स्पेशल

पावसाळ्यात उत्तराखंडला जा आणि खरे निसर्गाचे सौंदर्य काय असते हे अनुभवा! उत्तराखंड मधील हिल स्टेशन म्हणजे पृथ्वीवरील जणू स्वर्गच

Published by
Ajay Patil

भारतामध्ये अनेक प्रसिद्ध पर्यटन स्थळे, अध्यात्मिक स्थळे तसेच निसर्गाने समृद्ध असलेली हिल स्टेशन आहेत. तसेच भारतातील बऱ्याच पर्यटन स्थळांना काही विशिष्ट ऋतूंमध्ये भेट दिली तर त्या ठिकाणाचे सौंदर्य हे डोळ्यात भरणारे असते. सध्या पावसाळ्याचा कालावधी सुरू झाल्यामुळे या कालावधीत सगळीकडे हिरवाई पसरलेली असते व रिमझिम पाऊस तसेच खळाळणाऱ्या नद्या व नाले,

निसर्गाशी हितगुज करत खळाळुन वाहणारे धबधबे इत्यादी दृश्य पाहण्याच्या आनंद हा मनाला मोहन टाकणारा असतो व त्यामुळेच पावसाळ्याच्या कालावधीत आपल्यापैकी बरेच जण कुठेतरी चांगल्या निसर्गरम्य ठिकाणी फिरायला जाण्याचा प्लान आखतात.जर भारतातील महत्त्वाच्या असलेल्या पर्यटन स्थळांचा दृष्टिकोनातून पाहिले तर उत्तराखंड हे राज्य समृद्ध आहे.

या ठिकाणी जर तुम्हाला भेट द्यायचे असेल तर पावसाळ्याचा कालावधी हा एक उत्तम कालावधी ठरतो. या काळात या ठिकाणाचे हवामान अतिशय अल्हाददायक असते व सर्वीकडे निसर्गाने मुक्तपणे सौंदर्याची उधळण केल्याचे आपल्याला दिसून येते. जर तुमचा देखील या पावसाळ्यात उत्तराखंडला भेट देण्याचा विचार असेल तर तुम्ही या ठिकाणी असलेले पाच उत्तम असे हिल स्टेशन पाहणे महत्त्वाचे ठरते. त्यामुळे उत्तराखंड राज्यातील लोकप्रिय असलेली हिल स्टेशन्स कोणती? याबद्दलची थोडक्यात माहिती आपण बघू.

 ही आहेत उत्तराखंड राज्यातील पाच उत्तम हिल स्टेशन

1- नैनिताल उत्तराखंड राज्यातील नैनीताल हे एक प्रसिद्ध आणि लोकप्रिय स्टेशन असून या ठिकाणी असलेला नयनी तलाव हा अतिशय प्रसिद्ध आणि सुंदर देखील आहे. तुम्ही या ठिकाणी बोट चालवू शकतात व नैनीतालमध्ये असलेली टिफिन टॉप, स्नो व्ह्यू पॉईंट, नंदादेवी मंदिर आणि इको केव्ह सारख्या ठिकाणांना भेट देऊ शकतात.

2- मसूरी मसूरी हे ठिकाण देखील उत्तराखंड राज्यातील एक महत्त्वाचे आणि सुंदर असे ठिकाण आहे व या ठिकाणाला टेकड्यांची राणी असे देखील संबोधले जाते. मसूरी हे एक आकर्षक लोकप्रिय असे हिल स्टेशन असून या ठिकाणी तुम्ही अनेक मनोरंजक गोष्टींचा देखील आनंद घेऊ शकतात. जर तुम्ही मसुरीला गेला तर त्या ठिकाणी असलेल्या केम्पटी फॉल्स, गनहील, लेक मिस्ट्री, धारा दून आणि मॉल रोड यासारख्या ठिकाणांना भेट देऊ शकता.

3- औली हे उत्तराखंडचे प्रसिद्ध स्की रिसॉर्ट असून या ठिकाणी तुम्ही हिमवर्षावाचा आनंद घेऊ शकतात आणि स्किइंग, स्नो बोर्डिंग आणि इतर हिवाळी खेळांचा आनंद या ठिकाणी तुम्हाला घेता येऊ शकतो. औली या ठिकाणी भेट दिली तर तुम्ही गुरुगोविंद सिंग जी मेमोरियल, नंदादेवी नॅशनल पार्क आणि व्हॅली ऑफ फ्लॉवर सारख्या ठिकाणांना देखील भेट देऊ शकतात व तुमचा आनंद द्विगुणीत करू शकतात.

4- राणीखेत उत्तराखंड राज्यातील राणीखेत हे एक उत्तम हिल स्टेशन असून त्या ठिकाणचे शांत आणि सुंदर वातावरण मनाला मोहून टाकते. तसेच राणीखेत या ठिकाणी असलेले अनेक नयनरम्य दृश्य हे डोळ्यांचे पारणे फेडणारे आहेत. या ठिकाणी असलेले चौखुटिया गार्डन, टायगर हिल तसेच कल्याण वॉर्ड आणि जिम कार्बेट नॅशनल पार्क सारखी ठिकाणी भेट देण्यासाठी उत्तम आहेत.

5- अल्मोडा अल्मोडा उत्तराखंड मधील एक महत्त्वाचे ठिकाण असून हे ऐतिहासिक स्टेशन म्हणून देखील ओळखले जाते. या ठिकाणी जर तुम्ही भेट दिली तर गोविंद घाट तसेच जगदीश मंदिर आणि रॉयल ऑब्झर्वेटरी, कासिम सोवे मकबरा  यासारख्या ठिकाणांना भेट देऊ शकतात.

Ajay Patil