स्पेशल

पेट्रोल -डिझेलवर चालणाऱ्या वाहनांचे उत्पादन बंद होणार… जाणून घ्या कारण

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टीम, 03 डिसेंबर 2021 :-  जगातली प्रदूषणाच्या पातळीत दिवसेंदिवस वाढ होत आहे. यामुळे उपाययोजना करण्यावर भर दिला जातो आहे. वाहनामधून बाहेर पडणाऱ्या धुराने जगातील प्रदुषणामध्ये मोठी भर घातली आहे.

दरम्यान प्रदुषणावर मात करण्यासाठी सध्या इलेक्ट्रिक वाहनांना प्राधान्य दिले जात आहे. अशात जगातील 6 मोठ्या वाहन निर्माता कंपन्यांनी एक मोठा निर्णय घेतला आहे.

या 6 कंपन्यांनी 2040 पर्यंत पेट्रोल आणि डिझेलवर चालणाऱ्या वाहनांचे उत्पादन बंद करण्याचे मान्य केले आहे. या सहा कंपन्यांपैकी एक कंपनी टाटा समूहाच्या मालकीची आहे.

एका वृत्तानुसार, स्वीडनची व्हॉल्वो, अमेरिकन ऑटोमेकर फोर्ड, जनरल मोटर्स डेमलर एजीची मर्सिडीज बेंझ, चीनची बीवायडी आणि टाटा मोटर्सची जॅग्वार लँड रोव्हर (जेएलआर) ग्लासगोमध्ये प्रतिज्ञापत्रावर स्वाक्षरी करणार आहेत.

तर स्वाक्षरी न करणाऱ्यांच्या यादीत जपानची होंडा, निसान, जर्मनीची बीएमडब्ल्यू, जगातील चौथी सर्वात मोठी कार निर्माता कंपनी स्टेलांटिस आणि दक्षिण कोरियाची ह्युंदाई यांचा समावेश आहे.

दरम्यान स्वाक्षरी केलेल्या या कंपन्या 2040 पर्यंत जीवाश्म इंधनावर चालणाऱ्या वाहनांचे उत्पादन पूर्णपणे बंद करतील. या मोहिमेचा उद्देश इलेक्ट्रिक कार वापरणे आणि शून्य उत्सर्जन असलेल्या इतर वाहनांना प्रोत्साहन देणे हे आहे.

Ahmednagarlive24 Office