स्पेशल

खेड तालुक्यातील जाधव दांम्पत्य करतात रानभाज्यांची शेती! या अनोख्या शेतीतून वर्षाला कमवतात 7 ते 8 लाखांचे उत्पन्न

Published by
Ajay Patil

पारंपारिक शेतीची पद्धत आणि पारंपारिक पिके आता जवळपास हद्दपार झालेली असून त्यांच्या जागी आता शेती क्षेत्रामध्ये बदलाचे वारे व्हायला लागलेले आहेत व हे वारे प्रामुख्याने तंत्रज्ञानाची मदत आणि वेगवेगळ्या पिकांची लागवड या दृष्टिकोनातून आपल्याला दिसून येतात.

शेतकरी आता शेतीमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून वेगवेगळ्या पद्धतीच्या फळबागा तसेच भाजीपाला पिके, फुल पिकांच्या लागवडीतून कमीत कमी क्षेत्रामध्ये देखील लाखो रुपयांचे उत्पन्न मिळवण्यामध्ये यशस्वी झाल्याचे चित्र आहे.

या सगळ्या आधुनिकतेच्या वाऱ्यांमध्ये मात्र पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यात असलेल्या चिंबळी या गावचे जाधव दांपत्याने मात्र रानभाज्यांची शेती करून पौष्टिक व रसायनमुक्त भाज्या नागरिकांना पुरवून त्यातून चांगल्या पद्धतीने आर्थिक प्रगती केलेली आहे.

रानभाज्यांच्या शेतीतून जाधव दांपत्य रसायनमुक्त पालेभाज्या आणि फळभाज्या नागरिकांना पुरवून आरोग्याच्या दृष्टिकोनातून एक महत्त्वपूर्ण काम ते करत आहेत.त्यामुळे त्यांची यशोगाथा आपण या लेखात बघू.

 जाधव दाम्पत्याची यशोगाथा

पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यात असलेल्या चिंबळी या गावचे रहिवासी असलेले चंद्रकांत आणि सीमा जाधव हे दाम्पत्य रानभाज्यांच्या लागवडीतून एक चांगले आर्थिक उत्पन्न मिळवत आहेत.  सीमा जाधव हे बारावी पास असून त्यांच्या माहेरी शेती नसल्याने त्यांना शेतीबद्दल कुठल्याही प्रकारचे ज्ञान होते.

परंतु त्यांनी त्यांचे पती चंद्रकांत यांच्या मदतीने रानभाज्यांच्या प्रयोग करण्याचे ठरवले व त्या माध्यमातून त्यांनी यश देखील मिळवले. रानभाज्यांच्या शेतीमध्ये त्यांनी उत्तम व्यवस्थापनाने चांगले उत्पादन घेण्यात यश मिळवले व शेतकरी ते ग्राहक अशा पद्धतीने त्यांनी विक्री नियोजन केले व कुठल्याही व्यापारी न जाता त्या रानभाज्यांचे पैसे त्यांना मिळतात.

सोसायट्यांमध्ये राहणारे नागरिक नोकरदार वर्ग असल्याने  अशा नागरिकांच्या आहारामध्ये हायब्रीड भाजीपाला किंवा इतर गोष्टींचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे जाधव दांपत्य सोसायटीमध्ये थेट जाऊन रानभाज्यांची विक्री करतात.

या त्यांच्या प्रयोगाला ग्राहकांकडून देखील चांगला प्रतिसाद मिळतो. रानभाज्याशिवाय त्यांनी स्ट्रॉबेरीचा प्रयोग देखील यशस्वी केला आहे. सध्या त्यांच्या शेतामध्ये करटुले या रानभाजीची लागवड करण्यात आलेली आहे.

 रासायनिक खतांचा वापर

करता वापरतात सेंद्रिय खते

जाधव कुटुंब यांचे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे शेतीमध्ये पिकांसाठी ते कुठल्याही पद्धतीचे रासायनिक खते किंवा रासायनिक कीटकनाशकांचा वापर करत नाहीत. संपूर्णपणे सेंद्रिय खतांचा वापर ते पिकांसाठी करतात व विशेष म्हणजे लागणारे सर्व सेंद्रिय खत ते स्वतः तयार करतात.

रानभाज्यांचे विक्री व्यवस्थापन जर आपण बघितले तर ते प्रत्येक आठवड्याला सोसायट्यांमध्ये जाऊन विक्री करतात. ही विक्री प्रामुख्याने पिंपरी चिंचवड शहर आणि परिसरामध्ये प्रामुख्याने ते करतात. अशा पद्धतीने जाधव कुटुंबियांनी रासायनिक शेतीला उत्तम पर्याय म्हणून रानभाज्यांची शेती हा प्रयोग करत स्वतःचे वेगळेपण तयार केले आहे.

तसेच आता नागरिक आरोग्याच्या दृष्टिकोनातून खूप सजग झाल्यामुळे नागरिकांकडून रानभाज्यांना देखील चांगली मागणी आहे व त्यामुळे एका वर्षाच्या कालावधीत हे कुटुंब सात ते आठ लाखांचे उत्पन्न यामधून मिळवतात.

त्यांची ही शेतीची पद्धत परिसरात चर्चेला आली आहे व विशेष म्हणजे त्यांच्या या प्रयोगामुळे अनेक पुरस्कार देखील त्यांना मिळालेले आहेत.

Ajay Patil

Published by
Ajay Patil