स्पेशल

जाधव दाम्पत्याने तर कमालच केली! चक्क बनवले नॉन व्हेजिटेरियन स्नॅक्स, प्रतिमहिना कमावतात 50 हजार, वाचा यशोगाथा

Published by
Ajay Patil

व्यवसाय किंवा स्टार्टअप जेव्हा सुरू करण्याचा विचार केला जातो त्यामागे बहुदा आपल्याला अनेक वेगवेगळ्या कल्पनाच दिसून येतात व या कल्पना प्रामुख्याने स्टार्टअपमध्ये मोठ्या प्रमाणावर दिसतात. व्यवसायाचे प्रकार पाहिले तर ते अनेक प्रकारचे आहेत.

परंतु बाजारपेठेतील मागणी किंवा बदलत्या परिस्थितीनुसार व ग्राहकांचा ट्रेंड पाहून जर व्यवसायला सुरुवात केली तर त्या माध्यमातून आपल्याला यश मिळते हे खात्रीशीर सांगता येते. फक्त यामध्ये आवश्यक असते ती आपल्या डोक्यात आलेली कल्पना सत्यात उतरवण्याची क्षमता आणि व्यवसायाच्या स्वरूपात त्याला यशाच्या शिखराकडे नेण्यासाठी लागणारी जिद्द आणि मेहनत याची होय.

याच मुद्द्याला धरून जर आपण जालना जिल्ह्यातील मानेगाव खालसा या गावचे नारायण जाधव आणि त्यांच्या पत्नी सुनीता जाधव ह्या दाम्पत्याची यशोगाथा पाहिली तर यांनी स्नॅक्स बनवण्याचा व्यवसाय सुरू केला. परंतु त्यांच्या या स्नॅक्स बनवण्याचे व्यवसायाची वेगळेपण असे होते की त्यांनी चक्क नॉन व्हेजिटेरियन स्नॅक्स निर्मिती केली.

आपल्याला स्नॅक्स म्हटले म्हणजे काहीतरी कुरकुरीत असे खाण्याचा पदार्थ डोळ्यासमोर येतो व तो नेहमी शाकाहारी पद्धतीचा असतो. परंतु या दांम्पत्याने चक्क झिंगाट स्नॅक्स नावाने नॉन व्हेजिटेरियन स्नॅक्स निर्मितीचा उद्योग उभारला आहे. त्यांचीच यशोगाथा आपण बघू.

 जाधव दांपत्याने सुरू केला झिंगाट स्नॅक्स व्हेजिटेरियन निर्मिती व्यवसाय

याबाबत सविस्तर वृत्त असे की, जालना जिल्ह्यात मानेगाव खालसा हे गाव असून या ठिकाणी राहणारे नारायण जाधव व त्यांच्या पत्नी सुनीता जाधव यांनी स्नॅक्स उद्योगांमध्ये पाऊल ठेवले व चक्क नॉन व्हेजिटेरियन स्नॅक्स निर्मितीचा उद्योग उभारला आहे.

विशेष म्हणजे त्यांनी बनवलेल्या या युनिक उत्पादनाची दखल दिल्ली येथे होऊ घातलेल्या वन इंडिया फूड प्रदर्शनासाठी घेतली गेली असून या ठिकाणी स्टॉल लावण्यासाठी त्यांची निवड करण्यात आलेली आहे.

 अशाप्रकारे सुचली व्यवसायाची कल्पना

नारायण जाधव यांच्या पत्नी सुनीता जाधव यांचे मामा आणि काही नातेवाईक मुंबईला राहायला आहेत व एकदा ते जेव्हा मुंबईवरून सुनीता जाधव यांना भेटायला आले तेव्हा त्यांनी सोबत काही झिंगे,बोंबील आणि छोटे मासे सोबत आणले व ते बहिणीला बनवायला सांगितले.

हे पदार्थ सुनीता जाधव यांनी अत्यंत चविष्ट पद्धतीने बनवले. त्यांनी बनवलेले हे पदार्थ नारायण जाधव यांच्या मित्रांना देखील खूप आवडले. या प्रसंगा नंतर नारायण जाधव यांच्या डोक्यामध्ये मात्र या पदार्थांचा व्यावसायिक  दृष्टीने काहीतरी उपयोग करून घेण्याचा विचार सुरू झाला.

त्यानंतर दुसऱ्यांदा हेच नातेवाईक मुंबईवरून मानेगाव येथे जेव्हा आले तेव्हा त्यांना अधिक प्रमाणामध्ये मासे, झींगे आणि बोंबील आणण्यास त्यांनी सांगितले व या पदार्थांना देखील त्यांनी घरीच बनवले. परंतु यावेळी ही बनवलेले पदार्थ त्यांनी जालना शहराच्या आसपास असलेल्या बियर शॉपी तसेच बियर बार व ढाबे इत्यादींना विकायला सुरुवात केली.

अशाप्रकारे त्यांनी बनवलेल्या पदार्थांची चव उत्तम असल्यामुळे ग्राहक वर्ग वाढत गेला व व्यवसायामध्ये देखील वाढ होत गेली. सुरुवातीला अगदी छोटी मशीन विकत घेऊन त्यांनी त्यावर पॅकिंग करायला सुरुवात केली.

परंतु मागणी वाढत असल्यामुळे पॅकिंग वाढवणे गरजेचे होते व त्यानंतर त्यांनी मोठी मशीन विकत घेण्याचा विचार केला व एका बँकेकडून कर्ज घेऊन साडेबारा लाखांमध्ये पॅकिंग करण्याची एक मोठी मशीन विकत घेतली. आज त्या मोठ्या मशीनच्या माध्यमातून ते पन्नास हजार रुपये प्रति महिना एवढे उत्पन्न कमावत आहेत.

 त्यांच्या या उत्पादनाची केंद्र सरकारने घेतली दखल

नारायण व सीमा जाधव यांनी बनवलेल्या नॉन व्हेजिटेरियन स्नॅक्स या युनिक उत्पादनाची दखल केंद्र सरकारने घेऊन वन फूड इंडिया या प्रदर्शनामध्ये त्यांना त्यांच्या या पदार्थांचा स्टॉल लावण्यास दिल्ली येथे निमंत्रित केले असून 19 ते 22 सप्टेंबर या कालावधीत दिल्ली येथे प्रगती मैदानावर प्रदर्शन पार पडणार आहे व यामध्ये जाधव दांपत्य त्यांच्या उत्पादनाचे स्टॉल लावणार आहेत.

Ajay Patil