Attero : कचऱ्यापासून सोने बनवते ‘ही’ कंपनी, छोट्या बिझनेस आयडियाने आज उभी केली 300 कोटी रुपयांची कंपनी

Ahmednagarlive24 office
Published:
Attero

Attero : सध्या अनेक लोक स्टार्टअप्स साठी धडपड असतात. काही लोक यात मोठं यश संपादन करतात. परंतु काही लोक यातही काहीतरी युनिक करण्याचा प्रयत्न करतात. आजकाल प्रदूषण ही समस्या मोती बनत चाललीय.

अनेक लोकांचे स्टार्टअप यशस्वी होतात परंतु ते प्रदूषण करण्यास देखील पुढे असतात. परंतु आज आपण या ठिकाणी अशा एका व्यक्तीची यशोगाथा पाहणार आहोत की ज्याने कचऱ्यातून मौल्यवान धातू बनवण्याचा बिझनेस सुरु केला व आज 300 कोटींची कंपनी उभी केली आहे.

विशेष म्हणजे त्यांच्या स्टार्टअप मधून प्रदूषण तर होतच नाही परंतु पर्यावरणास मदतच होतेय, वरून पैसे कमावतायेत ते वेगळेच. आज आपण या ठिकाणी Attero Startup यांची यशोगाथा पाहणार आहोत. ही कंपनी खराब झालेले लॅपटॉप, फोन आणि टॅब्लेट यांसारख्या इलेक्ट्रिक कचऱ्याचे रिसायकल करते व त्यातून सोने, चांदी, अॅल्युमिनियम आणि तांबे यांसारखे मौल्यवान धातू बाजूला करते व पैसे कमावते..चला जाणून घेऊयात…

* Attero कंपनीविषयी थोडेसे

नितीन गुप्ता आणि रोहन गुप्ता या दोघांनी Attero कंपनीची सुरवात केली. 2008 मध्ये एक नवीन आयडिया घेऊन त्यांनी हा स्ट्रार्टअप सुरू केला. भारतामध्ये ई-कचऱ्याचा फार मोठा प्रश्न उभा राहिला होता. लॅपटॉप आणि मोबाईलची मागणी वाढत असल्याने भारतातील ई-कचऱ्याचे प्रमाणही वाढत चालले होते.

हे लक्षात घेऊन या दोघांनी ई-कचऱ्याच्या मदतीने चांगले पैसे कमावता यावेत आणि आपल्या पर्यावरणालाही त्याचा फायदा व्हावा या उद्देशाने हा बिझनेस सुरु केला. आज ही कंपनी खराब झालेल्या लॅपटॉप, मोबाईल फोन, टेलिव्हिजन, टॅब्लेट आणि रेफ्रिजरेटर्स मधून सोने, चांदी, अॅल्युमिनियम आणि तांबे यांसारखे अनेक प्रकारचे धातू बाजूला काढते.

यातून ते तर पैसे कमवतातच परंतु पर्यावरणासही मदत होते. यात प्रगत झाल्यानंतर नितीन आणि रोहन यांनी ली-आयन बॅटरी रीसायकल कशी करता येईल यावर बरेच संशोधन करण्यास सुरुवात केली. त्यांचे संशोधन यशस्वी देखील झाले. 2019 मध्ये, त्यांनी लि-आयन बॅटऱ्यांचाही पुनर्वापर सुरू केला. ई-कचऱ्यामध्ये लि-आयन बॅटरीचा मोठ्या प्रमाणात अढथळा आहे. त्यामुळे ही कंपनी लि-आयन बॅटरी रीसायकल करून चांगला नफा कमवत आहे.

* कंपनीकडे आहेत तब्बल 38 पेटंट

Attero ने तब्बल 38 टेक्निकवर पेटंट घेतले आहे. ली-आयन बॅटरीच्या रीसायकल प्रक्रियेचे पेटंट देखील घेतले आहे कारण ही कंपनी यासाठी पूर्णपणे नवीन तंत्रज्ञान वापरते. Attero ने आर्थिक वर्ष 22 मध्ये 40 कोटी रुपयांचा नफा आणि सुमारे 214 कोटी रुपयांचा महसूल मिळवला होता. या FY23 मध्ये कंपनीने आतापर्यंत सुमारे 300 कोटी रुपयांची कमाई केली आहे.

* विविध प्रोडक्ट बनवते कंपनी व लवकरच करेल ८ हजार कोटींचा रेव्हिन्यू

सध्या हे कंपनी देशांतर्गत आणि आंतरराष्‍ट्रीय बाजारपेठेमध्‍ये उत्‍तम दर्जाची प्रोडक्ट देखील पुरवते. 99% शुद्ध कोबाल्ट चिप्स आणि फार्मास्युटिकल ग्रेड लिथियम कार्बोनेट आदी प्रोडक्ट यामध्ये येतात. येत्या काळात ही कंपनी आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठ्या स्तरावर आपले काम वाढवणार आहे. त्यामुळे कंपनी येत्या 3 वर्षांमध्ये आपला महसूल सुमारे 8,000 कोटी रुपयांपर्यंत वाढवेल असे म्हटले जात आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe