स्पेशल

Post Office Scheme: पोस्टाची ‘ही’ योजना आहे खूपच भारी! पैशांची गुंतवणूक केल्यावर मिळतो भरपूर फायदा आणि पैशांची गरज पडल्यास मिळते कर्ज

Published by
Ajay Patil

Post Office Scheme:- गुंतवणुकीच्या दृष्टिकोनातून मोठ्या प्रमाणावर गुंतवणुकीसाठी पसंती दिली जाते ती बँक आणि पोस्ट ऑफिसच्या योजनांना होय. कारण या दोन्ही ठिकाणी गुंतवणूक केल्यावर गुंतवणूक सुरक्षित राहतेच आणि परतावा देखील चांगला मिळतो.

या दृष्टिकोनातून जर आपण पोस्ट ऑफिसच्या योजना पाहिल्या तर यामध्ये अनेक बचत योजना तर आहेतच परंतु मुदत ठेव योजना देखील आहेत. या योजनांमध्ये केलेल्या गुंतवणुकीवर व्याज देखील चांगले मिळते व त्यामुळे अपेक्षित परतावा देखील मिळतो आणि काही योजनांच्या माध्यमातून गरज पडल्यास आपण कर्ज देखील घेऊ शकतो.

त्यामुळे पोस्ट ऑफिसच्या योजना देखील गुंतवणुकीच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे आहेत. अशाच पोस्ट ऑफिसच्या योजनांपैकी जर आपण आवर्ती ठेव म्हणजेच आरडी योजना पाहिली तर ती एक खूप महत्वपूर्ण योजना असून ती पाच वर्षाच्या कालावधीसाठी साधारणपणे राबवली जाते.

तसे पाहायला गेले तर ही एक केंद्र सरकारची योजना आहे व यामध्ये तुम्ही प्रत्येक महिन्याला शंभर रुपयांपासून गुंतवणूक सुरू करू शकता. या योजनेलाच राष्ट्रीय बचत आवर्ती ठेव योजना देखील म्हणतात.

पोस्टाच्या आरडी योजनेत कोणाला करता येते गुंतवणूक?

पोस्ट ऑफिसच्या या योजनेमध्ये कोणत्याही प्रौढ व्यक्तीला खाते उघडता येते. तसेच तीन लोक मिळून जॉईंट अकाउंट देखील या योजनेत उघडू शकतात. एखाद्या अल्पवयीनला या योजनेत खाते उघडायचे असेल तर ते संबंधित अल्पवयीनचे पालक त्याच्या वतीने यामध्ये खाते उघडून पैसे गुंतवू शकतात.

एखादा व्यक्ती अबनॉर्मल असेल तर अशा व्यक्तीच्या वतीने त्याचे पालक या योजनेत गुंतवणूक करू शकतात. दहा वर्षापेक्षा जास्त वयाचे अल्पवयीन मुले आरडी योजनेमध्ये स्वतःच्या नावाने खाते चालवू शकतात. या योजनेचे सगळ्यात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे तुम्ही एकापेक्षा जास्त खाते या योजनेत उघडू शकतात व यावर कुठल्याही प्रकारची मर्यादा नाही.

 शंभर रुपयांनी गुंतवणुकीला सुरुवात करू शकतात

पोस्ट ऑफिसच्या या आरडी म्हणजेच नॅशनल सेविंग रिकरिंग डिपॉझिट खात्यामध्ये प्रत्येक महिन्याला जर शंभर रुपये जमा केले तरी पुरेसे आहे. यामध्ये जर तुम्हाला वाढ करायची असेल तर तुम्ही दहाच्या पटीत कितीही पैसे गुंतवू शकतात.

तुम्ही चेक देऊन किंवा रोख स्वरूपात रक्कम देऊन या योजनेत खाते उघडू शकतात. या योजनेत तुम्ही कॅलेंडर महिन्याच्या पंधरा तारखेला खाते उघडले तर त्यानंतरच्या ठेवीची गणना महिन्याच्या पंधरा तारखेपर्यंत केली जाते.

तसेच महिन्याच्या सोळाव्या आणि शेवटच्या कामकाजाच्या दिवसाच्या दरम्यान खाते उघडल्यास त्यानंतरच्या ठेवी महिन्याच्या शेवटच्या कामकाजाच्या दिवसापर्यंत मोजल्या जातात.

 या योजनेत केलेल्या गुंतवणुकीवर किती मिळतो व्याजदर?

पाच वर्षाच्या पोस्ट ऑफिस रिकरिंग डिपॉझिट म्हणजेच आरडी खात्यात जमा केलेल्या रकमेवर सध्याला 6.7% वार्षिक व्याज मिळत आहे.

 या योजनेत कर्ज सुविधा कशी मिळते?

पोस्ट ऑफिसच्या या रिकरिंग डिपॉझिट योजनेच्या माध्यमातून तुम्हाला कर्ज देखील मिळते. याकरिता तुम्ही 12 हप्ते जमा करणे आवश्यक आहे व खाते एका वर्षासाठी सक्रिय ठेवणे गरजेचे आहे. तेव्हा तुम्हाला तुम्ही खात्यात जमा केलेल्या शिल्लक रक्कमेच्या 50 टक्के पर्यंत कर्ज मिळते.

या घेतलेल्या कर्जाची परतफेड तुम्ही एकरकमी करू शकतात किंवा समान मासिक हप्त्यांमध्ये म्हणजेच ईएमआयच्या रूपात देखील करू शकता. या घेतलेल्या कर्जावर लागू असलेल्या व्याजदराचा विचार केला तर तो आरडी खात्यावर दोन टक्के+ आरडी व्याजदर लागू असलेला जो काही दर आहे तो कर्जासाठी लागू होतो.

Ajay Patil