Hasnanba Temple:- भारतामध्ये अनेक बाबतीत आपल्याला विविधता दिसून येते. मग ती विविधता नैसर्गिक संपत्तीच्या बाबतीत असो की भौगोलिक परिस्थितीच्या दृष्टिकोनातून इतकेच नाही तर प्राणी संपदेत देखील भारतात विविधता दिसून येते. त्यामुळे भारताला विविधतेत एकता असलेला देश म्हटले जाते.
तसेच आध्यात्मिक दृष्टिकोनातून भारतामध्ये खूप महत्त्वाची अशी मंदिरे प्रत्येक राज्यात आहेत व आध्यात्मिक पर्यटनासाठी भारत हा जगाच्या पाठीवरचा एक प्रमुख देश म्हणून ओळखला जातो. मंदिरांच्या अनुषंगाने बघितले तर हिंदू धर्माची अनेक प्रसिद्ध अशी मंदिरे भारतात असून काही मंदिरे त्यांच्या चमत्कारासाठी खूप प्रसिद्ध आहेत.
असेच एक प्रसिद्ध असलेले मंदिर कर्नाटक राज्यामध्ये असून त्या मंदिराचे नाव हसनंबा मंदिर असे आहे. या मंदिराचे जर वैशिष्ट्ये बघितले तर ते फक्त वर्षातून एकदाच म्हणजेच दिवाळीला उघडले जाते. दिवाळी कालावधीमध्ये सात दिवस या ठिकाणी दिवे लावले जातात व फुलांची सजावट आणि प्रसाद अर्पण केला जातो. या सात दिवसाच्या कालावधीनंतर मंदिराचे दरवाजे पुन्हा बंद केले जातात.
भारतातील हे मंदिर 365 दिवसात फक्त उघडले जाते दिवाळीत
भारतातील कर्नाटक राज्यात असलेल्या हसन जिल्ह्यामध्ये हसनंबा मंदिर असून हे मंदिर वर्षातून फक्त दिवाळीच्या कालावधीत सात दिवसांकरिता उघडले जाते. या सात दिवसांच्या कालावधीमध्ये या ठिकाणी दिवे लावले जातात व फुले तसेच प्रसाद अर्पण केला जातो.
सात दिवस पूर्ण झाल्यानंतर या मंदिराचे दरवाजे पुन्हा बंद केले जातात. या मंदिराचे जर वैशिष्ट्ये पाहिले तर या ठिकाणी वाहिलेले फुले आणि प्रसाद एक वर्षानंतर देखील ताजा राहतो.
हे मंदिर बेंगलोर शहरापासून 180 किलोमीटर अंतरावर आहे. हसनंबा मंदिराचे बांधकाम हे 12 व्या शतकात करण्यात आले असून या ठिकाणाला पूर्वी सिंहासनपुरी म्हणून ओळखले जात असे. या मंदिराचे स्वतःचे विविध अशी वैशिष्ट्ये आहेत व या मंदिराशी संबंधित काही पौराणिक कथा देखील खूप प्रसिद्ध आहेत.
काय आहे हसनंबा मंदिराचा इतिहास?
पौराणिक कथा नुसार बघितले तर त्यामध्ये असे सांगितले आहे की,या ठिकाणी फार अगोदर अंधकासुर नावाचा राक्षस होता व त्यांनी कठोर तपश्चर्या करून ब्रह्मदेवाला प्रसन्न केले आणि वरदान म्हणून अदृश्य होण्याचे वरदान मिळवले होते.
जेव्हा त्याला हे वरदान मिळाले त्यानंतर मात्र त्याने ऋषीमुनी आणि मनुष्य जातीला खूप त्रास द्यायला सुरुवात केली व त्यांचे जगणे मुश्किल केले. या परिस्थितीमध्ये भगवान शंकराने त्या राक्षसाचा वध करण्याची जबाबदारी स्वतःवर घेतली.
पण अंधकासुरला मारल्यानंतर त्याच्या रक्ताचा प्रत्येक थेंब राक्षसात रूपांतर होत असे. शेवटी त्याला मारण्याकरिता भगवान शिवाने तपश्चर्य द्वारे योगेश्वरी देवीची निर्मिती केली व योगेश्वरी देवीने अंधकार सुराचा वध केला.
वर्षभरानंतर देखील या मंदिरात फुले राहतात ताजी
हे मंदिर दिवाळीला सात दिवस उघडले जाते व तीन दिवस या ठिकाणी उत्सव साजरा केला जातो. जेव्हा दिवाळीच्या कालावधीमध्ये हसनंबा मंदिराचे दरवाजे उघडले जातात तेव्हा महा जगदंबेच्या दर्शनाकरिता लाखोंच्या संख्येने या ठिकाणी भाविक दाखल होतात.
परंतु ज्या दिवशी या मंदिराचे दरवाजे परत बंद केले जातात त्या दिवशी मंदिराच्या गर्भगृहात शुद्ध तुपाचा दिवा लावला जातो व मंदिराचे गर्भगृह फुलांनी सजवले जाते आणि तांदळाचे पदार्थ प्रसाद म्हणून ठेवले जातात.
परंतु विशेष म्हणजे वर्षभरानंतर पुढच्या दिवाळीला जेव्हा हे मंदिर उघडले जाते तेव्हा मंदिराच्या गर्भगृहात दिवा जळताना आढळतो आणि देवीला अर्पण केलेली जी फुले आणि प्रसाद असतो तो देखील ताजा असल्याचे दिसून येते. हे खास वैशिष्ट्ये या मंदिराचे आहे.