कारला सीएनजी किट बसवताय, इंजिनचे ‘हे’ होते

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 30 मार्च 2021:-पेट्रोलच्या किमती वाढल्यामुळे आता अनेकजण सीएनजी किट बसवण्याचा विचार करत आहे. तुम्ही विचारात असाल तर सीएनजी किट लावण्याबाबत काही गोष्टी लक्षात घेणे गरजेचे आहे. सीएनजी हे एक इंधन आहे. यामुळे याचा थेट संबंध इंजिनाशी येतो.

सीएनजीमुळे इंजिनाचा परफॉर्मन्स खालावतो. यामुळे अनेक कंपन्यांची इंजिने सीएनजीसाठी योग्य नसतात. सीएनजीचा खर्च कमी होतो, मात्र, त्यामुळे इंजिनावर पडणारे प्रेशर जे असते ते खूप खर्च करायला भाग पाडू शकते.

इंजिनाची ताकदही कमी होते. ही बाब तुमच्या कार चालविताना लक्षात येईल. ज्यांना कारचा परफॉर्मन्स आवडतो त्यांनी सीएनजी किट लावू नये. पेट्रोलच्या दर गगनाला भिडले आहेत. ज्यांनी डिझेल वाहने घेतलीत त्यांना काही पर्याय नाही.

परंतू पेट्रोल कार घेतलेल्यांना त्यांची कार सीएनजी लावून परवडणारा प्रवास करता येणार आहे. हा एक पेट्रोल कारचा फाय़दा आहे. देशात मारुतीशिवाय अन्य कोणत्याही कारला चांगल्या सीएनजी कार देणे जमलेले नाही.

ह्युंदाईच्या काही कारना सीएनजी आहे. पहिली बाब म्हणजे तुमची कार सीएनजी किटला सपोर्ट करते का नाही हे पाहणे गरजेचे आहे. अनेकदा जुन्या कारमध्ये सीएनजी किट लावले की ती कार नंतर समस्या यायला, त्रास द्यायला सुरवात करते.

यामुळे आधी तुम्ही सीएनजी कारला योग्य आहे की नाही ते पहावे लागणार आहे. अनेकदा लोक त्यांच्या कारना सीएनजी किट लावून घेतात. मात्र, जेव्हा एखादा अपघात होतो तेव्हा त्यांचा इन्शुरन्स क्लेम नाकारला जातो. कारण तुमच्या कारचे मॉडेलमध्ये सीएनजी नसतो.

कंपन्या तुमच्या कारचे मॉडेल पाहून इन्शुरन्स देतात. अशावेळी कंपन्यांची परवानगी घेऊन सीएनजी किट बसवावे. आणखी एक महत्वाची बाब म्हणजे आरटीओ.

जर तुम्ही तुमच्या कारला सीएनजी किट लावत असाल तर त्याची माहिती तुमच्या आरटीओला द्यावी लागते. सीएनजीचे लायसन द्यावे लागते. तेव्हा जाऊन तुम्ही सीएनजी किट बसवू शकता. यासाठी सीएनजी किटचा अधिकृत डीलर लागतो. ते देखील पहावे लागते.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24