जगातील सर्वात महाग औषध बनवणारी कंपनी ! महागड्या औषधाच्या चाचण्या थांबवल्या…

Ahmednagarlive24 office
Published:
Marathi News

Marathi News : स्नायू कमकुवत करणाऱ्या आजारासंबंधीच्या औषधाच्या चाचण्या फायझर कंपनीने थांबवल्या आहेत. दोन ते चार वर्षांच्या मुलाचा जेन थेरपीनंतर हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याने या चाचण्या थांबवण्यात आल्या. महत्त्वाचे म्हणजे फायझर हे जगातले सर्वात महागडे असे औषध तयार करण्याच्या प्रयत्नात आहे.

फायझरने नेमके काय घडले किंवा हा मृत्यू फोर्डाडिस्ट्रोजेन मोवापार्वोवेक नावाच्या उपचारामुळे झाला की नाही, हे निश्चित सांगितले नाही.औषध निर्माण क्षेत्रातली सर्वात मोठी आणि नावाजलेली कंपनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या फायझरने लहान बालकाच्या मृत्यूची तपासणी सुरू केली आहे.

त्यामागचे कारण शोधण्यासाठी औषधाच्या चाचण्यांना अल्पविराम देण्यात आला आहे. अशा चाचण्यांमध्ये रुग्णांच्या जीवाच्या सुरक्षेची सर्वाधिक काळजी घेतली जात असते. दगावलेले बालक मध्य- टप्प्यातील अभ्यासाचा भाग होती.

डुचेन मस्क्युलर डिस्ट्रॉफी आजार असलेल्या दोन ते चार वर्षांच्या आतील मुलांचा या चाचणीत समावेश होता. हा दुर्मीळ आजार प्रामुख्याने मुलांना होतो – सुमारे ३५०० पुरुष बालकांपैकी एकाला होतो.

या आजाराने त्रस्त रुग्ण सहसा २५ वर्षांपेक्षा जास्त जगत नाहीत. अभ्यासा दरम्यान तीन गंभीर प्रतिकूल घटना घडल्या, परंतु सर्व मुले दोन आठवड्यांत बरी झाली. फायझरने आठ वर्षांपर्यंतच्या मुलांचा समावेश असलेल्या एका वेगळ्या अंतिम टप्प्यातील अभ्यासात हीच जनुक थेरपी देण्यास सुरुवात केली होती. मात्र ही चाचणीही थांबवण्यात आली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Ahmednagar News