स्पेशल

बोअरवेलसाठी जमिनीमध्ये पाणी कुठे आहे ते कसे शोधायचे? झाडे आणि कीटक देखील पाणी शोधण्यासाठी करतात मदत? वाचा माहिती

Published by
Ajay Patil

शेतीसाठी पाणी हा एक आवश्यक घटक असल्यामुळे पाण्याचा स्त्रोत मुबलक प्रमाणात उपलब्ध असणे हे शेती उत्पादनाच्या दृष्टीने खूप महत्त्वपूर्ण बाब आहे. याकरिता शेतामध्ये प्रामुख्याने विहिरी व बोअरवेल खोदले जातात. परंतु बोअरवेलच्या बाबतीत जर विचार केला तर बऱ्याचदा जमिनीतील पाण्याची पातळी किंवा जमिनीतील पाण्याचा स्त्रोत व्यवस्थित लक्षात न आल्यामुळे बोरवेल फेल जातात म्हणजेच त्यांना पाणी लागत नाही व शेतकऱ्यांचे खूप मोठे आर्थिक नुकसान होते.

जर आपण जमिनीमधील पाण्याचा शोध घेण्याच्या काही पद्धतींचा वापर केला तर या पद्धतींमध्ये काही ठिकाणी शेतकऱ्यांच्या बोरवेलला पाणी लागते तर बऱ्याच ठिकाणी हजार फुटापर्यंत बोअर खोदले जातात तरी देखील पाणी लागत नाही. ही सगळी वस्तुस्थिती असून याकरिता नेमक्या कोणत्या पारंपारिक पद्धती वापरल्या जातात व तज्ञांच्या मते वैज्ञानिक पद्धती कोणते आणि किती फायद्याच्या ठरतात याबद्दलची माहिती आपण या लेखात घेणार आहोत.

 भूजलाचा अंदाज घेण्यासाठी असलेल्या पारंपरिक पद्धती

एकंदरीत महाराष्ट्रातच नाही तर भारतामध्ये पाण्याची पातळी किंवा पाण्याचे उपलब्धता शोधण्यासाठी पारंपारिक पद्धतींचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो. यामध्ये सगळ्यात प्रसिद्ध असलेली पद्धत म्हणजे नारळ हातात घेऊन घेतलेल्या पाण्याचा शोध ही होय. यामध्ये नारळ हातात घेऊन संबंधित व्यक्ती शेतामध्ये फिरतात आणि ज्या ठिकाणी नारळ हातावर उभे राहते त्या ठिकाणी पाणी आहे असे या माध्यमातून अंदाज बांधला जातो.

तसेच काही विशिष्ट झाडाच्या फांदीचा देखील वापर पारंपारिक पद्धतीत केला जातो. परंतु यामध्ये नारळ वापरून भूजल शोधण्याची जी काही पद्धत आहे ती शेतकऱ्यांमध्ये इतर पारंपारिक पद्धती पेक्षा जास्त विश्वासार्ह दिसून येते. तसेच हातात एखाद्या प्रकारची काठी घेऊन या क्षेत्रातले तज्ञ शेतामध्ये चालतात व शेतातील चार-पाच ठिकाणी पाणी आहे असे दाखवतात. परंतु यामध्ये बऱ्याचदा काही ठिकाणी पाणी लागते तर काही ठिकाणी पाणी लागत नाही.

 पाण्याचा शोध घेण्यासाठी शास्त्रीय पद्धती

जर आपण भूगर्भातील पाण्याची खोली आणि पाण्याची स्थिती नेमकी काय आहे हे जर शोधायचे असेल किंवा माहिती करून घ्यायची असेल तर काही वैज्ञानिक पद्धती आहेत व त्यातलीच एक महत्त्वाची पद्धत म्हणजे विद्युत प्रतिरोधक सिद्धांत ही होय. ही पद्धत विद्युत वाहकतेचा जो काही नियम आहे त्यावर अवलंबून आहे किंवा आधारित आहे. या पद्धतीत जे काही साधन वापरले जाते त्याला इलेक्ट्रिक रेझिस्टिव्हिटी असे देखील नाव आहे.

या पद्धतीमध्ये संबंधित उपकरणाचे तार किंवा इलेक्ट्रोड आठ ते दहा इंच खोल जमिनीमध्ये गाडून ठेवले जाते व या पद्धतीचा अवलंब करून या तार किंवा इलेक्ट्रोडच्या माध्यमातून विद्युत प्रवाह जमिनीमध्ये सोडला जातो व भूजल पातळी शोधली जाते. याबद्दल तज्ञ सांगतात की विद्युत प्रवाहाच्या माध्यमातून जे काही यंत्र असते त्याच्यावर रीडिंग येते व त्या रीडिंग वरून भूजलचा अचूक अंदाज मिळू शकतो. या माध्यमातून कोणत्याही ठिकाणी पाणी आहे किंवा नाही याची व्यवस्थित माहिती मिळते.

या पद्धतीने मिळालेली माहिती घेतली जाते व सॉफ्टवेअरच्या मदतीने संपूर्ण माहितीचे अर्थात व विश्लेषण केले जाते. तसेच दुसरी शास्त्रीय पद्धती बद्दल बोलताना तज्ञ सांगतात की  रेजिस्टिव्हिटी इमेजिंग सिस्टीम एक वैज्ञानिक पद्धत असून या पद्धतीमध्ये जमिनीतील पाण्याचा अंदाज घेण्यासाठी सुधारित उपकरणाचे बारा किंवा 24 इलेक्ट्रॉन जमिनीमध्ये गाडले जातात

व त्यांच्या मदतीने जमिनीची व जमिनीमधील जे काही अंतर्गत घटक आहेत त्याच्या प्रतिमा सॉफ्टवेअरच्या माध्यमातून घेतल्या जातात. एक ते दीड तासांमध्ये ही सगळी माहिती आपल्याला मिळते व कम्प्युटरच्या माध्यमातून ती आपल्याला पाहता देखील येते. तज्ञांच्या मते जर वाळूचे प्रमाण जमिनीत जास्त असेल तर अशा ठिकाणी पाणी चांगले असते व जमीन जर खडकाळ युक्त असेल तर पाणी ती शोषत नाही व भूजल कमी असते.

 नैसर्गिक गोष्टींमुळे तुम्ही लावू शकतात जमिनीतील पाण्याचा अंदाज

वैज्ञानिक पद्धती सोबतच तज्ञ काही नैसर्गिक पद्धतीबद्दल देखील सांगतात की नैसर्गिक पद्धतीमध्ये हायड्रोबायोलॉजीकल इंडिकेटर म्हणून ओळखले जाणारी ही पद्धत देखील पाण्याचा शोध घेण्यासाठी फायद्याची ठरू शकते.यामध्ये जमिनीतील पाण्याचा खोलीचा अंदाज घेण्यासाठी झाडे आणि काही कीटक यांचे निरीक्षण केले जाते.

या पद्धतीमध्ये भूजल शास्त्रज्ञ कडुलिंब, नारळ तसेच ताड किंवा खजूर यासारखे झाडांची वाढ व त्यांची वाढीची दिशा याचे निरीक्षण करतात. प्रामुख्याने आपल्याला माहित आहे की झाडाच्या सर्व फांद्या कधीच वाकलेल्या नसतात. परंतु कधी कधी झाडाच्या फांद्या प्रमाणाबाहेर खाली वाकलेल्या दिसतात.

जरा अशा झाडाच्या फांद्या खाली वाकलेल्या असतील तर त्या ठिकाणी पाण्याची पातळी खूप जास्त प्रमाणात आहे असा अंदाज लावता येऊ शकतो. झाडांप्रमाणेच कीटकांची उपस्थिती देखील आपल्याला जमिनीतील पाण्याच्या उपलब्धतेबद्दल  बरंच काहीतरी सांगून जाते. समजा ज्या जमिनीत किंवा शेतामध्ये वाळवी जास्त प्रमाणात असेल तर अशा ठिकाणी पाणी सापडण्याची शक्यता जास्त असते व एवढेच नाही तर अगदी कमीत कमी खोलीवर तुम्हाला पाणी मिळू शकते. या प्रकारच्या नैसर्गिक क्रिया या पाण्याचा शोध घेण्यासाठी फायद्याचे ठरू शकतात.

Ajay Patil