स्पेशल

स्वारगेट ते कात्रज मेट्रो प्रकल्पात होणार मोठा बदल! या मार्गावर 3 ऐवजी या’ ठिकाणी होणार आणखी एक मेट्रो ‘स्थानक

Published by
Ajay Patil

Pune Metro Update:- पुणे हे महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी असून एक आयटी हब म्हणून देखील ओळखले जाते. या दृष्टिकोनातून पुणे शहरांमध्ये अनेक पायाभूत प्रकल्पांची कामे मोठ्या प्रमाणावर सुरू आहेत. यामध्ये जर आपण बघितले तर अनेक उड्डाणपूलांची कामे तर सुरू आहेतच.

परंतु मेट्रो सारखे प्रकल्प देखील या ठिकाणी सुरू आहेत. पुण्यामध्ये आता मोठ्या प्रमाणावर मेट्रोचे जाळे विस्तारण्यात येत असून काही मार्गांवर मेट्रो सुरू देखील आहे व काही प्रकल्प आता पूर्णत्वाच्या मार्गाकडे आहेत. पुणे शहरातील वाहतूक कोंडीच्या दृष्टिकोनातून आणि वेगवान प्रवासाकरिता पुणे मेट्रो ही खूप महत्त्वाची आहे.

पुण्यामध्ये ज्या काही मेट्रो मार्गांचे काम सुरू आहे त्यामध्ये स्वारगेट ते कात्रज हा प्रस्तावित भुयारी मेट्रो मार्ग असून तो देखील एक महत्त्वाचा असा मार्ग ठरणार आहे. परंतु याच मेट्रो मार्गाच्या बाबतीत एक महत्त्वाचे अपडेट समोर आली असून या मार्गावर आता काही बदल करण्याचा निर्णय महामेट्रोच्या माध्यमातून घेण्यात आला आहे.

विशेष म्हणजे आता हा बदल केल्यामुळे या प्रकल्पाचा जो काही एकूण खर्च आहे त्यामध्ये 200 ते 300 कोटी रुपयांनी वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

स्वारगेट ते पिंपरी चिंचवड हा मेट्रोमार्ग जेव्हा कार्यान्वित होईल.त्यानंतर स्वारगेट ते कात्रज असे मेट्रो मार्गाचे विस्तारीकरण केले जाणार आहे व या विस्तारित मेट्रो मार्गाची भूमिपूजन दोन महिन्यांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने पार पडली आहे.

स्वारगेट ते कात्रज या भुयारी मेट्रो मार्गात होणार बदल
याबाबत सविस्तर वृत्त असे की, सिविल कोर्ट ते स्वारगेट या भुयारी मेट्रो मार्गाचे लोकार्पण झाल्यानंतर स्वारगेट ते कात्रज या भुयारी मेट्रो मार्गाचे देखील भूमिपूजन झालेले आहे. या विस्तारीकरणाच्या मेट्रो प्रकल्पाच्या दृष्टीने पाहिले तर या ठिकाणी तीन मेट्रो स्टेशन उभारण्यात येणार होती.

परंतु या परिसरातील नागरिक आणि लोकप्रतिनिधी यांची मागणी लक्षात घेऊन आता बालाजीनगर येथे चौथे मेट्रो स्टेशन उभारण्याचा निर्णय महामेट्रोच्या माध्यमातून घेण्यात आला आहे व याला आता पुणे महापालिकेच्या माध्यमातून तत्वतः मान्यता देखील देण्यात आलेली आहे.

नक्कीच या चौथ्या मेट्रो स्थानकामुळे आता धनकवडी आणि बालाजीनगर येथील प्रवाशांना खूप मोठा फायदा होणार आहे. या स्थानकाचा जो काही खर्च येईल तो आता महा मेट्रोला करावा लागणार आहे.

स्वारगेट ते कात्रज मेट्रो मार्गाच्या डीपीआरमध्ये तीन स्थानकांचा आहे समावेश
जर आपण स्वारगेट ते कात्रज मेट्रो मार्गाचा डीपीआर बघितला तर यामध्ये कात्रज, पद्मावती आणि मार्केट यार्ड अशी तीन स्थानके प्रस्तावित आहेत. यामध्ये पद्मावती नंतर थेट कात्रजलाच मेट्रोचे स्थानक असल्यामुळे धनकवडी आणि बालाजी नगर या परिसरातील प्रवाशांची अडचण होण्याची शक्यता होती व त्यामुळे या भागातील नागरिकांची मागणी होती की, बालाजीनगर येथे चौथे मेट्रो स्थानक उभारावे.

तसे पाहायला गेले तर काही वर्षांपूर्वी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये यावर चर्चा झाली होती व स्थानक उभारण्याचा ठराव करण्यात आला होता. जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या विस्तारित मार्गाचे भूमिपूजन झाले त्यानंतर या मेट्रो स्थानकाची मागणी जोर धरत होती.

परंतु नवीन स्थानक जर करायचे असेल तर त्याकरिता महापालिकेच्या सर्वसाधारण सभेचा ठराव लागतो. परंतु या प्रकारचा ठराव द्यायला अनेक वर्ष झाल्याने महा मेट्रोने पालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांच्याकडे नवीन ठराव करून देण्याची विनंती केली होती.

त्यानुसार आता बालाजी नगर येथे नवीन मेट्रो स्थानक उभारायला प्रशासनाच्या माध्यमातून तत्वतः मान्यता देण्यात आलेली आहे व आता हा प्रस्ताव महानगरपालिकेच्या स्थायी समितीकडे मान्यतेकरिता ठेवण्यात आला आहे.

यामध्ये महापालिकेने अट घातली आहे की,या नवीन स्थानकाचा आर्थिक भार महापालिकेवर असणार नाही. परंतु या स्थानकासाठी लागणारी जागा मात्र महापालिका देणार आहे व उभारणीचा खर्च महामेट्रो करणार आहे.त्यामुळे बालाजी नगर येथे मेट्रो स्थानक झाल्यामुळे या परिसरातील प्रवाशांना नक्कीच दिलासा मिळणार आहे.

Ajay Patil