्रेमींसाठी एक मोठी बातमी समोर येत आहे. ती म्हणजे आगामी T20 विश्वचषकासाठी भारतीय संघाची निवड करण्यात आली आहे.
T20 विश्वचषक 2024 साठी भारतीय संघाची अधिकृतरीत्या घोषणा करण्यात आली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून विश्वचषकासाठी कोणत्या खेळाडूंची वर्णी लागणार याबाबत प्रसारमाध्यमांमध्ये मोठी चर्चा रंगली होती. क्रिकेट प्रेमींना देखील कोणाकोणाला संधी मिळणार याबाबत जाणून घेण्याची मोठी उत्सुकता होती.
मात्र आता ही उत्सुकता संपली असून आगामी विश्वचषकासाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. भारतीय संघाचे कर्णधार पद अपेक्षितपणे रोहित शर्माकडे सोपवण्यात आले आहे. खरे तर बीसीसीआयने रोहित शर्मा आगामी टी-ट्वेंटी विश्वचषकात भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करणार असे स्पष्ट संकेत दिले होते.
यानुसार, आगामी टी-ट्वेंटी विश्वचषकाची कर्णधार पदाची धुरा रोहित शर्माकडे सोपवण्यात आली आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की, विश्वचषकासाठी खेळाडूंची निवड करणे हेतू अहमदाबाद येथे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) विस्तृत चर्चा केली आहे. या चर्चेअंती संघाची घोषणा करण्यात आली आहे.
मुख्य निवडकर्ता अजित आगरकर यांच्या अध्यक्षतेखालील राष्ट्रीय निवड समितीने अनेक खेळाडूंशी चर्चा केली. शेवटी 15 खेळाडूंची निवड करण्यात आली. तसेच चार राखीव खेळाडूंची देखील निवड झालेली आहे. अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये 1 जूनपासून टी-20 वर्ल्ड कपला सुरुवात होत आहे.
भारत 5 जूनला न्यूयॉर्कमध्ये आपला पहिला सामना आयर्लंड विरुद्ध खेळणार आहे. एकंदरीत आयपीएलचा थरार संपला की लगेचच टी ट्वेंटी वर्ल्ड कपचा थरार रंगणार आहे. ही क्रिकेट प्रेमींसाठी निश्चितच एक मोठी गुड न्यूज आहे. आता आपण बीसीसीआयने घोषित केलेला भारतीय संघात कोणाची वर्णी लागली आहे हे थोडक्यात जाणून घेऊया.
टी ट्वेंटी विश्वचषकासाठी भारताचा संघ
रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), शिवम दुबे, हार्दिक पंड्या (उपकर्णधार), रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग, यजुवेंद्र चहल, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), मोहम्मद सिराज.
राखीव खेळाडू : शुभमन गिल, रिंकू सिंग, खलील अहमद, आवेश खान
हार्दिक पांड्याला मोठी जबाबदारी
मध्यंतरी मीडिया रिपोर्ट मध्ये हार्दिक पांड्याला T20 विश्वचषकापासून लांब ठेवले जाऊ शकते अशा चर्चा होत्या. मात्र अष्टपैलू खेळाडू म्हणून ख्यातनाम असलेल्या हार्दिक पांड्याला आगामी T20 विश्वचषकासाठी मोठी जबाबदारी देण्यात आली आहे. पांड्याकडे उपकर्णधार पदाची धुरा देण्यात आली आहे.