स्पेशल

नकारात्मक प्रचारातून महाविकास आघाडीला मिळालेले यश फार टिकणारे नाही – राधाकृष्ण विखे पाटील

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

नकारात्मक प्रचारातून महाविकास आघाडीला मिळालेले यश फार टिकणारे नाही.विरोधकांच्या नॅरेटिव्हला उतर देण्यासाठी विधानपरिषद निवडणुक ही संधी आहे.नगर जिल्ह्यातील मत ही निर्णायक ठरणार असल्याने महायुतीचे उमेदवार किशोर दराडे यांच्या विजयासाठी कटिबध्द व्हा असे आवाहन महसूल तथा पालक मंत्री ना राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.

विधानपरीषदेचे महायुतीचे उमेदवार किशोर दराडे यांच्या निवठणूक प्रचारार्थ आयोजित केलेल्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत मार्गदर्शन करताना बोलत होते.जेष्ठ नेते खिलारी गुरूजी उमेदवार किशोर दराडे, शिवाजीराव कर्डीले ,भाजपाचे जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग विठ्ठलराव लंघे प्रा.भानूदास बेरड, सुनिल पंडीत, अभय आगरकर नितीन दिनकर, बाबुशेठ टायरवाले, मनसेचे जिल्हाध्यक्ष बाबा शिंदे रासपच्या जिल्हाध्यक्षा सुवर्णा जर्हाड लहूजी सेनेचे जिल्हाध्यक्ष सुनिल शिंदे मुख्याध्यापक संघाचे संभाजी पवार यांच्यासह शिक्षक आणि पदाधिकारी उपस्थित होते.

आपल्या भाषणात ना.विखे पाटील यांनी लोकसभा निवडणुकीत शिर्डी आणि अहील्यानगर या दोन्ही मतदार संघात पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी घेतलेल्या परीश्रमाबद्दल आभार मानले.राजकारणात जय पराजय होत असतात.पण यंदाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीने अतिशय नियोजनबध्द पध्दतीने नकारात्मक प्रचार केला.

यामध्ये संविधान बदलापासून ते अल्पसंख्याक समाजाची दिशाभूल करण्यात आली.यामध्ये मराठा आरक्षाचा मुद्दा होता.विकासाच्या मुद्दयावरून निवडणूक दूर नेण्यात महाविकास आघाडीला यश आले असले तरी हे वातावरण फार काळ टिकणारे नाही असा दावा मंत्री विखे पाटील यानी केला.

आता नैराशयेची भावना सोडून पुन्हा विधानसभेच्या तयारीला लागा असे आवाहन करून मंत्री विखे पाटील म्हणाले की,नाशिक पदवीधर निवडणुक आपल्याला संधी आहे.महायुतीच्या उमेदवाराच्या विजयासाठी सर्वानी मतदान घडवून आणावे.

केंद्रात आणि राज्यात युतीचे सरकार आहे.नव्या शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी यशस्वी करण्यासाठी वरीष्ठ सभागृहात आपल्या हक्काची माणस असणे गरजेचे असल्याने अहील्यानगर मधील १७हजार मत निर्णायक ठरविण्यासाठी सर्वानी तालुका .स्तरावर नियोजन करण्याबाबतही सूचना केल्या.

उमेदवार किशोर दराडे यांनी मागील सहावर्षात केलेल्या कामाचा आढावा घेवून विरोधकांकडून जाणीवपुर्वक आफवा पसरविल्या जात आहेत.पण नगर मधील मतदार सूज्ञ आहे.राजकारण बाजूला ठेवून शिक्षकांच्या पेन्शनचा निर्णयही महायुती सरकारने केला असल्याचे दराडे म्हणाले.याप्रसंगी शिवाजीराव कर्डीले प्रा.भानूदास बेरड मुख्याध्यापक संघाचे संभाजी पवार यांची भाषण झाली.

अहमदनगर लाईव्ह 24