स्पेशल

Bamboo Farming: धुळ्याचे शिवाजी राजपूत बांबू शेतीतून घेतात वर्षाला 25 लाखाचे उत्पन्न! केली आहे बांबूच्या 19 जातींची लागवड

Published by
Ajay Patil

Bamboo Farming:- फळ आणि भाजीपाला शेती यांच्यासोबत फायदेशीर अशा वृक्षांची लागवड करून देखील शेतकऱ्यांनी आता मोठ्या प्रमाणावर आर्थिक समृद्धी साध्य केलेली आहे. वृक्ष लागवडीचे सगळ्यात महत्त्वाचा फायदा म्हणजे वृक्षांची एकदा लागवड केली की दीर्घकाळापर्यंत उत्पन्न मिळत राहते.

फायदेशीर अशा वृक्ष लागवडीमध्ये प्रामुख्याने बांबू, महोगणी तसेच साग आणि बऱ्याच ठिकाणी आता सफेद चंदनाची देखील लागवड शेतकरी करू लागले आहेत. या वृक्षांच्या लाकडाचा उपयोग हा मोठ्या प्रमाणावर होत असल्याने या वृक्षांची लागवड आर्थिक दृष्टिकोनातून खूप फायद्याची ठरते.

याच मुद्द्याला धरून जर आपण धुळ्यातील शिवाजी राजपूत बांबू शेतीतून लाखो रुपयांचे उत्पन्न वर्षाकाठी मिळवतात व उत्तम असे बांबू शेतीचे नियोजन त्यांनी सध्या केलेले आहे व या लेखात आपण त्यांचीच बांबू शेतीची माहिती थोडक्यात बघणार आहोत.

 धुळ्यातील शेतकरी शिवाजी राजपूत बांबू शेतीतून घेतात वर्षात लाखोचे उत्पन्न

खानदेशातील महत्त्वाचा असलेल्या धुळे जिल्हा व त्या ठिकाणची जर आपण शेतीची परिस्थिती पाहिली तर प्रामुख्याने कापूस आणि मका, कांदा इत्यादी पिके मोठ्या प्रमाणावर घेतले जातात.

परंतु आता शेतकऱ्यांचा कल आधुनिक शेती पद्धतीकडे वळला असून फळबाग लागवड ते आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून भाजीपाला लागवडीच्या माध्यमातून आर्थिक उन्नती करताना आपल्याला दिसून येत आहे.परंतु याही पुढे जात शिवाजी राजपूत यांनी 25 एकर क्षेत्रामध्ये शाश्वत बांबूची लागवड केली असून या माध्यमातून लाखो रुपयांचे उत्पन्न मिळवत आहेत.

सध्या जर आपण हवामानातील बदल तसेच वारंवार येणारी नैसर्गिक आपत्ती इत्यादीमुळे इतर पिकांचे होणारे नुकसान जर बघितले तर त्या दृष्टिकोनातून बांबू शेतीचा पर्याय हा कमी खर्चात जास्त उत्पन्न येणार असल्याने राजपूत यांनी बांबू शेती करण्याचा निर्णय घेतला. शिवाजी राजपूत यांनी त्यांच्या शेतामध्ये तब्बल 19 प्रकारच्या विविध जातींच्या बांबूची लागवड केलेली आहे.

या बांबूच्या जातींमध्ये ज्या जातींचा वापर अगरबत्ती तसेच कोळसा आणि बायोमास ऊर्जा उत्पादनासाठी केला जातो त्या जातींचा समावेश आहे. याही पुढे जात आता बांबूचे खोड तसेच पाने व पावडर पासून देखील अनेकविध उत्पादने तयार करण्याच्या विचारात असून त्या दृष्टिकोनातून प्रयत्न करत आहेत.

 ठिबक सिंचनातून केला आहे बांबूला पाणीपुरवठा

बांबूला पाणी व्यवस्थापन करताना त्यांनी ठिबक सिंचनाचा वापर केला असून त्यामुळे कमीत कमी पाण्यात  एक क्रांतीच घडवून आणलेली आहे. विशेष म्हणजे बांबू शेतीसाठी फार खर्च लागत नसल्यामुळे गेल्या तीन दशकांमध्ये त्यांनी तब्बल सात लाख बांबूची झाडे लावली असून 25 एकर मध्ये मानवनिर्मित बांबूचे जंगल तयार केलेले आहे.

शिवाजी राजपूत यांच्याकडे 50 एकर शेती असून त्यातील 25 एकर क्षेत्रावर त्यांनी बांबूची लागवड केलेली आहे. या 25 एकर मधून ते एका वर्षाला 25 लाखांची कमाई करत आहेत. बांबू उत्पन्नातील त्यांनी जी काही प्रगती केली आहे त्यामुळे राज्य शासनासह त्यांना जागतिक दर्जाचे 30 पेक्षा जास्त पुरस्कार मिळाले आहेत.

Ajay Patil