स्पेशल

शेती, पोल्ट्री आणि दुग्ध व्यवसायासाठी अतिशय फायद्याची ठरेल ‘ही’ सीएनजी पिकअप! शेतकऱ्यांसाठी राहील खूपच फायद्याची

Published by
Ajay Patil

Mahindra Maxi Truck CNG Pickup:- भारतातील वाहन उत्पादक कंपन्यांची यादी जर बघितली तर यामध्ये महिंद्रा अँड महिंद्रा ही कंपनी अग्रगण्य आणि प्रसिद्ध आहे. ज्याप्रमाणे महिंद्रा कंपनीच्या माध्यमातून अनेक प्रकारचे कार मॉडेल्स उत्पादित केल्या जातात. अगदी त्याचप्रमाणे व्यावसायिक वाहने देखील महिंद्रा अँड महिंद्रा कंपनी मोठ्या प्रमाणावर उत्पादित करते.

व्यावसायिक वाहनांच्या दृष्टिकोनातून बघितले तर महिंद्रा पिकअप या वाहनाचा वापर अनेक क्षेत्रांमध्ये केला जातो. उदाहरणच घ्यायचे झाले तर ज्यामध्ये डेअरी क्षेत्र, शेती आणि पोल्ट्री किंवा लॉजिस्टिक इत्यादी क्षेत्रांचा समावेश आपल्याला करता येईल.

अतिशय उत्तम मायलेज आणि मजबूत असल्यामुळे महिंद्राच्या बोलेरो सिरीज मधील पिकअप वाहन प्रत्येकाची पहिली पसंती असल्याचे आपल्याला दिसून येते.

तुम्ही देखील जर दुग्ध व्यवसायामध्ये असाल किंवा पोल्ट्री, शेती व्यवसायात असाल व तुम्हाला जर पावरफुल अशी पिकअप खरेदी करायची असेल तर तुम्ही महिंद्रा बोलेरो मॅक्सिट्रक सीएनजी पिकअप खरेदी करू शकतात. या व्यवसायांसाठी हे वाहन तुमच्यासाठी उत्तम पर्याय ठरू शकते.

कसे आहे महिंद्रा बोलेरो मॅक्सी ट्रक सीएनजी पिकअपचे स्वरूप?
या पिकअपमध्ये MSI 2500 CNG BS6 इंजिन देण्यात आलेले असून ते 2533 क्षमतेचे असून चार सिलेंडर मध्ये येते. हे इंजिन 67 हॉर्स पावर आणि 178 एनएम टॉर्क जनरेट करते. ही सीएनजी पिकप 17.7 किलोमीटर परकिलो इतके मायलेज देते.

या पिकअपचा कमाल वेग 80 किलोमीटर प्रति तास इतका असून या वाहनामध्ये 146 लिटर क्षमतेची इंधन टाकी येते. त्यामुळे तुम्ही एकदाच इंधन भरून लांबचा प्रवास पूर्ण करू शकतात. महिंद्रा बोलेरो मॅक्सीट्रक सीएनजी पिकअपची लोडिंग क्षमता अकराशे पन्नास किलो असून तिचे एकूण वजन 2750 किलो आहे.

कंपनीने ही पिकअप 3150 मीमी व्हिल बेस मध्ये तयार केली असून 4855 मीमी लांबी तर १७०० मीमी रुंद आहे. उंची बघितली तर ती 1725 मीमी आहे.

महिंद्रा बोलेरो मॅक्सीट्रक सीएनजी पिकपअची वैशिष्ट्ये
महिंद्रा बोलेरो मॅक्सिट्रक सीएनजी पिकअपमध्ये पावर स्टेरिंग देण्यात आली आहे. त्यामुळे खडबडीत रस्त्यांवर देखील आरामशीर ड्रायव्हिंगचा अनुभव घेता येतो.

तसेच कंपनीने यामध्ये पाच फॉरवर्ड+ एक रिव्हर्स गिअर सह गिअरबॉक्स दिला असून यामध्ये सिंगल प्लेट क्लच देण्यात आला आहे व ते ऑल सिंक्रमेश प्रकारच्या ट्रान्समिशनसह येते. महिंद्राने ही पिकअप एक ड्रायव्हर + एक पॅसेंजर सीटसह बाजारात आणला आहे. यामध्ये कंपनीने डिस्क/ ड्रम प्रकारचे ब्रेक दिले असून जे टायर्स वर मजबूत पकड ठेवतात.

किती आहे महिंद्रा बोलेरो मॅक्सीट्रक सीएनजी पिकअपची किंमत आणि वारंटी?
महिंद्रा बोलेरो मॅक्सिट्रक सीएनजी पिकअपची एक्स शोरूम किंमत सात लाख 26 हजार ते सात लाख 65 हजार इतकी असून या वाहनाची ऑन रोड किंमत आरटीओ नोंदणी आणि रोड टॅक्समुळे काही राज्यांमध्ये बदलू शकतो. कंपनीने या पिकअप सह तीन वर्ष आणि एक लाख किलोमीटर पर्यंतची वारंटी दिली आहे.

Ajay Patil