स्पेशल

2 ते 5 एकर शेतीसाठी अतिशय फायद्याचा ठरेल ‘हा’ पावरफुल मिनी ट्रॅक्टर! शेतीतील अवघड कामे करेल सोपे, वाचा किंमत आणि वैशिष्ट्ये

Published by
Ajay Patil

Mahindra Jio 305 DI Vineyard Mini Tractor:- ट्रॅक्टर हे शेतीसाठीचे अत्यंत आवश्यक आणि उपयुक्त यंत्र असून जवळपास शेतीची सर्व कामे ट्रॅक्टरच्या माध्यमातून पार पाडले जातात.अगदी पीक लागवडीच्या आधीची शेतीची पूर्व मशागत असो किंवा पीक लागवड तसेच अंतरमशागत व पीक काढणी पासून ते शेतीमाल बाजारपेठेपर्यंत नेण्यासाठी देखील ट्रॅक्टर उपयुक्त ठरते

दुसरे महत्त्वाचे म्हणजे शेतीसाठी आवश्यक असलेले बरेच उपकरणे हे ट्रॅक्टरचलीत असल्याने त्या दृष्टिकोनातून देखील ट्रॅक्टरचे महत्त्व अनन्यसाधारण आहे.

तसेच लहान शेती किंवा कमी क्षेत्रासाठी व फळबागांमधील अंतरमशागतीसाठी सध्या मिनी ट्रॅक्टर खरेदी करण्याचा ट्रेंड मोठ्या प्रमाणावर वाढत असून अनेक ट्रॅक्टर उत्पादक कंपन्यांनी उत्कृष्ट आणि पावरफुल असे मिनी ट्रॅक्टर बाजारपेठेत आणले आहेत.

या अनुषंगाने तुम्हाला देखील ट्रॅक्टर खरेदी करायचा असेल तर महिंद्रा जिवो 305 DI 4WD व्हाईनयार्ड ट्रॅक्टर तुमच्यासाठी उत्तम पर्याय ठरू शकतो. या ट्रॅक्टरमध्ये मजबूत आणि पावरफुल इंजन दिले असून ते कमीत कमी इंधनामध्ये शेतीचे अनेक प्रकारची कामे करू शकते.

महिंद्रा जिवो 305 DI 4WD व्हाईनयार्डचे वैशिष्ट्ये
महिंद्रा कंपनीने या ट्रॅक्टरमध्ये शक्तिशाली दोन सिलेंडर इंजन दिले असून जे 27 अश्‍वशक्ती आणि 89 एनएम टॉर्क जनरेट करण्यास सक्षम आहे. या मिनी ट्रॅक्टरला उत्तम दर्जाचे एअर फिल्टर देण्यात आले असून जे शेतात काम करताना इंजिनचे धुळीपासून संरक्षण करते.

या मिनी ट्रॅक्टरची कमाल पीटीओ पावर 24.5 एचपी आहे. ही पावर जवळपास सर्व शेतीचे अवजारे चालवण्यासाठी पुरेशी आहे. कंपनीच्या या ट्रॅक्टरचे इंजिन 2500 आरपीएएम जनरेट करते. या ट्रॅक्टरची हायड्रोलिक क्षमता 750 kg इतकी ठेवण्यात आली आहे.

या मिनी ट्रॅक्टरची इतर महत्त्वाची वैशिष्ट्ये
या मिनी ट्रॅक्टरला पावर स्टेअरिंग प्रदान करण्यात आलेली आहे. जे शेतकऱ्यांना केवळ शेतातच नाही तर खडबडीत रस्त्यावर देखील सहज ड्राईव्ह करण्यास मदत करते. या ट्रॅक्टरला आठ फॉरवर्ड+ चार रिव्हर्स गिअर सह गिअरबॉक्स देण्यात आला आहे.

हा मिनी ट्रॅक्टर स्लाइडिंग मेश प्रकारच्या ट्रान्समिशनसह येतो. तसेच या ट्रॅक्टरमध्ये उत्तम दर्जाचे ब्रेक देण्यात आले असून जे निसरड्या परिस्थितीत देखील टायर्स वर चांगली पकड ठेवतात. हा मिनी ट्रॅक्टर चार व्हील ड्राईव्हमध्ये येतो व सर्व टायर्सना पूर्ण शक्ती प्रदान करतो.

किती आहे महिंद्रा जिवो 305 DI व्हाइनयार्ड मिनी ट्रॅक्टरची किंमत आणि वारंटी?
भारतीय वाहनांच्या बाजारपेठेमध्ये या मिनी ट्रॅक्टरची एक्स शोरूम किंमत पाच लाख 77 हजार ते सहा लाख 18 हजार रुपये इतकी ठेवण्यात आलेली आहे. आरटीओ नोंदणी आणि रोड टॅक्समुळे या ट्रॅक्टरची ऑन रोड किंमत काही राज्यांमध्ये बदलू शकते. महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीने या मिनी ट्रॅक्टर सोबत पाच वर्षांची वारंटी दिली आहे.

Ajay Patil