स्पेशल

घरातील फ्रिजच्या कंप्रेसरचा होऊ शकतो स्फोट व जाऊ शकतो जीव; सावधानतेसाठी फ्रीजच्या ‘या’ गोष्टीकडे द्या लक्ष

Published by
Ajay Patil

प्रत्येकाच्या घरामध्ये अनेक प्रकारचे विद्युत उपकरणे असतात व त्याचा वापर हा प्रत्येक दिवशी केला जातो. आपण घरातील विद्युत उपकरणांचा विचार केला तर यामध्ये मिक्सर पासून तर रेफ्रिजरेटर, कुलर तसेच वाशिंग मशीन, मायक्रोवेव्ह ओव्हन, इस्त्री इत्यादी अनेक उपकरणे आपल्याला सांगता येतील.

तेव्हा आपण या उपकरणांचा वापर करत असतो तेव्हा कालांतराने यामध्ये अनेक प्रकारच्या समस्या निर्माण होतात व त्या समस्यांकडे वेळीच लक्ष देणे खूप गरजेचे असते. नाहीतर आर्थिक नुकसान होण्याची शक्यता वाढते किंवा काही प्रकरणांमध्ये तर व्यक्तीचा जीव देखील जाऊ शकतो.

उन्हाळ्याच्या कालावधीमध्ये या विद्युत उपकरणांपैकी प्रामुख्याने रेफ्रिजरेटर व कुलर तसेच एअर कंडिशनर यासारख्या उपकरणांचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो. यातील बरीच उपकरणे आपण काम झाले की बंद करत असतो. परंतु यामधील रेफ्रिजरेटर हे असे उपकरण आहे की ते जास्त करून बंद केले जात नाही.

कारण फ्रिजचा वापरच हा प्रामुख्याने खाद्यपदार्थ ताजे ठेवण्यासाठी केला जात असल्यामुळे फ्रिज बंद करायचा विषयच येत नाही. परंतु त्यामुळे फ्रिजची देखभाल करणे देखील तेवढेच गरजेचे असते व कायम लक्षात ठेवणे महत्त्वाचे असते.

तुम्ही बऱ्याचदा ऐकले असेल की अलीकडच्या कालावधीमध्ये रेफ्रिजरेटरच्या स्फोटाच्या घटना समोर आल्याचे आपण वाचले किंवा ऐकले असेल. त्यामुळे याबाबतीत खूप सावधान राहणे गरजेचे आहे. या लेखात आपण याबद्दल माहिती घेणार आहोत की फ्रिजचा स्फोट होण्याआधी आपल्याला काही लक्षणे किंवा काही चिन्हे दिसतात का?

 फ्रिजचा स्फोट होण्याआधी दाखवते हे लक्षण

रेफ्रिजरेटर म्हणजेच फ्रिज हे उपकरण मानवी जीवनाचा एक महत्त्वाचा भाग असून जवळपास प्रत्येक घरामध्ये आपल्याला सध्या फ्रीज दिसून येते. तसेच उन्हाळ्यामध्ये फ्रिजची खूप मोठ्या प्रमाणावर गरज भासते व याचा वापर करून आपण थंड पाणी किंवा खाद्यपदार्थ ताजे ठेवतो.

परंतु जसे आपण पाहिले की इतर सर्व उपकरणांमध्ये फ्रिज हे उपकरण आता चालू असते व क्वचितच ते बंद केले जाते. रात्रंदिवस रेफ्रिजरेटर म्हणजेच फ्रिज सतत सुरू असते व त्यामुळे फ्रिजच्या कंप्रेसर ला कधीही आराम मिळत नाही. या सगळ्या परिस्थितीत आपण पाहिले असेल की रेफ्रिजरेटर म्हणजेच फ्रिजच्या स्फोट झाल्याच्या घटना घडून आलेले आहेत.

परंतु तुम्हाला माहिती आहे का फ्रीजचा स्फोट होण्याआधी आपल्याला काही चिन्हे मिळत असतात किंवा काही चिन्हे दिसत असतात. त्यामुळे या चिन्हांकडे लक्ष देणे खूप गरजेचे आहे. नाहीतर काही वेळेस हे आपल्यासाठी फार मोठी समस्या निर्माण करू शकते. फ्रिजचा स्फोट होण्यापूर्वी त्याचा कम्प्रेसर खूप गरम होऊ लागतो.

वास्तविक पाहता संपूर्ण फ्रिजचा स्फोट होत नाही तर त्याचा कंप्रेसर चा स्फोट होतो. म्हणजेच कॉम्प्रेसर फुटतो. जेव्हा कंप्रेसर गरम होत असेल व त्याकडे लक्ष दिले नाही तर कॉम्प्रेसर फुटू शकते.

कॉम्प्रेसर गरम होण्याची व फुटण्याची समस्या जुन्या फ्रिजमध्ये मोठ्या प्रमाणावर दिसून येते. त्यामुळे तुमच्या घरातील फ्रिज जुना झाला असेल किंवा त्याचा कंप्रेसर किंवा फ्रिज गरम होत असेल तर काळजी घेणे गरजेचे आहे.

Ajay Patil