टीम इंडियाची विजयी वाटचाल ! पहिल्या टी-20 मध्ये दणदणीत विजय!

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,  17 फेब्रुवारी 2022 :- पहिल्या टी 20 सामन्यात भारताने वेस्ट इंडिजचा सहा गडी राखून पराभव केला आहे. वनडे प्रमाणे टी 20 मध्ये भारताची दमदार कामगिरी कायम आहे.

भारताने तीन टी 20 सामन्याच्या सीरीजमध्ये 1-0 अशी आघाडी घेतली आहे. रोहितने नाणेफेक जिंकून विंडीजला प्रथम फलंदाजीचे आमंत्रण दिले.

डावखुरा फलंदाज निकोलस पूरनने केलेल्या अर्धशतकाच्या जोरावर विंडीजने 20 षटकात 7 बाद 157 धावा केल्या. पदार्पणाचा सामना खेळणारा भारताचा फिरकीपटू रवी बिश्नोईने दोन बळी घेतले.

प्रत्युत्तरात भारताने 18.5 षटकात पूर्ण केले. या विजयासह भारताने मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. दरम्यान एकदिवसीय प्रमाणे टी 20 मालिका देखील जिंकण्याचा मानस टीम इंडियाचा असणार आहे.

दरम्यान भारताकडून सर्वात किफायती गोलंदाजी केली, ती रवी बिश्नोईने. त्याने चार षटकात 17 धावा देत दोन विकेट काढल्या.

तर हर्षल पटेल, रवी बिश्नोईने प्रत्येकी दोन तर भुवनेश्वर कुमार, दीपक चहर आणि युजवेंद्र चहलने प्रत्येकी एक विकेट घेतल्या.