स्पेशल

शेअर बाजारामध्ये आहे सध्या तेजीचा काळ; ‘या’ तीन स्टॉक्समधील गुंतवणूक देईल तुम्हाला भरघोस पैसा, वाचा तज्ञांनी सुचवलेले स्टॉक्स

Published by
Ajay Patil

सध्या शेअर बाजारामध्ये साधारणपणे लोकसभा निवडणुकीचा निकालानंतर तेजीचे वातावरण दिसून येत असून सातत्याने सेन्सेक्स व निफ्टीमध्ये उच्चांकी पातळी आपल्याला दिसून येत आहे. या कालावधीमध्ये आपल्याला दिसून येत आहे की अनेक कंपन्यांच्या शेअर्सच्या किमती वधारल्याचे सध्या चित्र आहे

अशा पार्श्वभूमीवर जर दीर्घकालीन गुंतवणूक करायची असेल तर हा कालावधी महत्त्वाचा ठरेल असे देखील या क्षेत्रातील जाणकारांचे मत आहे. त्यामुळे तुम्हाला देखील जर लॉन्ग टर्म अर्थात दीर्घकालीन दृष्टिकोनातून गुंतवणूक करायची असेल तर चोला सिक्युरिटीजचे धर्मेश कांत यांनी तीन सर्वोत्तम मिडकॅप स्टॉक्स सिलेक्ट केले आहेत.

 या तीन स्टॉक्समधील दीर्घकालीन गुंतवणूक देऊ शकते चांगला परतावा

1- जेएसडब्ल्यू एनर्जी दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी तज्ञांच्या माध्यमातून जेएसडब्ल्यू एनर्जीच्या शेअरची निवड करण्यात आली असून सध्या हा शेअर्स 413 रुपयांवर ट्रेड करत असून या कंपनीचे तिमाहीचे निकाल देखील चांगले आले होते व एका महिन्यामध्ये या स्टॉकने सुमारे दहा टक्के वाढ नोंदवली.

जेएसडब्ल्यू ही कंपनी पावरट्रिब्युशन आणि जनरेशन सेक्टरमध्ये काम करते व पुढील 8 ते 9 महिन्यांकरिता पाचशे साठ रुपयांचे टारगेट या शेअरसाठी देण्यात आलेले आहे. जर आपण या शेअरचा मागील आठवड्यांचा उच्चांक पहिला तर 450 रुपये आहे आणि नीचांक 204 रुपये आहे.

2- हिताची एनर्जी सध्या हिताची एनर्जीचा शेअर 4832 रुपयांवर ट्रेड करत आहे व व्यापारा दरम्यानच्या कालावधीत 4944 रुपयांचा एक नवा उच्चांक देखील या शेअर्सने गाठला आहे. सध्या पावर सेक्टरमध्ये जी काही तेजी आहे त्याचा फायदा या शेअर्सला देखील होईल असे तज्ञांची म्हणणे आहे.

हिताची एनर्जी ही कंपनी पावर डिस्ट्रीब्यूशन आणि ट्रान्समिशन नेटवर्कमध्ये वापरले जाणारे जे काही इक्विपमेंट्स आहेत ती तयार करते. तज्ञकडून लॉन्ग टर्म गुंतवणुकी करिता या शेअर्समध्ये पाच हजार सातशे रुपयांचे टार्गेट देण्यात आले आहे. आठवड्यामध्ये या शेअरच्या किमतीत 6% ची वाढ झालेली आहे.

3- भारत फोर्ज सध्या भारत फोर्जचा शेअर्स 1095 रुपयांवर असून गेल्या 52 आठवड्यांचा उच्चांक 1148 रुपये तर निचांक 743 रुपयाचा आहे. ही कंपनी फोर्जिंग बनवणारी असून ऑटोमोबाईल आणि डिफेन्स या दोन्ही सेक्टरमध्ये महत्त्वपूर्ण काम करते.

जर आपण या कंपनीचे कामगिरी पाहिली तर तिचा दुसऱ्या तिमाहीचा निकाल चांगला असून महसुलामध्ये 20 टक्क्यांची वाढ व नफ्यात 30 टक्क्यांची वाढ झालेली होती. जर या शेअर्समध्ये गुंतवणूक करायचे असेल तर तज्ञांनी याकरिता पुढील एक ते तीन महिन्यांकरिता बाराशे रुपयांचे टारगेट दिलेले आहे.

Ajay Patil