स्पेशल

समुद्रात ह्या ठिकाणी आहे पाताळाचा रस्ता !

Published by
Ahmednagarlive24 Office

Marathi News : समुद्राच्या पाण्याखाली असलेले जगातील सर्वात खोल सिंकहोल मेक्सिकोचे तम जा ब्लू होल संशोधकांनी शोधून काढले आहे. मात्र ते अद्याप तळापर्यंत पोहोचू शकलेले नाहीत.

तम जा ब्लू होल (टीजेबीएच) चेतुमल खाडीमध्ये युकाटान द्वीपसमूहाच्या आग्नेय किनाऱ्यावर आहे. समुद्र सपाटीपासून १३८० फूट म्हणजेच किमान ४२० मीटर खाली पसरले आहे.

या ब्लू होलचा शोध शास्त्रज्ञांनी २०२१ मध्ये पहिल्यांदा लावला, तेव्हा नोंदवलेल्या कागदपत्रांनुसार, त्याची खोली १४६ मीटरपेक्षा जास्त होती. यापूर्वी दक्षिण चीन समुद्रातील सांशा योंगले ब्लू होल हे जगातील सर्वात खोल ब्लू होल होते. त्याची खोली ३०१ मीटर आहे, जी ड्रॅगन होल म्हणून ओळखली जाते. ‘फ्रंटियर्स इन मरीन सायन्स’ या जर्नलमध्ये सोमवारी प्रकाशित अभ्यासात संशोधकांनी ६ डिसेंबर २०२३ रोजी टीजेबीएच येथील पर्यावरणीय परिस्थिती ओळखण्यासाठी स्कूबा डायव्हिंग मोहीम घेण्यात आली.

या मोहिमेदरम्यान संशोधकांनी प्रोफाइलरच्या सहाय्याने चालकता, तापमान आणि खोलीचे मोजमाप घेतले. यादरम्यान, पाण्याचे वास्तविक गुणधर्म ओळखले गेले. त्यानुसार अभ्यासाचा डेटा तम जा ब्लू होल हे जगातील सर्वात खोल ज्ञात ब्लू होल असल्याचे दर्शवतो. ज्याचा तळापर्यंत अद्याप संशोधक पोहोचू शकलेले नाहीत.

प्रोफाइलर ब्लू होलच्या आतील पाण्याच्या विविध स्तरांवर देखील प्रकाश टाकीत असून यात ४०० मीटरपेक्षा कमी पाण्याचा थरदेखील समाविष्ट होता. जेथे तापमान आणि खारटपणाची स्थिती कॅरेबियन समुद्राच्या आसपासच्या किनारपट्टीच्या रीफ लेगूनसारखीच होती. अभ्यासानुसार, टीजेबीएच बोगदे आणि गुहांच्या छुप्या नेटवर्कद्वारे समुद्राशी जोडले जाऊ शकते. ब्लू होल हे पाण्याने भरलेले सिंकहोल आहेत, जे किनारी भागात आढळतात.

गमरवरी किंवा जिप्समसारख्या विरघळणाऱ्या पदार्थांनी बनलेला असतो. जेव्हा पृष्ठभागावरील खडकामधून पाणी शिरते, खनिजे विरघळतात आणि भेगा रुंदावतात तेव्हा ते तयार होतात. त्यानंतर खडक शेवटी कोसळतो. बहामासमधील डीनचे ब्लू होल आणि इजिप्तमधील डहाब ब्लू होल ही त्याची उदाहरणे असल्याचे शास्त्रज्ञांनी सांगितले आहे.

Ahmednagarlive24 Office