स्पेशल

10 हजार रुपयाच्या बजेटमधील नवाकोरा स्मार्टफोन खरेदी करायचा आहे का? ‘हे’ आहेत तुमच्या बजेटमधील बेस्ट 5G स्मार्टफोनचे पर्याय

Published by
Ajay Patil

Budget Smartphone in India:- जेव्हा आपण बाजारामध्ये कुठलीही वस्तू विकत घ्यायला जातो तेव्हा ती वस्तू विकत घेण्याअगोदर ती वस्तू आपल्याला चांगली हवी असते. परंतु त्यासाठी जास्त पैसे मोजण्याची देखील आपली तयारी नसते. म्हणजे ते आपल्या बजेटमध्येच मिळावी अशी अपेक्षा ग्राहकांची असते.

अगदी याच प्रकारची अपेक्षा आपल्याला स्मार्टफोन खरेदीच्या बाबतीत देखील दिसून येते. कमीत कमी किमतीमध्ये चांगल्यात चांगले वैशिष्ट्ये असलेला स्मार्टफोन आपल्याला मिळेल अशी अपेक्षा ग्राहकांची असते व अशाच स्मार्टफोनची निवड ग्राहक करत असतात.

परंतु स्मार्टफोन बाजारामध्ये अनेक कंपन्यांच्या माध्यमातून वेगवेगळ्या किमती आणि वैशिष्ट्य असलेले स्मार्टफोन लॉन्च करण्यात आल्याने स्मार्टफोन खरेदी करताना बऱ्याचदा गोंधळ उडतो.

त्यामुळे आपण या लेखामध्ये बघणार आहोत की जर तुमचा बजेट 10,000 पेक्षा कमी असेल आणि तुम्हाला जर चांगला स्मार्टफोन हवा असेल तर काही बेस्ट स्मार्टफोन ऑप्शनची माहिती घेणार आहोत.
हे आहेत दहा हजार रुपयांपेक्षा कमी बजेट मधील स्मार्टफोन

1- पोको एम 6 प्रो 5G- हा स्मार्टफोन ग्राहकांना ॲमेझॉनवर उपलब्ध होऊ शकतो. या स्मार्टफोनमध्ये चार जीबी रॅम तसेच 128 जीबी स्टोरेज मिळेल. तसेच या स्मार्टफोनमध्ये देण्यात आलेले कॅमेरे बघितले तर यामध्ये फोटोग्राफी करता 50 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा देण्यात आला असून या फोनची बॅटरी 5000 mAh क्षमतेची आहे. जर आपण पोकोच्या या स्मार्टफोनची किंमत बघितली तर ती दहा हजार 999 रुपये इतकी आहे.

2- मोटोरोला जी 45 5G- मोटोरोलाचा हा स्मार्टफोन देखील एक उत्तम फिचर्स असलेला स्मार्टफोन असून फ्लिपकार्टवर तुम्ही अगदी स्वस्तात आणि कमी किमती त्याला खरेदी करू शकतात.

या स्मार्टफोन मध्ये तुम्हाला 50 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा देण्यात आला असून 16 मेगापिक्सलचा सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंग करिता उत्तम कॅमेरा देण्यात आलेला आहे. या स्मार्टफोनची किंमत फ्लिपकार्टवर 9999 रुपये इतकी आहे.

3- सॅमसंग गॅलेक्सी ए14 5G- सॅमसंगचा हा स्मार्टफोन फ्लिपकार्ट आणि सॅमसंगच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे.या स्मार्टफोनमध्ये चार जीबी रॅम देण्यात आली असून त्यासोबत 64 जीबी स्टोरेज यामध्ये मिळते.

या स्मार्टफोनमध्ये 5000 mAh ची बॅटरी तसेच 50 मेगापिक्सलचा कॅमेरा आणि 13 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. या स्मार्टफोनची किंमत सॅमसंग साइट व फ्लिपकार्ट वर साधारणपणे 9999 रुपये इतकी आहे.
अशा प्रकारे तुम्ही तुमच्या बजेटमधील आणि दहा हजार रुपयांच्या किमतीत उत्तम असे हे स्मार्टफोन विकत घेऊ शकतात.

Ajay Patil