Home Care Tips:- आपल्या घराचे आपण योग्य पद्धतीने स्वच्छता ठेवत असतो. परंतु तरी देखील थोडे जरी अडगळ घरामध्ये असेल तर आपल्याला घरामध्ये अनेक प्रकारचे उपद्रवी कीटक दिसून येतात. यामध्ये पाल, झुरळ आणि उंदरांचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर दिसून येते.
यामध्ये जर उंदरांचा विचार केला तर घरामध्ये जर जास्त प्रमाणामध्ये उंदीरांचा प्रादुर्भाव झाला तर मात्र अनेक वापरातल्या वस्तू देखील खराब होण्याची शक्यता असते. घरामधील धान्याची पोती, इतर वस्तू उंदीर दाताने कूरतडून खराब करतात व धान्याची देखील नासाडी मोठ्या प्रमाणावर होत असते.
त्यामुळे उंदरांचा उपद्रव कमी करण्यासाठी आपण नाना तऱ्हेचे प्रयोग करतो. बाजारामध्ये देखील उंदीर मारण्यासाठीच्या गोळ्या येतात व याचा वापर मोठ्या प्रमाणावर आपण करत असतो.
परंतु याचा देखील फार काही मोठा फरक पडताना आपल्याला दिसून येत नाही. या अनुषंगाने आपण या लेखामध्ये अशा काही सोपे उपाय बघणार आहोत जे केल्याने उंदरांपासून कायमचे मुक्तता मिळणे शक्य आहे.
हे छोटे आणि सोपे उपाय करा आणि उंदरांना घरातून पळवून लावा
1- उपाय एक- यामध्ये तुम्हाला एक छोटा रुमाल, एक छोटी वाटी, पाणी, साधारणपणे दीड चमचा गहूचे पीठ, कापूरचे दोन तुकडे आणि तिखट मिरची पावडर या वस्तूची आवश्यकता भासेल. यामध्ये तुम्ही एका भांड्यात गव्हाचे पीठ घ्यावे व त्यामध्ये मिरची पावडर आणि पाणी घालून द्रावण तयार करून घ्यावे.
या मिश्रणामध्ये एक रुपयाला मिळणारा शाम्पूचा पूर्ण पाऊस मिसळून ते मिश्रण चांगले तयार करून घ्यावे. हे मिश्रण तयार झाल्यानंतर रुमाल फरशीवर पसरवून घ्यावा. त्यानंतर त्या रुमालावर ब्रशच्या मदतीने हे तयार मिश्रण लावून घ्यावे.
मात्र हे मिश्रण रुमालावर लावताना मात्र हातामध्ये ग्लोज घालणे गरजेचे आहे. कारण यामध्ये मिरची पावडर वापरलेली असते व ती हाताला लागली तर हाताची आग होण्याची शक्यता असते. त्यानंतर कापूरचा चुरा घेऊन तो कपड्यावर पसरवून घ्यावा.
ही संपूर्ण प्रक्रिया झाल्यानंतर घरामध्ये ज्या ठिकाणी उंदीर जास्त प्रमाणात दिसून येतात त्या ठिकाणी हे कापड ठेवून द्यावे. उंदीर हे कापड खाण्याचा प्रयत्न करतात तेव्हा त्यांच्या तोंडात आग होते किंवा जळजळ होते. त्यामुळे उंदीर त्या ठिकाणाहून पळून जातात तो परत घरात उंदीर येतच नाहीत.
2- उपाय दुसरा- दुसरा उपाय पहिला तर यामध्ये तंबाखूचा वापर देखील फायद्याचा ठरताना दिसून येतो. या उपायांमध्ये तुम्ही बेसन पीठ आणि गव्हाचे पीठ घेऊन त्यामध्ये तंबाखू मिसळून एक गोळी बनवावी
व या तयार गोळ्या स्वयंपाक घरात किंवा ज्या ठिकाणी घरात उंदीर दिसतात त्या ठिकाणी ठेवून द्यावी. उंदरांनी खाल्ली तर त्यांना नशा आल्यासारखे होते व ते बाहेर पळून जातात व पुन्हा येत नाहीत.
3- उपाय तिसरा- दुसरा उपायामध्ये तुम्ही कांदा आणि तुरटी यांचा वापर करू शकतात. यामध्ये तुरटीची पावडरचे द्रावण तयार करावे व ते द्रावण घरामध्ये उंदरांचे बीळ ज्या ठिकाणी असेल त्याभोवती शिंपडून घ्यावे.
तुरटीचा वास उदिरांना अजिबात सहन होत नाही व त्यामुळे ते पळून जातात. तसेच आपण यामध्ये कांद्याचा वापर केलेला असतो व कांद्याचा उग्र वास देखील उंदीराना आवडत नाही. यामध्ये तुम्ही जास्त कांदा कापून जरी उंदीरच्या ज्या ठिकाणी दिसतात त्या ठिकाणी ठेवला तरी उंदीर पळून जातात.