स्पेशल

टाटा मोटर्सच्या शेअरमध्ये घसरगुंडी ! स्टॉकचा भाव 700 च्या खाली आला, घसरणीमागील कारण काय ?

Published by
Tejas B Shelar

Tata Motors Share Price : भारतीय शेअर बाजारात आज सलग तिसऱ्यांदा तेजी पाहायला मिळाली. बॉम्बे स्टॉक एक्सचेंज अर्थातच बीएसई सेन्सेक्स आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज अर्थातच एनएसई निफ्टी मध्ये आज तेजी दिसली. आज शेअर बाजार खुला होताच बीएसई सेन्सेक्स 174.43 अंकांनी वधारून 76707.39 वर खुला झाला.

तसेच, एनएसई निफ्टी 75.10 अंकांनी वधारून 23238.20 वर खुला झाला. मात्र या तेजीच्या काळातही टाटा समूहाच्या टाटा मोटर्सच्या शेअर्समध्ये मोठ्या प्रमाणात घसरण दिसत आहे. यामुळे गुंतवणूकदार अस्वस्थ झाले आहेत. दरम्यान कंपनीने नुकतेच आपले तिमाही निकाल जाहीर केले आहेत.

तिमाही निकाल जाहीर झाल्यानंतर काय होणार? याकडे साऱ्यांचेच लक्ष होते. मात्र तिमाही निकालानंतरही शेअर्समधील घसरण थांबलेली नाही. टाटा मोटर्सच्या शेअर्समध्ये गेल्या कित्येक दिवसांपासून घट दिसून येत आहे. कंपनीच्या तिमाही निकालानंतर ही घसरण आणखी वाढली आहे.

मागील आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीच्या तुलनेत टाटा मोटर्सचा एकत्रित निव्वळ नफा 22 टक्क्यांनी घसरून 5,578 कोटी रुपये झाला आहे. निकाल उघड झाल्यानंतर, ब्रोकरेज देखील कंपनीच्या प्रदर्शनावर असंतुष्ट असल्याचे दिसले. ब्रोकरेजने या स्टॉकवरील आपली रेटिंग कमी केली आहे आणि टार्गेट प्राईज देखील कमी केले आहे.

यामुळे आता शेअर होल्डर्स मोठ्या प्रमाणात संभ्रमा अवस्थेत आले आहेत. गुंतवणूकदार या कंपनीचा स्टॉक होल्ड करायचा की सेल करायचा? हा प्रश्न उपस्थित करत आहेत. दरम्यान आज आपण याच बाबत टॉपच्या ब्रोकरेजचे म्हणणे काय आहे हे थोडक्यात समजून घेणार आहोत.

टाटा मोटर्सच्या शेअरमध्ये आजही घसरण

आज सलग तिसऱ्यांदा शेअर मार्केटमध्ये तेजी राहिली पण टाटा मोटर्सच्या शेअरमध्ये आज सुद्धा मंदी दिसली. टाटा मोटर्सचे शेअर्स आज घसरणीसह खुले झालेत आणि 6 टक्क्यांच्या घसरणीसह सध्या ट्रेड करीत आहेत. मंडळी या स्टॉकची प्रिव्हियस क्लोजिंग 752 रुपयांची होती.

काल हा स्टॉक तीन टक्क्यांनी वाढून 752 रुपयांवर क्लोज झाला होता. मात्र आज याची दिवसाची सुरुवात घसरणीसह झाली. आज हा स्टॉक 709 रुपयांच्या पातळीवर खुला झाला आणि दिवसभरात 683 रुपयांच्या पातळीपर्यंत खाली आला. गेल्या वर्षी ऑगस्ट 2024 मध्ये टाटा मोटर्सचे शेअर्स 1176 रुपयांच्या विक्रमी पातळीवर पोहोचले होते.

तथापि, आता ते 700 रुपयांच्या खाली आले आहे. टाटा मोटर्सचे शेअर्स 6 महिन्यांच्या कालावधीत 40 टक्क्यांहून अधिक घसरले आहेत. दुसरीकडे, तिमाही निकालानंतर, ब्रोकरेज देखील कंपनीच्या शेअर्सवर निगेटिव्ह आउटलूक देताना दिसतायेत. यामुळे, स्टॉकहोल्डर्स चिंतेत आले आहेत.

Tata मोटर्ससाठी आता सुधारित टारगेट प्राईस काय?

टाटा मोटर्सच्या शेअर्ससाठी अनेक ब्रोकरेजने रेटिंग कमी केले आहे. नुवामाने यासाठी रीड्यूस रेटिंग देऊन 750 रुपयांची टार्गेट प्राईस 720 रुपये केली आहे. त्याच वेळी, जेफरीजने 660 रुपयांची टार्गेट प्राईस दिली आहे, म्हणजेच आज स्टॉक आगामी काळात आणखी खाली जाऊ शकतो असे या ब्रोकरेजचे म्हणणे आहे. मात्र या अशा चिंतेच्या परिस्थितीतही गोल्डमन सेसने कंपनीच्या शेअर्सला तटस्थ रेटिंग देऊन 800 रुपयांची टार्गेट प्राईस दिली आहे.

Tejas B Shelar

Based in Ahmednagar, Maharashtra, I Am a Founder Editor for Ahmednagarlive24, Covering Politics, Technology, Automobile, Finance, Investment and Share Market Related News. For News Tips, You Can Reach Me at edit.tejasbshelar@gmail.com