ब्रह्मांडात मोठी घटना होणार ‘तो’ एक तारा फुटणार…

Ahmednagarlive24 office
Published:
Marathi News

Marathi News : ब्रह्मांडात अनेक घटना घडत असतात, आता एक तारा फुटणार असल्याची माहिती नासाने दिली आहे. नासाच्या म्हणण्यानुसार, या ताऱ्याच्या स्फोटामुळे आकाशात मोठा प्रकाश होणार आहे. आजपासून ते सप्टेंबर महिन्यापर्यंत तो तारा कधीही फुटू शकतो.

हा होणारा स्फोट पृथ्वीपासून ३ हजार प्रकाश वर्ष दूर होणार आहे. अशा प्रकारची घटना अनेक वर्षांनंतर एकदाच घडते आणि खगोल शास्त्रज्ञांना अंतराळातील विशेष बदल आणि स्फोट पाहण्याची ही एक संधी असल्याचे नासाने म्हटले आहे.

नोवा नावाच्या ताऱ्याचा स्फोट होणार आहे. तो एवढा मोठा असू शकतो की, तो आपल्याला कुठल्याही दुर्बिणीविना दिसू शकेल. नोवा आपल्या ब्रह्मांडात कोरोना बोरेलिस तारामंडळात आहे.

या संभावित स्फोटाबद्दल नासाचे मीटरॉयड एन्व्हायरन्मेंट ऑफिसचे प्रमुख बिल कुक म्हणाले की, आम्हाला ज्याप्रमाणे ग्रहाचा अचून वेळ माहीत असतो तसा या स्फोटाचा अचूक वेळ आम्ही सांगू शकत नाही. हा जेव्हा होईल, तेव्हा तुम्ही त्याला लक्षात ठेवाल, असा हा स्फोट असेल.

ज्या ताऱ्याचा स्फोट होणार आहे, तो एक बायनरी सिस्टममध्ये बांधलेला आहे. या सिस्टममध्ये एक मोठा तारा असतो आणि एक पांढरा बटू तारा असतो. सध्याच्या परिस्थितीमध्ये मोठा तारा आपले अवशेष पांढऱ्या ताऱ्याच्या पृष्ठभागावर टाकत आहे. कारण हे दोन्ही तारे खूपच जवळून फिरत आहेत.

बटू ताऱ्याच्या तापमानात मोठी वाढ होत आहे. अहवालानुसार असे झाल्यास त्यात थर्मोन्यूक्लियर स्फोट होणे सुरू होईल. शेवटी त्याचे सर्व अवशेष अंतराळात उडतील आणि अवकाश अधिक प्रकाशमान होईल. अंतराळात होणारा हा स्फोट आपण दुर्बिणीविनाही पाहू शकू, असे शास्त्रज्ञांना वाटते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe