शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून शासनाच्या माध्यमातून अनेक पथदर्शी उपक्रम राबवले जात आहेत.तसेच अनेक योजनांच्या माध्यमातून आर्थिक मदत देखिल शेतकऱ्यांना करण्यात येत आहे. जेणेकरून शेतकऱ्यांना अशा योजना किंवा उपक्रमांच्या माध्यमातून शेतीसाठी व भरघोस उत्पादनासाठी आवश्यक पायाभूत सुविधा उभारता याव्यात व त्या माध्यमातून जास्तीत जास्त आर्थिक उत्पन्न मिळावे हा त्यामागचा उद्देश आहे.
शेतीमध्ये ज्याप्रमाणे शेतकरी विविध प्रकारच्या फळबागा तसेच भाजीपाला पिकांच्या लागवडीतून आर्थिक उन्नती साधत आहेत. कधी त्याचप्रमाणे काही झाडांच्या लागवडीतून देखील शेतकरी आता आर्थिक समृद्धीच्या दिशेने वाटचाल करताना दिसून येत आहेत. यामुळे आता शेती क्षेत्रात देखील मोठा बदल पाहायला मिळत आहे.
जर आपण वृक्ष लागवडीचा विचार केला तर यामध्ये प्रामुख्याने बांबू लागवडीला देखील शासनाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर प्रोत्साहन देण्यात येत आहे.
बांबू सोबतच जर आपण खैर या झाडाचा विचार केला तर हे देखील एक महत्वपूर्ण असे झाड आहे व याच्या लाकडाला देखील चांगले बाजार मूल्य मिळते. या सगळ्या दृष्टिकोनातून जर बघितले तर रत्नागिरी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता खैर प्रजातीच्या रोपे हे मोफत दिली जाणार आहेत व त्यासाठी नोंदणी करणे आवश्यक आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खैर प्रजातीची रोपे मिळणार मोफत
याबाबत सविस्तर वृत्त असे की, रत्नागिरी मधील जे काही वातावरण आहे ते खैर प्रजातीच्या रोपांच्या शेतीला खूप मानवणारे असून या शेतीला रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये चांगली संधी आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादन वाढीच्या दृष्टिकोनातून खैर वृक्षाची लागवडीत वाढ व्हावी याकरिता पुढच्या वर्षी वनविभागाने सामाजिक वनीकरण विभागाच्या माध्यमातून खैरची मोफत रोपे दिली जाणार आहेत व त्यासाठीची नोंदणी 15 ऑगस्ट 2024 पर्यंत करणे गरजेचे आहे.
जर आपण खैर झाडाचे महत्त्व पाहिले तर परिपक्व आणि मोठ्या झाडाच्या प्रत्येक भागाचा कुठला ना कुठला उपयोग हा होत असतो. उदाहरणच द्यायचे झाले तर खैरच्या लाकडापासून कात तयार केली जाते.तसेच खैरच्या पानांचा उत्तम चारा म्हणून देखील वापर होतो तसेच इमारतीसाठी लाकूड,
कोळसा तयार करण्यासाठी व विविध औषधी खैर झाडाचे साल तसेच फुले, डिंक व लाख यांचा वापर केला जातो. त्यामुळे कोकणातील इतर झाडांप्रमाणे खैराचे झाड एक कल्पतरू आहे असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. शेतकऱ्यांनी जर खैर झाडांची शेती शाश्वतरीत्या केली तर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये कात उद्योगाला देखील चालना मिळेल व कायमस्वरूपी रोजगाराच्या संधी या ठिकाणी निर्माण होऊ शकते.
तसेच या शेतीतून शेतकऱ्यांना चांगला आर्थिक फायदा देखील मिळू शकतो व कायमस्वरूपी त्यांना शाश्वत उत्पन्नाचा स्त्रोत निर्माण होऊ शकतो. जर आपण सध्या खैर लाकडाचे बाजारमूल्य पाहिले तर ते प्रतिटन नव्वद हजार रुपये इतके आहे.
विशेष म्हणजे खैर शेतीसाठी जे काही आवश्यक तंत्रज्ञान किंवा मार्गदर्शन लागते ते वनविभाग आणि सामाजिक वनीकरण विभागाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना करण्यात येणार आहे.
त्यामुळे पुढील वर्षाच्या पावसाळ्यामध्ये शेतकऱ्यांना खैरची लागवड करता यावी याकरिता मोफत रोपांची नोंदणी 15 ऑगस्ट 2024 पर्यंत वन व सामाजिक वनीकरण विभाग रत्नागिरी यांच्याकडे करायचे आहे.
खैर रोपांची मागणी आणि नोंदणीकरिता वनविभाग आणि सामाजिक वनीकरण विभाग, रत्नागिरी यांच्याकडे संपर्क करण्याचे आवाहन देखील करण्यात आलेले आहे.