स्पेशल

दसऱ्यानंतर तयार होणारा ‘समसप्तक योग’ म्हणजे ‘या’ चार राशींची चांदीच! मिळेल नशिबाची साथ आणि भरपूर पैसा; वाचा आहे का यात तुमची राशी?

Published by
Ajay Patil

ज्योतिषशास्त्रानुसार बघितले तर ग्रह आणि नक्षत्रांची स्थिती आणि त्यानुसार तयार होणारे राजयोग यांचा चांगला किंवा वाईट परिणाम हा प्रत्येक राशीवर होत असतो. तयार होणाऱ्या राजयोगांचा परिणाम हा काही राशींसाठी नुकसानदायक असू शकतो व काही राशींसाठी प्रचंड प्रमाणात फायदा देणारा देखील असतो.

या सणासुदीच्या कालावधीमध्ये अनेक राजयोग तयार होत असून त्यामुळे काही राशींना फलदायी परिणाम देखील पाहायला मिळू शकतात. अगदी याच प्रमाणे बघितले तर 13 ऑक्टोबर रोजी सकाळी पाच वाजून 49 मिनिटांनी धनसंपत्ती आणि सुख सुविधेचा दाता समजला जाणारा शुक्र तूळ राशीतून वृश्चिक राशीमध्ये प्रवेश करणार असल्याने

व त्यासोबत गुरु हा वृषभ राशिमध्ये सध्या स्थित असल्यामुळे ज्योतिष शास्त्रानुसार बघितले तर जेव्हा गुरु आणि शुक्र एक दुसऱ्याच्या सातव्या स्थानावर असतात तेव्हा समसप्तक योग तयार होत असतो. हीच परिस्थिती आता निर्माण झाली असल्यामुळे 13 ऑक्टोबरला हा एक दुर्मिळ असा योग तयार होत असल्याने चार राशींसाठी खूप फायद्याचा आहे.

 दसऱ्यानंतर तयार होणारा समसप्तक राजयोग या चार राशींसाठी ठरेल फलदायी

1- सिंह हा राजयोग सिंह राशींच्या व्यक्तींसाठी खूप शुभ फल देणारा असून या व्यक्तींच्या जीवनात या कालावधीत भरपूर आनंद निर्माण होणार आहे. तसेच धनलाभाचे देखील अनेक स्त्रोत वाढणार आहेत.

या व्यक्तींच्या आर्थिक परिस्थितीमध्ये देखील कमालीची सुधारणा येऊ शकते व नोकरीच्या शोधात असणाऱ्या व्यक्तींना आनंदाची बातमी मिळू शकते. बऱ्याच दिवसापासून जर पैसे अडकले असतील तर या व्यक्तींना ते पैसे या कालावधीत परत मिळू शकतात.

2- वृषभ समसप्तक योग वृषभ राशीच्या लोकांसाठी खूप फायद्याचा ठरणार आहे. कुटुंबातील नातेसंबंध दृढ होण्यास मदत होईल तसेच कुटुंबासोबत भरपूर वेळ घालवण्याच्या संधी देखील मिळतील.जे लोक नोकरी करत असतील त्यांना नोकरीमध्ये बढती मिळेल व पगारात देखील वाढ होण्याची शक्यता आहे.

ज्या लोकांना नवीन व्यवसाय सुरू करायचा असेल त्यांच्याकरिता हा कालावधी उत्तम आहे. तसेच या कालावधीत वाहन घेण्याचा योग देखील आहे.

3- धनु समसप्तक योग धनु राशींच्या व्यक्तींकरिता खूपच फलदायी असून या कालावधीत या व्यक्तींच्या सुख सुविधांमध्ये वाढ होऊ शकते. तसेच या व्यक्तीचे जे जे कार्यक्षेत्र असेल त्यामध्ये नवीन संधी प्राप्त होतील.

पैसे आणि धनलाभाचा योग देखील निर्माण होण्याची शक्यता आहे आणि करिअरच्या दृष्टिकोनातून आनंदाची बातमी मिळू शकते. बऱ्याच दिवसापासून जर एखादे काम अडकले असेल तर ते देखील पूर्ण होऊ शकते.

4- मकर मकर राशींच्या व्यक्तींसाठी समसप्तक योग खूप फायद्याचा असून मकर राशींच्या व्यक्तींना प्रत्येक क्षेत्रामध्ये यश प्राप्त होऊ शकते. जे विद्यार्थी स्पर्धा परीक्षांची तयारी करत असतील त्यांना भरपूर यश मिळेल.

सरकारी नोकरी करिता अर्ज करणाऱ्या व्यक्तींसाठी हा काळ फायद्याचा आणि उत्तम आहे. काही शारीरिक आजारांचे समस्या असेल तर ती समस्या या कालावधीत दूर होण्यास मदत होणार असून या राशींच्या व्यक्तीने जर या कालावधीत गुंतवणूक केली तर त्यावर चांगला नफा मिळू शकणार आहे.

( टीप वरील माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित असून ती वाचकांसाठी माहितीस्तव सादर केलेली आहे. या माहितीविषयी आम्ही कुठल्याही प्रकारचा दावा किंवा समर्थन करत नाहीत.)

Ajay Patil