Flipkart Big Diwali Sale:- दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर फ्लिपकार्ट आणि ॲमेझॉन सारख्या ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून सेल सुरू करण्यात आलेले आहेत व या सेलमध्ये घरगुती उपकरणे तसेच कार व बाईक्स, स्मार्टफोन इत्यादीवर मोठ्या प्रमाणावर सूट देण्यात येत असून कॅशबॅकचा देखील लाभ दिला जात आहे.
त्या मुळे अनेक दर्जेदार आणि ब्रॅण्डेड कंपन्यांच्या वस्तू आपल्याला स्वस्तात खरेदी करण्याची सुवर्णसंधी मिळाली आहे. यामध्ये फ्लिपकार्ट बिग दिवाळी सेल 21 ऑक्टोबर पासून सुरू झाला असून याची शेवटची मुदत 31 ऑक्टोबर पर्यंत आहे.
या सेलमधून तुम्हाला जर स्वस्तात स्मार्टफोन घ्यायचा असेल तर तुम्ही 31 ऑक्टोबरच्या आधी घेणे गरजेचे आहे. फ्लिपकार्टच्या या बिग दिवाळी सेलमध्ये एसबीआय कार्डद्वारे जर तुम्ही एखादी वस्तू घेतली तर तुम्हाला दहा टक्के कॅशबॅक किंवा सवलत या माध्यमातून मिळू शकणार आहे.
नाहीतर फ्लिपकार्ट ॲक्सिस बँक कार्ड वापरले तर खरेदीवर पाच टक्के अतिरिक्त मर्यादित असा कॅशबॅक सुद्धा मिळणार आहे. या सेलमध्ये कमी किमतीत काही लोकप्रिय स्मार्टफोन विक्रीसाठी उपलब्ध असून त्यामधून कोणताही स्मार्टफोन तुम्ही खरेदी करू शकतात.
फ्लिपकार्ट बिग दिवाळी सेलमध्ये कमी किमतीत उपलब्ध आहेत हे लोकप्रिय स्मार्टफोन
1- मोटोरोला जी 85- हा 5 जी स्मार्टफोन असून तो 15 हजार 999 च्या सुरुवातीच्या किमतीत या ठिकाणी उपलब्ध आहे.
2- सॅमसंग गॅलेक्सी एस 23- हा देखील 5जी स्मार्टफोन असून तो फ्लिपकार्ट बिग दिवाळी सेलमध्ये 37 हजार 999 रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत उपलब्ध आहे.
3- रियलमी 12 एक्स– हा स्मार्टफोन देखील पाच जी स्मार्टफोन असून सात हजार रुपयांच्या सवलतीसह दहा हजार 999 रुपयांमध्ये उपलब्ध आहे.
4- ओप्पो के 12 एक्स– हा देखील 5 जी स्मार्टफोन असून 6000 रुपयांच्या सवलतीसह फ्लिपकार्ट बिग दिवाळी सेल मध्ये दहा हजार 999 रुपयामध्ये मिळणार आहे.
5- सीएमएफ फोन– हा फोन सात हजार पाचशे रुपयांच्या सवलतीसह 12,999 रुपयांना विकत घेता येणार आहे.
6- पोको एफ 6- हा देखील 5 जी स्मार्टफोन असून त्याची किंमत 33 हजार 999 रुपये इतकी आहे. परंतु फ्लिपकार्ट बिग दिवाळी सेलमध्ये तुम्ही हा फोन 22999 मध्ये खरेदी करू शकणार आहात.
7- विवो टी 3- हा 5जी स्मार्टफोन असून फ्लिपकार्ट बिग दिवाळी सेलमध्ये तुम्हाला सात हजार रुपयांच्या सवलतीसह 15999 उपलब्ध होणार आहे.
8- सॅमसंग गॅलेक्सी एस 23 FE- या स्मार्टफोनची किंमत फ्लिपकार्ट बिग दिवाळी सेलमध्ये 28 हजार 999 रुपये आहे.
9- गुगल पिक्सल 8- या फोनची जर किंमत बघितली तर ती 75 हजार 999 रुपये इतक्या मूळ किमती पासून सुरू होते. परंतु या सेलमध्ये हा फोन तुम्हाला अवघ्या 36 हजार 499 रुपयांना खरेदी करता येणार आहे.
10- रियलमी पी2 प्रो 5- हा फोन फ्लिपकार्ट दिवाळी सेलमध्ये सात हजार रुपयांच्या सवलतीसह 18 हजार 999 मध्ये उपलब्ध होणार आहे.