स्पेशल

एमबीए पूर्ण करून नोकरी न करता ‘या’ तरुणीने सुरू केला गुळाचा व्यवसाय! वर्षाला करते 2 कोटीची कमाई

Published by
Ajay Patil

Business Success Story:- आजकालच्या तरुणाईचा ट्रेंड जर बघितला तर प्रामुख्याने उच्च शिक्षण घेणे व शिक्षण पूर्ण झाल्यानंतर चांगल्या पॅकेजेची नोकरी मिळवणे व आयुष्यात सेटल होणे असा दिसून येतो. परंतु गेल्या एक ते दोन वर्षापासून बघितले तर हा ट्रेंड जरा कमी होताना दिसून येत आहे.

यामागील प्रमुख कारण म्हणजे सध्या उपलब्ध नोकऱ्यांची संख्या अतिशय कमी असल्यामुळे प्रत्येकालाच नोकरी मिळेल याची शाश्वती नाही व त्यामुळे आता बरेच जण व्यवसायांकडे वळताना दिसून येत आहेत. परंतु यामध्ये एक गट असा आहे की त्यांनी उच्च शिक्षण घेतले व लाखो रुपये पॅकेजच्या नोकरी देखील त्यांच्या हातात असून ते नोकऱ्या करत आहेत.

परंतु नोकरी करत असताना नोकरीत मन न रमल्याने एखाद्या व्यवसायात शिरतात व नोकरी सोडतात व व्यवसायामध्ये अनन्यसाधारण यश मिळवतात. परंतु ही जी काही पद्धत आहे ही धाडसाची आणि जोखीमीची असणारी आहे. कारण हातातले लाखो रुपये पॅकेजची नोकरी सोडून व्यवसायासारख्या क्षेत्रामध्ये शिरणे हे पाहिजे तेवढे सोपे काम नाही.

परंतु हे धाडस काहीजण स्वीकारतात आणि यशस्वी होतात. अगदी याच पद्धतीने जर आपण नवनूर कौर या पंजाब मधील लुधियानामध्ये लहानाच्या मोठ्या झालेल्या आणि आयएमटी गाजियाबाद मधून एमबीए पूर्ण केल्यानंतर बँकेतील नोकरी सोडून गुळाच्या व्यवसायात शिरून यशस्वी होणाऱ्या तरुणीची यशोगाथा पहिली तर ती नक्कीच इतर तरुणांना प्रेरणादायी अशीच आहे.

नवनूर कौर गुळाच्या व्यवसायातून करतात कोट्यावधी रुपयांची उलाढाल
याबाबत सविस्तर वृत्त असे की, लुधियाना सारख्या शहरांमध्ये लहानाच्या मोठ्या झालेल्या नवनूर कौर यांच्या घरची कौटुंबिक पार्श्वभूमी ही तशी शिक्षणाच्या दृष्टिकोनातून प्रगत अशी आहे. त्यांचे वडील प्राध्यापक तर आई एका शाळेच्या मुख्याध्यापिका आहेत.

मुळातच नवनूर या लहानपणापासूनच अभ्यासामध्ये अतिशय हुशार होत्या व त्यांनी 2019 मध्ये आयएमटी गाजियाबाद मधून एमबीए पूर्ण केले व त्यानंतर गुडगाव येथे कोटक बँकेमध्ये नोकरी मिळवली. या ठिकाणी त्यांना उत्तम असा पगार देखील मिळत होता.

परंतु नोकरीमध्ये काही त्यांचे मन रमत नव्हते आणि काहीतरी फूड बिजनेस सुरू करावा अशा प्रकारचा विचार कायम त्यांच्या मनामध्ये होता.

यामध्ये त्यांनी गुळ विक्रीचा व्यवसाय करावा असा विचार केला व या मागील प्रमुख कारण म्हणजे त्यांच्या कुटुंबातील बऱ्याच जणांना डायबिटीस असल्यामुळे साखरेला आरोग्यदायी पर्याय म्हणून त्यांनी गुळाच्या व्यवसायाची निवड केली.

तेव्हा त्यांनी यामध्ये बाजाराचा विचार केला तेव्हा कुठलीही कंपनी केमिकल नसलेला गूळ विकत नाही हे त्यांना समजले व त्यांनी त्यानंतर स्वतःच्या बचतीतून जॅगरकॅन नावाचा व्यवसाय सुरू केला. जेव्हा त्यांचा हा संघर्षमय प्रवास सुरू झाला तेव्हा ते दिवसभर ऑफिसमध्ये काम करायचे व रात्री त्यांच्या या स्टार्टअप वर काम करायचे.

सुरुवातीला त्यांनी जेव्हा व्यवसाय सुरू केला तेव्हा घरोघरी जाऊन मार्केटिंग करायला सुरुवात केली व जेव्हा लोकांना त्यांचे गुळाचे पदार्थ आवडायला लागले तेव्हा कौर यांचा आत्मविश्वास वाढीला लागला. त्यानंतर त्यांनी गुळावर अनेक प्रयोग केले व वेगवेगळे उत्पादने तयार केले.

यामध्ये त्यांचा कौशल नावाचा एक विद्यार्थी त्यांना या कामात मदत करू लागला. सध्या कौशल हा मॅन्युफॅक्चरिंग डिपार्टमेंट पाहतो तर नवनीत या ब्रँडीग, ऑपरेशन्स आणि टायअप हाताळतात.बँकेतील नोकरीतून नवनुर कौर यांनी पाच लाख रुपयांची बचत केलेली होती व ते संपूर्ण पैसे त्यांनी या व्यवसायामध्ये गुंतवले.

आज या स्टार्टअपची वार्षिक उलाढाल आहे दोन कोटी
कुठल्याही व्यवसायाची जर सुरुवात आपण केली तर सुरुवातीला खूप अडचणी येतात व त्या अडचणींवर यशस्वीपणे मार्ग काढत त्यावर मात करणे खूप गरजेचे असते.

याच प्रमाणे नवनूर कौर यांना देखील वेगवेगळ्या प्रकारच्या अडचणी या व्यवसायामध्ये सुरुवातीला यायला लागल्या. यामध्ये कमी मार्जिन आणि उत्पादनांची कमी सेल्फ लाइफ यामुळे बऱ्याच दुकानदारांनी त्यांच्या या उत्पादनांचा साठा करायला नकार दिला. परंतु या परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले व त्यांच्यासोबत काम करणाऱ्या कौशलने गुळाचे सेल्फ लाइफ एक महिन्यावरून तब्बल नऊ महिन्यांपर्यंत वाढवले.

आज त्यांचा व्यवसाय हा भरभराटीला आला असून त्यांचे अनेक उत्पादने आज दुसऱ्या देशांमध्ये देखील निर्यात केली जातात. तसेच 25 लोकांना या माध्यमातून रोजगार मिळाला आहे व यामध्ये प्रामुख्याने महिलांचा समावेश आहे.

नवनूर कौर यांच्या जॅगरकॅन या स्टार्टअपची वार्षिक दोन कोटी रुपयांची कमाई करत आहेत. अशाप्रकारे इच्छाशक्ती आणि प्रयत्नांच्या जोरावर त्यांनी नोकरी सोडून व्यवसायामध्ये अनन्यसाधारण असे यश मिळवले आहे.

Ajay Patil