Business Idea : तुम्ही अनेक बिझनेस बद्दल ऐकले असेल. विविध आयडिया तुम्ही पाहिल्या असतील. येणारा खर्च व त्यातून किती मार्जिन घ्यायचे यावर अवलंबुन असते वस्तूची किंमत, बरोबर ना ! पण आज आम्ही तुम्हाला अशी एक बिझनेस मॉडेलविषयी सांगणार आहोत
की त्यात तुमचे प्रोडक्ट तुम्हाला फुकट विकायचे आहे व तरीही तुम्ही पुषकळ पैसे कमवाल. जाणून आश्चर्य वाटले ना? पण अशी एक कंपनी आहे की जी फुकट पाणी बॉटल विकते. तरीही लाखो रुपये कमावते. हा एक युनिक बिझनेस आहे.
तुम्हाला प्रश्न पडला असेल की फुकटात पाणी वाटून पैसे कसे कमावता येतील? चला आपण येथे त्या बिझनेस मोड्यूलविषयी जाणून घेऊयात –
फ्रीवॉटर बिझनेस : एक युनिक मॉडेल
आपण ज्या विषयी बोलत आहोत तो अमेरिकन स्टार्टअप आहे. त्याच नाव आहे फ्रीवॉटर. ही कंपनी फुकटात पाणी देते. परंतु हे करत असताना कंपनी पाणी देण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या बाटल्यांवर जाहिराती छापते. त्यामुळे ज्या कंपनीची पाण्याच्या बाटलीवर जाहिरात असते ती कंपनी जाहिरातीचे पैसे देते.
कंपनीलाही फायदा होतो. याचे कारण असे की, मोफत पाणी वाटप असल्याने सर्व स्तरातील लोक या कंपनीच्या बॉटल विकत घेतात. त्यामुळे बाटलीवर कोणत्याही कंपनीची जाहिरात छापली तरी ती कंपनी लोकप्रिय होऊन जाते. त्याचे ऍटोमेटिक ब्रॅण्डिंग होऊन जाते. म्हणजेच तुमच्या लक्षात आलं असेल की, मोफत पाणी देऊनही बक्कळ पैसे कसे कमवता येतील ते.
पर्यावरणाचीही घेतली काळजी
आता प्रश्न असा पडला असेल की ही कंपनी भरपूर पाणी बॉटल वाटत असणार व यातून या प्लास्टिक बॉटलमुळे मोठे प्रदूषण होत असणार. परंतु तसे अजिबात नाही. प्रदूषण रोखण्यासाठी कंपनी प्लास्टिक बॉटल देत नाही.
या कंपनीने पाणी पुरवण्यासाठी ज्या बाटल्या वापरल्या आहेत त्या पेपर लीक प्रूफ पॅकेजिंग बॉक्स किंवा अॅल्युमिनियमच्या बाटल्या आहेत. याने पर्यावरणाचे रक्षण तर होतेच.
परंतु कंपनी आपल्या नफ्यातील 10 टक्के रक्कम अंडर प्रिविलेज्ड कॅटेगिरी मधील लोकांच्या कल्याणासाठी वापरते. या लोकांना शुद्ध पिण्याचे पाणी मिळावे म्हणून या पैशातून कंपनी विहिरी खोदते. म्हणजेच कंपनी पर्यावरणाबरोबरच समाजाचीही काळजी घेते.
तुम्ही करा ‘असा’ विस्तार
तुम्हीही या बिझनेस मॉडेलवर काम करून पैसे कमावू शकता. आपल्याकडे लग्न, धार्मिक कर्यक्रम मोठया प्रमाणात होतात. अशा वेळी त्याचा वापर करून आपण जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचू शकतो. त्यामुळे तुम्हीही हा बिजनेस करून भरपूर कमाई करू शकता.