स्पेशल

Cheapest Car: ‘या’ कार देतात अतिशय कमीत कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त मायलेज; या आहेत भारतातील सर्वात स्वस्त मिळणाऱ्या कार

Published by
Ajay Patil

Cheapest Car:- व्यक्ती कुठलीही वस्तू घ्यायला गेला तरी वस्तूची निवड करताना ती आपल्याला बजेटमध्ये म्हणजेच कमीत कमी खर्चात मिळेल व चांगली मिळेल या प्रयत्नात असल्याचे दिसून येते. अगदी हीच बाब कुठलेही वाहन खरेदी करताना देखील आपल्याला दिसते. मग एखाद्या व्यक्तीला स्कूटर खरेदी करायची असो वा बाईक किंवा कार या सगळ्यांमध्ये देखील याच पद्धतीचा ट्रेंड आपल्याला ग्राहकांमध्ये दिसून येतो.

कार घेताना देखील प्रत्येक जण स्वस्तामध्ये म्हणजेच कमीत कमी खर्चामध्ये कशी मिळेल या दृष्टिकोनातून प्रयत्न करत असतो व या कमी खर्चामध्ये चांगले मायलेज व इतर उत्तम वैशिष्ट्ये मिळतील याकडे लक्ष देत असतो.

याच मुद्द्याला धरून जर तुमचा देखील अशाच पद्धतीने कमीत कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त मायलेज देणारी कार खरेदी करण्याचा विचार असेल तर या लेखामध्ये असेच आपण कमी बजेटमध्ये असलेल्या व उत्कृष्ट असे मायलेज देणाऱ्या काही कार विषयी माहिती थोडक्यात बघू.

 या कार कमी खर्चात देतात चांगले मायलेज

1- मारुती सुझुकी एसप्रेसो तुम्हाला देखील एखादी लहान म्हणजेच मारुती सुझुकी अल्टो सारखी कार हवी असेल व ती कमी किमतीत व चांगली मायलेज देणारी असावी असे वाटत असेल तर तुमच्याकरिता मारुती सुझुकी एस प्रेसो हा एक उत्तम पर्याय ठरू शकतो.

कमी किमतीमध्ये ही कार उत्तम मायलेज देतेस परंतु या गाडीची डिझाईन सुद्धा डोळ्यात भरण्यासारखी आहे. या गाडीची किंमत पाहिली तर ती 4.26 लाख रुपये पासून सुरू होते 24.12 किलोमीटरचे प्रति लिटर मायलेज देते.

2- रेनो क्विड तुम्हाला जर कमीत कमी बजेटमध्ये उत्तम कार घ्यायची असेल तर रेनॉल्ट क्विड म्हणजेच रेनो क्विड हे कार उत्तम पर्याय ठरते. ही कार तुम्हाला कमी किमतीमध्ये उत्तम मायलेज देतेस परंतु या कारची डिझाईन देखील आपल्याला खूप पसंतीस पडते.

या कारची किंमत दोन लाख 69 हजार रुपयांपासून सुरू होते व  मायलेज बद्दल जर आपण कंपनीचा दावा पाहिला तर ही कार 21.46 किलोमीटर प्रति लिटर मायलेज देते.

3- मारुती सुझुकी सेलेरिओ मारुती सुझुकीची सेलेरिओ ही कार देखील ग्राहकांमध्ये प्रचंड प्रमाणात पसंतीस उतरल्याचे चित्र असून गेल्या एक ते दोन वर्षापासून ही कार बाजारपेठेमध्ये सेलेरिओने चांगलेच नाव बनवले आहे.ही कार तुम्हाला घ्यायची असेल तर तिची किंमत 5.36 लाख रुपये इतकी असून ती 24.97 किलोमीटर प्रति लिटर मायलेज देते.

4- मारुती सुझुकी अल्टो K10- मारुती सुझुकीची अल्टो K10 ही एक अतिशय प्रसिद्ध आणि लोकप्रिय कार असून कमी किमतीमध्ये मिळते. तुम्ही अगदी घाट रस्त्यामध्ये देखील तिला वेगाने पळवू शकतात.

मारुती सुझुकीच्या अल्टो के 10 ची सुरुवातीची किंमत पाहिली तर ती तीन लाख 99 हजार रुपये होती व ही कार 24.39 किलोमीटर प्रति लिटरचे मायलेज देते.

Ajay Patil