स्पेशल

तुमच्या नखांचा आकार आणि रंगावरून कळते तुमच्या शरीराचे आरोग्य! जाणून घ्या महत्वाची माहिती

Published by
Ajay Patil

Health Tips:- व्यक्तीचे आरोग्य ठणठणीत आणि सुदृढ असणे हे खूप गरजेचे असते. आरोग्य जर चांगले असेल तर व्यक्ती जीवनामध्ये कुठलेही कामे सहजपणे करू शकतो व यशस्वीपणे कुठल्याही अडचणींवर मात देखील करू शकतो. व्यक्तीकडे काहीही जरी नसले तरी चालेल परंतु आरोग्य सुदृढ आणि ठणठणीत असणे खूप गरजेचे असते.

कारण आरोग्य चांगले असेल तर व्यक्ती कुठलीही नसलेली गोष्ट आरामात मिळवू शकतो. त्यामुळे आरोग्याकडे लक्ष देणे हे खूप गरजेचे आहे. शरीराच्या बाबतीत बघितले तर बऱ्याचदा काही आजार किंवा काही शारीरिक समस्या आतून निर्माण होतात व कित्येक दिवस आपल्याला कळत नाहीत.

परंतु शरीरात काही समस्या निर्माण झाल्या तर त्याची लक्षणे ही आपल्याला शरीराच्या इतर भागांवरून दिसून येतात त्यावरून आपण निर्माण झालेली एखाद्या आरोग्यविषयक समस्या ओळखू शकतो. यामध्ये तुम्हाला नखांचा रंग देखील खूप मोठी मदत करू शकतो. असे म्हटले जाते की नखांच्या रंगावरून देखील आजार आपल्याला ओळखता येणे शक्य आहे.

तसेच नखांचा आकार जर काही विशिष्ट प्रकारचा झाला तर त्यामुळे देखील आपल्याला काही शरीरातील आरोग्य विषयक समस्यांबद्दल एक अंदाज बांधता येऊ शकतो. त्यामुळे या लेखामध्ये आपण याविषयीचे महत्त्वपूर्ण माहिती थोडक्यात बघणार आहोत.

नखांचा रंग आणि आकारावरून ओळखा शरीरातील आरोग्यविषयक समस्या

1- नखांवर पांढरे डाग असणे- बऱ्याचदा आपल्याला नखांवर पांढरे डाग दिसून येतात व याला ल्युकोनीचिया असे देखील म्हणतात. अशा प्रकारचे जर नखांवर पांढरे डाग असतील तर ते साधारणपणे झिंकच्या कमतरतेमुळे किंवा एखाद्या फंगल इन्फेक्शनमुळे दिसू शकतात. तसेच काही वेळेला शरीरातील ऍलर्जीमुळे देखील नखांवर अशा पद्धतीचे पांढरे डाग दिसून येतात.

2- नखे पिवळी होणे- बऱ्याचदा पिवळी नखे ही सामान्यतः दिसतात. जास्त प्रमाणात धूम्रपान केल्यामुळे देखील कधी कधी नखांना अशा प्रकारचा पिवळा रंग येऊ शकतो. दुसरे म्हणजे श्वासाचे विकार,

रूमेटोईड अंथराइटिस, फंगल इन्फेक्शन किंवा थायरॉईड यासारखे विकार असतील तर त्याचे देखील हे लक्षण असू शकते. तसेच महत्त्वाचे म्हणजे नखांमध्ये पिवळा रंग येणे हे डायबिटीसचे देखील लक्षण असू शकते. त्यामुळे आरोग्याच्या चाचण्या करून घेणे फायद्याचे ठरते.

3- नखांचा आकार चमच्याचा आकारासारखा होणे- बऱ्याचदा नखांचा आकार हा चमचा सारखा झालेला दिसतो. यामध्ये नखे ही वळलेली म्हणजे चमच्यासारखी होतात.

असा जर नखांचा आकार झाला तर ते प्रामुख्याने हिमोग्लोबिन, हायपोथायरॉइडिजम किंवा लिव्हर मध्ये काहीतरी समस्या असल्याचे लक्षण असू शकते. याकरिता तुम्ही लोहयुक्त आहार घेणे गरजेचे आहे.

4- मऊ आणि पातळ नखे- बऱ्याच व्यक्तींची नखे पातळ आणि मऊ असतात व अशी नखे तुटण्याची शक्यता देखील जास्त असते. यामधील जर प्रमुख कारण बघितले तर व्हिटॅमिन बी ची कमतरता जर असली तर नखे पातळ होतात.

यासोबत शरीरामध्ये लोह तसेच फॅटी ऍसिड, कॅल्शियम इत्यादींची देखील कमतरता असू शकते. त्यामुळे नखे पातळ आणि मऊ होऊन तुटू लागतात.

Ajay Patil