स्पेशल

कशी झाली निरमा वॉशिंग पावडरची सुरुवात? कुठल्या घटनेने उभारली गेली कंपनी? 7 हजार कोटींची आहे उलाढाल

Published by
Ajay Patil

डिटर्जंट पावडर म्हटले म्हणजे सगळ्यांच्या डोळ्यासमोर फक्त एकच नाव येते ते म्हणजे निरमा पावडर. आज देखील आपण दुकानांमध्ये वाशिंग पावडर घ्यायला गेलो तरी आपण निरमा पावडर आहे का किंवा निरमा पावडर द्या अशा पद्धतीनेच वाशिंग पावडरची मागणी करत असतो. इतक्या मोठ्या प्रमाणावर हा ब्रँड प्रसिद्ध झाला आहे. गेल्या कित्येक दशकापासून घराघरांमध्ये मोठ्या प्रमाणावर निरमा वॉशिंग पावडर चा वापर केला जातो.

भारताचा कुठलाही भाग राहू द्या त्या भागामध्ये निरमा वाशिंग पावडरचे नाव माहित नसेल असे होऊ शकत नाही. एकेकाळी या निरमा वॉशिंग पावडरने बाजारपेठेमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर धुमाकूळ घातला होता व आज देखील तेवढाच हा ब्रँड प्रसिद्ध आहे. आजमीतिला बाजारपेठेतून निरमा पावडर बऱ्याच अंशी कमी झाली तरी देखील आज बाजारपेठेमध्ये ही कंपनी टिकून आहे. तसेच महत्त्वाची गोष्ट म्हणजे या कंपनीच्या माध्यमातून लवकरच ग्लेनमार्क लाइफ सायन्सेस ही कंपनी देखील खरेदी केली जाणार आहे. अशा या प्रसिद्ध कंपनीची सुरुवात कशी झाली या मागची कहानी देखील तेवढीच रोमांचित करणारी आहे.

 अशा पद्धतीने झाली निरमा कंपनीची सुरुवात

निरमा कंपनीची सुरुवात पाहिली तर करसन भाई पटेल या गृहस्थाने स्वतःच्या स्वर्गवासी निरुपमा या त्यांच्या  मुलीच्या आठवणीमध्ये व तिच्याच नावाने या कंपनीची सुरुवात केली होती. करसन भाईंची कौटुंबिक पार्श्वभूमी पाहिले तर त्यांचा जन्म हा शेतकरी कुटुंबात झालेला होता व कसेबसे शिक्षण पूर्ण करून त्यांनी काही कालावधी करिता एका सरकारी विभागांमध्ये लॅब टेक्निशियन अर्थात प्रयोगशाळा तंत्रज्ञाचे काम देखील केले.

हे काम करत असताना त्यांना काही रसायनांची माहिती होती व  त्या माहितीचा वापर करूनच त्यांनी ग्राहकांना स्वस्तामध्ये वाशिंग पावडर अर्थात कपडे धुण्याची पावडर उपलब्ध करून द्यावी असा विचार केला व घरातच वाशिंग पावडर तयार करायला सुरुवात केली. त्यांच्या राहत्या घरामध्ये एक मोकळी जागा होती व या जागेतच ते डिटर्जंट पावडर तयार करू लागले. महत्त्वाचे म्हणजे ही तयार पावडर विकण्यासाठी त्यांना स्वतः सायकलवरून गावगाव फिरावे लागले व अशा पद्धतीने त्यांनी हळूहळू ही पावडर लोकांमध्ये प्रसिद्ध केली.

ग्रामीण भागातील त्यांची नेमकी गरज काय आहे व त्यांना किती किमतीत वाशिंग पावडर घेणे परवडेल याचा पूर्ण आराखडा बांधून करसनभाई पटेल यांनी त्यांचा व्यवसाय वाढवण्याची प्लॅनिंग केली व त्या पद्धतीने काम केले. सर्वात स्वस्त वॉशिंग पावडर ग्राहकांना मिळावी या माध्यमातून त्यांनी काम करत असताना हिंदुस्तान युनीलिव्हर त्यांची वाशिंग पावडर पंधरा रुपयांना विकत होते व करसन भाई निरमा पावडर अवघ्या तीन रुपयांना विकत होते. हे निरमा पावडर विकत असताना त्यांनी खूप जबरदस्त मार्केटिंग केली व जाहिरातींमधून लोकांची लक्ष निरमा पावडरकडे वेधून घेतले.

बाजारामध्ये या क्षेत्रात प्रसिद्ध असलेले हिंदुस्तान युनिलिव्हरची रीन या ब्रँडला जबरदस्त टक्कर दिली व त्याकरिता बाजारामध्ये निरमा साबण देखील लाँच केला. या निरमा साबणाचे प्रमोशन व्हावे याकरिता त्यांनी निर्मा पावडर सोबत साबण फ्री देणे सुरू केले. पटेल यांच्या निरमा वाशिंग पावडर आणि निरमा साबण याची बाजारातील भागीदारी पाहिली तर ती तब्बल 60 टक्के होती. त्यानंतरच्या कालावधीत निरमाला टक्कर देण्यासाठी बाजारामध्ये व्हील साबण आला.

त्यानंतर मात्र 2000 सालानंतर निरमा या ब्रँडला टक्कर देण्यासाठी अनेक ब्रँड ने डिटर्जंट प्रोडक्ट बाजारामध्ये लॉन्च केले. या नंतरच्या ब्रँड मध्ये जर घडी डिटर्जंट या ब्रँडचे नाव घेतले तर याने निरमाला खूप मोठी स्पर्धा निर्माण केली व हळूहळू घडी डिटर्जंट मुळे निरमा हळूहळू स्पर्धेतून मागे सरली.

परंतु आता बाजारामध्ये स्पर्धा वाढल्याने करसनभाई यांनी सिमेंट आणि केमिकल बिजनेस याकडे वळण्याचा निर्णय घेतला व त्यांनी अमेरिकेतील सियरल्स वैली मिनरल्स सोडा ऐश कंपनी खरेदी केली. या कालावधीमध्ये त्यांनी 2010 यावर्षी निरमा वॉशिंग पावडर डीलिस्ट करून इतर उत्पादने आणि क्षेत्राकडे जास्त लक्ष केंद्रित करण्याचे ठरवले. निरमाच्या डी लिस्टिंग नंतर निरमा अधिग्रहणाच्या मदतीने सिमेंट व्यवसाय मजबूत करायला सुरुवात केली व 2014 मध्ये निरमाने तब्बल 1.4 अरब डॉलर मध्ये लाफार्ज सिमेंट कंपनी खरेदी केली. त्यानंतर बेंगलोर मधली स्टेरीकॉन फार्मा ही कंपनी खरेदी केली आहे.

Ajay Patil

Published by
Ajay Patil