स्पेशल

उच्चशिक्षित तागड दांम्पत्याने धरली आधुनिक शेतीची कास! 5 वर्षात 2 लाख खर्चून कमावले 10 लाख; वाचा त्यांची शेतीची पद्धत

Published by
Ajay Patil

एखाद्या विषयामध्ये उच्चशिक्षित राहणे व त्या शिक्षणाच्या व त्यातून मिळालेल्या ज्ञानाचा वापर शिक्षणाच्या संबंधित क्षेत्रामध्ये करिअर किंवा नोकरी करणे हे खूप महत्त्वाचे असते व साधारणपणे शिक्षण घेऊन अशाच प्रकारे शिक्षणाच्या संबंधित क्षेत्रामध्ये करिअर किंवा नोकरी केली जाते.

परंतु असे अनेक लोक या समाजामध्ये आपल्याला दिसून येतात की ते उच्चशिक्षित असतात. परंतु त्या शिक्षणाचा उपयोग जरा वेगळ्या पद्धतीने करून त्यातून मिळालेल्या ज्ञानाचा वापर कौशल्यपूर्ण रीतीने करून मोठ्या प्रमाणावर यशस्वी होताना आपल्याला दिसून येतात.

याच मुद्द्याला धरून जर आपण शेतीक्षेत्र बघितले तर सध्या शेती क्षेत्रामध्ये अनेक उच्चशिक्षित असे तरुण-तरुणी येत असून ते त्यांच्या शिक्षणाचा व समृद्ध ज्ञानाचा वापर करून शेती देखील समृद्ध बनवत आहेत. याच पद्धतीने आपल्याला बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यात असलेल्या शिरापूर येथील तागड दाम्पत्याचे उदाहरण घेता येईल.

सावन कुमार आणि त्यांच्या पत्नी प्रगती तागड हे दोघेही उच्चशिक्षित आहेत. परंतु उच्च शिक्षण घेऊन देखील नोकरी न करता किंवा नोकरी न शोधता त्यांनी शेती करण्याचा निर्णय घेऊन केसर आंब्याची लागवड केली व आर्थिक उन्नतीचा त्यांचा मार्ग सुकर केला व लाखोंचे उत्पन्न त्या माध्यमातून मिळवले.

 सावन कुमार आणि त्यांच्या पत्नी प्रगती तागड यांची यशोगाथा

याबाबत सविस्तर वृत्त असे की, बीड जिल्ह्यात असलेल्या आष्टी तालुक्यातील शिरापूर या गावचे सावन कुमार तागड व त्यांच्या पत्नी प्रगती तागड हे उच्च शिक्षित दाम्पत्य असून तरीदेखील त्यांनी नोकरीच्या मागे न लागता शेती करण्याचा निर्णय घेतला व केसर आंब्याची लागवड करून लाखो रुपयांचे उत्पन्न त्या माध्यमातून मिळवले.

नोकरी करून इतरांच्या अधिपत्याखाली काम करण्यापेक्षा आपण स्वतःचे बॉस बनुन काहीतरी स्वतःचे विश्व निर्माण करणे याला खूप महत्त्व असते व हाच धागा पकडत या दाम्पत्यांने आधुनिक पद्धतीने शेती करण्याचा निर्णय घेतला व उत्तम शेती करून आर्थिक उन्नती साधली.

 केली केसर आंब्याची लागवड

जेव्हा त्यांनी शेती करण्याचा निर्णय घेतला तेव्हा त्यांनी संपूर्ण ज्ञानाचा उपयोग करण्याचे ठरवले व सोशल मीडिया तसेच विविध ठिकाणी ठेवले जाणारे कृषी प्रदर्शन यांना भेटी देऊन व्यवस्थित आधुनिक पद्धतीच्या शेतीचा अभ्यास केला व आधुनिक पद्धतीने शेती करावी हा निर्णय घेऊन पाच वर्षांपूर्वी त्यांनी बीड येथून केसर आंब्याची 400 झाडे आणले व त्यांची लागवड केली.

त्यांची दोन एकर जिरायत शेती असून त्यांनी या क्षेत्रामध्ये पंधरा बाय पंधरा या अंतरावर ठिबक सिंचनाच्या माध्यमातून पाण्याची सोय केली व केसर आंब्याची लागवड केली. या आंब्याच्या व्यवस्थापनाच्या पोटी लागवड, विविध प्रकारच्या फवारण्या तसेच आवश्यक मजुरी व इतर गोष्टींवरचा खर्च पकडून त्यांना दोन लाख रुपये एकूण खर्च आला.

आंब्याच्या लागवडीतून त्यांना मागच्या वर्षापासून उत्पादन मिळायला सुरुवात झाली व सुरुवातीला म्हणजेच पहिल्याच वर्षी दोन लाखाचे आर्थिक उत्पन्न त्या माध्यमातून मिळाले व यावर्षी आठ लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले. या पद्धतीने त्यांनी दोन लाख रुपये खर्चात साधारणपणे पाच वर्षात दहा लाखांचे उत्पन्न मिळवले.

 फळबागेला देतात सेंद्रिय खत

फळबागाला खतांचा पुरवठा करण्याकरिता रासायनिक खतांऐवजी त्यांनी सेंद्रिय खते देऊन जास्तीत जास्त शेती पोषक करण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न केले व शेतीला सेंद्रिय खत उपलब्ध व्हावे म्हणून सात गायी पाळल्या असून या गायींच्या माध्यमातून मिळणारे शेण खताचा वापर ते शेतासाठी करतात व जोडीला जोडधंदा म्हणून त्यांचा दूध व्यवसाय देखील आहे.

अशा पद्धतीने तागड दांपत्याच्या या शेतीवरून आपल्याला दिसून येते की जर शिक्षणात मिळालेल्या ज्ञानाचा कौशल्यपूर्ण वापर केला व आधुनिक पद्धतीने शेती केली तर लाखो रुपयांचे उत्पन्न शेतीच्या माध्यमातून मिळवता येते हे सिद्ध होते.

Ajay Patil