सध्या जून महिना सुरू असून या महिन्यांमध्ये अनेक कार उत्पादक कंपन्यांकडून कार खरेदीवर काही ऑफर्स किंवा सवलती दिल्या जात आहेत. भारतातील अग्रगण्य वाहन उत्पादक कंपनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या टाटा मोटर्स भारतीय बाजारपेठेतील कार उत्पादक कंपन्यांमध्ये प्रसिद्ध आणि नामांकित कंपनी असून ग्राहकांमध्ये देखील टाटाच्या कार्सना पसंती आहे.
त्यामुळे ग्राहकांकडून टाटा मोटर्सचे अनेक कार मॉडेल खरेदी केल्या जातात. त्यामुळे तुमचा देखील या महिन्यांमध्ये जर कार खरेदी करण्याचा प्लॅनिंग असेल व टाटाची एखादी कार घ्यायची असेल तर टाटा मोटर्स कडून या महिन्यामध्ये टियागो, अल्ट्रोज, नेक्सन, हॅरियर आणि सफारी यासारख्या प्रसिद्ध मॉडेल्सवर मोठी सवलत दिली जात
असून यापैकी कुठलीही कार खरेदी केली तर पैशांची मोठी बचत होऊ शकते. तुम्हाला जर टाटाची कार घ्यायची असेल तर या महिन्यात तुमचे कार मालक होण्याचे स्वप्न पूर्ण करण्याची ही योग्य वेळ आहे.
टाटा मोटर्स या कार वर देत आहे भरपूर सवलती
1- टाटा टिगोर– टाटा मोटरची टाटा टिगोर ही कार स्टायलिश डिझाईन आणि इंधन कार्यक्षम कामगिरी करिता प्रसिद्ध असून या कारच्या पेट्रोल व्हेरियंट वरती तीस हजार रुपयांचा कॅश बेनिफिट, वीस हजार रुपयांचा एक्सचेंज बोनस आणि पाच हजार रुपयांची कार्पोरेट सवलत दिली जात आहे. म्हणजेच एकंदरीत यावर 55 हजार पर्यंत सूट मिळत आहे.
तर यामधील तुम्हाला सीएनजी कार घ्यायचे असेल तर यावर देखील पंचवीस हजार रुपयांपर्यंत कॅश बेनिफिट आणि एक्सचेंज बोनस व कार्पोरेट सवलत मिळून 50 हजार रुपये पर्यंतचा फायदा तुम्ही घेऊ शकतात.
2- टाटा अल्ट्रोझ– अल्ट्रोजेच्या पेट्रोल आणि डिझेल कार खरेदीवर 50 हजार रुपयापर्यंत बचत तुम्ही करू शकतात. यामध्ये पंचवीस हजार रोख सवलत तसेच 20000 रुपयांचा एक्सचेंज बोनस आणि पाच हजार रुपयांची कार्पोरेट सूट यासारखे फायदे यावर मिळत आहेत व टाटा अल्ट्रोझच्या सीएनजी प्रकारावर 40 हजार रुपयांची सवलत मिळत आहे.
3- टाटा नेक्सन– टाटाची ही एक लोकप्रिय कॉम्पॅक्ट एसयूव्ही कार असून ही कार तीच्या पावरफूल कामगिरी करिता ओळखली जाते. या कारमधील तुम्ही कार खरेदी करिता MY2024 मॉडेल निवडल्यास तुम्हाला 25 हजार पर्यंत सवलत मिळते व यासोबत 50000 रुपयांचा कार्पोरेट सूट व त्यासोबत 20000 रुपयांपर्यंतचा स्क्रॅपेज/ एक्सचेंज बोनसचा समावेश करण्यात आला आहे.
4- टाटा टियागो– टाटा मोटरच्या टाटा टियागो या कारवर 35 हजार रुपयांचा कॅश बेनिफिट, वीस हजार रुपयांचा एक्सचेंज बोनस आणि पाच हजार रुपयांची कार्पोरेट सवलत मिळणार आहे व या ऑफरमध्ये तुम्ही 60000 रुपयापर्यंत बचत करू शकता.
एवढेच नाही तर टाटा टियागोच्या सीएनजी कारवर रुपये पन्नास हजार पर्यंत सवलत मिळणार असून त्यामध्ये 25 हजार कॅश डिस्काउंट वीस हजार चा एक्सचेंज बोनस आणि पाच हजार रुपयांची कार्पोरेट सूट दिली जाणार आहे.