Laxmi Narayan Rajyog:- दिवाळी काही दिवसांवर येऊन ठेपली असून या महत्त्वाच्या सणाची सुरुवात धनत्रयोदशी पासून होते. भारतीय परंपरेमध्ये दिवाळी सणाला खूप महत्त्व असून त्यातल्या त्यात धनत्रयोदशी आणि लक्ष्मीपूजन या दोन दिवसांना खासकरून खूप महत्त्व असते.
ज्योतिष शास्त्रानुसार बघितले तर येणाऱ्या धनत्रयोदशीच्या दिवशी बुध राशी परिवर्तन करणार असून वृश्चिक राशीमध्ये प्रवेश करेल आणि शुक्र सोबत लक्ष्मीनारायण राजयोग तयार होण्यास त्यामुळे मदत होणार आहे.
त्यामुळे ज्या राशींच्या कुंडलीमध्ये बुध आणि शुक्राचा विशेष प्रभाव आहे अशा व्यक्तींसाठी हा लक्ष्मीनारायण राजयोग खूप मोठ्या प्रमाणावर फायदेशीर ठरणार आहे. दोन्ही ग्रहांपैकी बुध हा ग्रह संपत्ती आणि बुद्धिमत्तेचा कारक असून शुक्र हा ग्रह धनाचा कारक मानला जातो. त्यामुळे या दोघांमुळे तयार होणारा लक्ष्मीनारायण राजयोग काही राशींसाठी धनसंपत्ती देणारा ठरणार असून इतर गोष्टींनी देखील बराच फायदा मिळवून देणारा असणार आहे.
पाच वर्षानंतर धनत्रयोदशीला तयार होणारा लक्ष्मीनारायण राजयोग या राशीसाठी ठरेल फायद्याचा
1- सिंह– सिंह राशीच्या व्यक्तींसाठी बुधचे होणारे राशी परिवर्तन फायदा देणारे ठरणार आहे. या व्यक्तींना सरकारी सन्मान मिळू शकतो.तसेच वाहन खरेदी करायचे असेल तर हा काळ त्यासाठी शुभदायी असणार आहे.
प्रॉपर्टीच्या संबंधित गोष्टींमध्ये देखील फायदा होईल. तसेच या कालावधीत कमाई मध्ये देखील वाढ होईल व बँक बॅलन्स देखील वाढेल.
2-
तूळ– तूळ राशीच्या लोकांना देखील या राजयोगाचा आर्थिक आणि करिअरच्या दृष्टिकोनातून मोठा फायदा होणार असून या दोन्ही बाबींमध्ये मोठ्या संधी उपलब्ध होणार आहे.या कालावधीत प्रतिमा सुधारण्यास मदत होईल तसेच कष्टाचे देखील कौतुक केले जाईल. इतकेच नाही तर सासरच्या लोकांकडून शक्य ती सर्व मदत तुम्हाला या कालावधीत मिळू शकते.
लक्ष्मी नारायण राज योगामुळे या कालावधीत जीवनात प्रगती होईल व देवी लक्ष्मीच्या कृपेने घरात सुख-समृद्धीचे वातावरण राहील. इतकेच नाहीतर तुमचे तुमच्या पत्नी सोबतचे नाते अगोदरपेक्षा अधिक घट्ट आणि गोड होण्यास मदत होईल.
3- वृश्चिक– वृश्चिक राशींच्या व्यक्तींसाठी बुध ग्रहाचे हे राशी परिवर्तन खूप फलदायी ठरणार आहे. करिअरमध्ये अनेक संधी तयार होतील व तुम्ही तुमच्या कर्तुत्वाने इतरांची मनी जिंकण्यात यशस्वी व्हाल.
बुध ग्रहाच्या सकारात्मक प्रभाव तुमच्यावर राहिल्यामुळे तुमची प्रतिष्ठा देखील वाढण्यास मदत होईल. हा कालावधी तुमच्यासाठी नवीन यश मिळवण्याचा व उंची गाठण्याचा असून त्यामुळे तुम्हाला खूप फायदा होईल.
4- कुंभ– बुध ग्रहाचे गोचर कुंभ राशींच्या व्यक्तींसाठी खूप महत्त्वाचे असून या कालावधीत कुंभ राशीच्या व्यक्तींना भाग्य मोठ्या प्रमाणावर साथ देईल. कितीही कठीण परिस्थिती आली तरी तुम्ही यशाकडे मार्गक्रमण करत रहाल व तुमचे उत्पन्न देखील वाढेल.
तुम्ही जर लेखन किंवा संपादन किंवा करार यासारख्या कामांमध्ये असाल तर तुम्हाला चांगला आर्थिक फायदा होईल. बुधाच्या राशी परिवर्तनामुळे विदेश प्रवास देखील करण्याची संधी प्राप्त होऊ शकते.
5- मिथुन– मिथुन राशींच्या व्यक्तींसाठी हा कालावधी खूप महत्त्वाचा असणार असून या कालावधीत तुमचा खिसा नेहमी भरलेला असेल. व्यवसायात असाल तर तुम्हाला मोठा नफा या कालावधीत मिळू शकतो व करिअरमध्ये तुम्ही चांगली प्रगती करू शकतात. देवी लक्ष्मीच्या कृपेने तुमची आर्थिक परिस्थिती देखील मजबूत राहील व तुम्हाला अनेक नवनवीन संधी उपलब्ध होतील.
( टीप – वरील माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून वाचकांसाठी माहितीस्तव सादर केलेली आहे. याविषयी अहमदनगर लाईव्ह 24 कुठल्याही प्रकारचा दावा किंवा समर्थन करत नाही.)